Jio, Airtel आणि Vodafone idea च्या या प्लान मध्ये मिळेल 50GB डेटा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

रिलायंस जियो, एयरटेल आणि वोडाफोन आयडिया सारख्या दिग्गज टेलिकॉम कंपन्या अनेक असे स्वस्त प्लान घेऊन येतात ज्यात इंटरनेट डेटा आणि कॉलिंग दोन्ही सुविधा मिळतात. पण काही दिवसांपासुन कॉलिंग पेक्षा जास्त युजर्स डेटाची मागणी करत आहेत, जी पाहून कंपन्या पण आपल्या प्लान्स मध्ये जास्तीत जास्त डेटा ऑफर करत आहेत. इथे आम्ही तुम्हाला 50जीबी डेटा असलेल्या प्रीपेड प्लान्स बाबत माहिती देत आहोत. यातील काही प्लान असे आहेत ज्यात वैधता मिळणार नाही. पण या सर्व प्रीपेड प्लान मध्ये तुम्हाला भरपूर डेटा नक्की मिळेल.

Airtel

एयरटेल 251 रुपयांच्या प्रीपेड डेटा पॅक मध्ये 50 जीबी 4G डेटा मिळतो. हा पॅक फक्त डेटा लाभ देतो आणि टॉप-अप प्रमाणे चालतो. याची कोणतीही वैधता नाही .हा तुमच्या चालू बेस पॅकच्या वर रीचार्ज होतो, त्यामुळे याची वैधता तुमच्या बेस पॅकनुसार असेल. तुम्ही हा पॅक तुमच्या बेस पॅकच्या वैधतेच्या आधारावर वापर करू शकाल. जर तुमच्या बेस पॅकची वैधता खूप बाकी असेल तर या पॅकने रीचार्ज करणे चांगले. जर तुम्ही नवीन 251 रुपयाने पॅक रीचार्ज केला आणि काही दिवसांनी तुमच्या बेस पॅकची वैधता पण संपली तर तुमचा डेटा पॅक पण संपेल.

Reliance Jio

तसेच रिलायंस जियो पाहता जियोने आपला 251 रुपयांचा डेटा वाउचर अनेक दिवसांपासून सुरु केला होता. या पॅक मध्ये पण 251 रुपयांमध्ये आपल्या ग्राहकांना एकूण 50 जीबी इंटरनेट डेटा देते. इथे एयरटेल आणि जियो मध्ये वाउचरची किंमत आणि मिळणारे डेटा बेनिफिट एक सारखे आहेत. पण दोन्ही कंपन्यांच्या सर्विस मध्ये जो सर्वात मोठा फरक आहे, तो आहे वॅलिडिटीचा आहे. जियोचा हा डेटा वाउचर 30 दिवसांच्या वैधतेसह येतो.

हे देखील वाचा : Jio ची मोठी कामगिरी, बनली 40 कोटी ग्राहक असलेली देशातील पहिली टेलीकॉम कंपनी

Vodafone Idea

कंपनी 50 जीबी डेटा असलेले दोन प्लान ऑफर करते जे ऍड-ऑन डेटा पॅकच्या यादीत येतात. या दोन्ही पॅकची किंमत 355 रुपये आणि 251 रुपये आहे. दोन्ही प्लान मध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 50 जीबी डेटा मिळतो. जियो प्रमाणेच Vi च्या दोन्ही पॅक मध्ये वैधता दिली जात आहे. पण वोडाफोन आयडियाच्या 355 रुपयांच्या प्लान मध्ये OTT प्लॅटफॉर्म ZEE5 चा एक वर्षाचे सब्सक्रिप्शन मिळते जे 251 रुपयांच्या प्लान मध्ये मिळत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here