Kodak - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 19 Jan 2021 14:15:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 19,999 रुपयांमध्ये लॉन्च झाली हि 42 इंच डिस्प्ले असलेली शानदार अँड्रॉइड स्मार्टटीव्ही https://www.91mobiles.com/marathi/kodak-android-tv-42-inch-fhdx7xpro-launch-in-7xpro-series-price-at-rs-19-999/ https://www.91mobiles.com/marathi/kodak-android-tv-42-inch-fhdx7xpro-launch-in-7xpro-series-price-at-rs-19-999/#respond Tue, 19 Jan 2021 14:15:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9701 नवीन कोडॅक टीव्ही पाहता याचा 42 इंच मॉडेल हां फुलएचडी डिस्प्लेला सपोर्ट करतो तर 50 इंच मॉडेल अल्ट्राएचडी डिस्प्ले पॅनल वर लॉन्च केला गेला आहे.

The post फक्त 19,999 रुपयांमध्ये लॉन्च झाली हि 42 इंच डिस्प्ले असलेली शानदार अँड्रॉइड स्मार्टटीव्ही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या दोन वर्षात भारतीय टेलीविजन बाजारात मोठे बदल झाले आहेत. स्वस्त झालेल्या इंटरनेट पॅकने स्मार्ट टेलीविजन मार्केट मध्ये नवीन उभारी आणली आहे आणि कमी किंमतीत शानदार फीचर्स असलेले अँड्रॉइड टीव्ही उपलब्ध झाले आहेत. असेच स्वस्त अँड्रॉइड टेलीविजन घेऊन येणाऱ्या टेक कंपनी Kodak ने साल 2021 चा आपला पहिला प्रोडक्ट सादर करत भारतीय बाजारात नवीन स्मार्ट टेलीविजन FHDX7XPRO TV लॉन्च केला आहे जो फक्त 19,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल.

Kodak चा हा नवीन एलईडी स्मार्ट टीव्ही 7XPRO Android सीरीज अंतगर्त आला आहे. कंपनीने आपला हा स्मार्टटीव्ही दोन मॉडेल मध्ये बाजारात आणला आहे जे 42 इंच आणि 50 इंच डिस्प्लेला सपोर्ट करतात. 42-inch UHDX7XPRO TV 19,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर 50-inch UHDX7XPRO TV 29,999 रुपयांमध्ये मार्केट मध्ये आला आहे. हि नवीन Kodak HD LED TV शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

हे देखील वाचा : लॉन्चच्या आधी Motorola Nio ची लाइव इमेज झाली लीक, 6 कॅमेरा आणि पवारफुल बॅटरी सह करेल एंट्री

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

नवीन कोडॅक टीव्ही पाहता याचा 42 इंच मॉडेल हां फुलएचडी डिस्प्लेला सपोर्ट करतो तर 50 इंच मॉडेल अल्ट्राएचडी डिस्प्ले पॅनल वर लॉन्च केला गेला आहे. हा अँड्रॉइड टीव्ही क्रोमकॉस्टला सपोर्ट करतो ज्यात प्रोसेसिंगसाठी 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर काम करणारा एआएम कोर्टेक्स-ए53 क्चॉड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या स्मार्टटीव्ही मध्ये माली450 जीपीयू आहे. हा टीव्ही गुगल असिस्टेंटला सपोर्ट करतो.

Kodak चा हा नवीन एलईडी स्मार्ट टीव्ही 7XPRO Android सीरीज अंतगर्त आला आहे.

Kodak Android TV कंपनीने 2 जीबी इंटरनल रॅम वर लॉन्च केला आहे सोबत 8 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. टीव्हीचा डिस्प्ले 500 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो तर चांगल्या म्यूजिक व साउंड क्वॉलिटीसाठी या टीव्ही मध्ये 30वॉट स्पीकर आहे. या अँड्रॉइड टीव्ही मध्ये YouTube, Prime Video, Disney+ Hotstar, Sony Liv, MX player आणि Zee5 सोबतच इतर ओटीटी ऍप्स प्रीइंस्टाल्ड आहेत. नवीन अँड्रॉइड स्मार्टटीव्ही मध्ये 3 एचडीएमआई पोर्ट, 2 यूएसबी पोर्ट आणि एक 3.5एमएम हेडफोन जॅक सोबतच ए.वी. पॅनल देण्यात आला आहे.

The post फक्त 19,999 रुपयांमध्ये लॉन्च झाली हि 42 इंच डिस्प्ले असलेली शानदार अँड्रॉइड स्मार्टटीव्ही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/kodak-android-tv-42-inch-fhdx7xpro-launch-in-7xpro-series-price-at-rs-19-999/feed/ 0