JioPages - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 22 Oct 2020 13:09:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Reliance Jio ने लॉन्च केला ‘Made in India’ वेब ब्राउजर JioPages, बघा याचे 5 खास फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-launched-made-in-india-jiopages-web-browser-know-5-best-features/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-launched-made-in-india-jiopages-web-browser-know-5-best-features/#respond Thu, 22 Oct 2020 13:09:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8625 Jio Pages लॉन्च करत Reliance Jio ने म्हटले आहे कि हा इंटरनेट वेब ब्राउजर Chromium Blink वर आधारित आहे जो युजर्सना सुरक्षित, फास्ट आणि कोणत्याही अडचणीविना शानदार ब्राउजिंग अनुभव देईल.

The post Reliance Jio ने लॉन्च केला ‘Made in India’ वेब ब्राउजर JioPages, बघा याचे 5 खास फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी भारत सरकारने देश मधील अनेक चीनी ऍप्स सिक्योरिटीसाठी घातक मानले होते आणि हे भारतात बॅन करण्याचे आदेश दिले होते. यात PUBG, TikTok आणि UC Browser सारखे काही लोकप्रिय ऍप्स पण होते, ज्यांचे युजर्स लाखात होते. आत्मनिर्भर भारतला प्रोत्साहन देत Reliance Jio ने भारतात आपला नवीन इंटरनेट ब्राउजर सादर केला आहे. कंपनीने हा ब्राउजर Jio Pages नावाने लॉन्च केला आहे जो पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ आहे.

Jio Pages लॉन्च करत Reliance Jio ने म्हटले आहे कि हा इंटरनेट वेब ब्राउजर Chromium Blink वर आधारित आहे जो युजर्सना सुरक्षित, फास्ट आणि कोणत्याही अडचणीविना शानदार ब्राउजिंग अनुभव देईल. जियो पेज वर फास्ट पेज लोड, इफिसिएंट मीडिया स्ट्रीमिंग, ईमोजी डोमेन सपोर्ट, चांगली वेबपेज रेंडरिंग आणि इनक्रिप्टेड कनेक्शन सारख्या शानदार सुविधा मिळतील. JioPages वेब ब्राउजर Google Play Store वर जाऊन डाउनलोड केला जाऊ शकतो.

हे आहेत खास फीचर्स :

1. Personalised Mode

Jio Pages मध्ये युजर्स आपल्या सोयीनुसार ब्राउजरची होम स्क्रीन पर्सनलाइज करू शकतात आणि कोणताही सर्च इंजन डिफाल्ट सेट करू शकतात. त्याचप्रमाणे होम स्क्रीन वर फेवरेट वेबसाइट्सची लिंक ईजी ऍक्सेससाठी पिन करता येईल. होम स्क्रीन व्यतिरिक्त युजर्स ब्राउजर थीम आणि कंटेंट पण पर्सनलाइज्ड करू शकतात. कलरफुल बॅकग्रांउड पासून डार्क मोड आणि तसेच आपल्या प्राधान्यानुसार टॉपिक आणि भाषा इत्यादी निवडू शकतात.

हे देखील वाचा : Jio, Airtel आणि Vodafone idea च्या या प्लान मध्ये मिळेल 50GB डेटा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

2. Regional Content

मेड इन इंडिया असण्याचा फायदा Jio Pages मध्ये स्पष्ट दिसेल. Reliance Jio ने हा ब्राउजर भारतीय युजर्सना लक्षात ठेऊन बनवला आहे. हा ब्राउजर 8 भारतीय भाषांना सपोर्ट करतो ज्यात हिन्दी, मराठी, तमिल, गुजराती, तेलुगू, मलयालम, कन्नड आणि बंगालीचा समावेश आहे. फक्त भाषाच नाही तर यूजर कंटेट फीड पण आपल्या क्षेत्राच्या हिशोबाने सेट करू शकतात, त्यानंतर त्या राज्याच्या बातम्या येऊ लागतील.

3. Advanced Download Manager

Jio Pages मध्ये फक्त इंटरनेट ब्राउजिंग सोप्पी झाली नाही तर कोणताही पण कंटेट किंवा फाइल डाउनलोड करणे पण खूप सोप्पे आहे. हा ब्राउजर आपोआप डाउनलोड होणाऱ्या फाइल्स त्यांच्या टाईपनुसार कॅटेगरी मध्ये विभागेल. ईमेज, व्हिडीओ, डॉक्यूमेंट आणि पेज सारख्या वेगवेगळ्या फाइल्ससाठी वेगवेगळ्या कॅटेगरी बनतील, ज्यामुळे युजर्सना फाइल मॅनेजमेंट मध्ये अडचण येणार नाही.

हे देखील वाचा : जियोने केले शक्तिप्रदर्शन, 5जी टेक्नॉलॉजीची केली यशस्वी चाचणी, लवकरच येईल Jio 5G

4. Incognito Mode

कोणताही पसर्नल सर्च किंवा खाजगी कंटेंट इंटरनेट वर शोधण्यासाठी इन्कॉग्निटो मोड वापरला जातो, जो ब्राउजिंग हिस्ट्री ब्राउजरच्या सिस्टम मध्ये सेव करत नाही. JioPages मध्ये हा इन्कॉग्निटो मोड अजून जास्त सिक्योर बनवण्यात आला आहे. रिलायंस जियोच्या या ब्राउजर मध्ये युजर्स इन्कॉग्निटो मोड 4 डिजीट पिन कोडने पण लॉक करू शकतात तसेच इन्कॉग्निटो मोडच्या ऍक्सेससाठी फिंगरप्रिंट सेंसर पण ऍक्टिव्ह करू शकतात.

5. Ad Blocker

वेगवेगळ्या वेबसाइट्स वर काही वाचण्यासाठी किंवा बघताना अनेक ऍड्स येतात, ज्या त्रासदायक असतात. JioPages मध्ये हि समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या ब्राउजर मध्ये विनाकारण ऍड आणि पॉपअप आपोआप ब्लॉक केले जातील आणि सर्च किंवा ब्राउजिंग करताना अनावश्यक ऍड्स वेबपेज वर समोर येणार नाही.

The post Reliance Jio ने लॉन्च केला ‘Made in India’ वेब ब्राउजर JioPages, बघा याचे 5 खास फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-launched-made-in-india-jiopages-web-browser-know-5-best-features/feed/ 0