Lenovo K6 Enjoy - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 तीन रियर कॅमेरा आणि नॉच डिस्प्ले सह आला Lenovo K6 Enjoy स्मार्टफोन, बघा याची किंमत आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k6-enjoy-launch-in-china-with-triple-camera/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k6-enjoy-launch-in-china-with-triple-camera/#respond Fri, 05 Apr 2019 14:30:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4031 4जीबी रॅम+64जीबी एडिशनची किंमत 1,398 युआन (जवळपास 14,398 रुपये) आहे

The post तीन रियर कॅमेरा आणि नॉच डिस्प्ले सह आला Lenovo K6 Enjoy स्मार्टफोन, बघा याची किंमत आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो ने आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे, जो Lenovo K6 Enjoy नावाने लॉन्च केला गेला आहे. बजेट कॅटगरी मध्ये आलेला हा स्मार्टफोन कंपनी ने वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि तीन कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे. पण सध्या हा चीनी मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे आणि भारतात याच्या उपलब्धतेबद्दल माहिती मिळाली नाही.

गेल्यावर्षी कंपनी ने आपल्या K5 सीरीज मध्ये स्मार्टफोन लॉन्च केला होता. अशा आहे कि यावर्षी कंपनी आपल्या K6 सीरीज मध्ये Lenovo K6, K6 Note, K6 Pro आणि K6 Play लॉन्च करेल.

किंमत आणि उपलब्धता
हॅन्डसेट कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंग मध्ये डिवाइसचा फक्त एकच वेरिएंट समोर आला आहे. यात 4जीबी रॅम+64जीबी एडिशनची किंमत 1,398 युआन (जवळपास 14,398 रुपये) आहे. स्मार्टफोन ब्लॅक आणि मिराज ब्लू कलर मध्ये येतो. याच्या ग्लोबली उपलब्धतेबद्दल पण माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा: Exclusive : ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000 एमएएच बॅटरी सह या महिन्यात लॉन्च होईल वीवो वाय5, बघा फोनचे स्पेसिफिकेशन

Lenvo K6 Enjoy चे स्पेसिफिकेशन्स
Lenovo K6 Enjoy बद्दल बोलायचे तर यात आईपीएस एलसीडी 6.22-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच डिवाइस मध्ये स्क्रीन एचडी प्लस रेजोल्यूशन 720 x 1520 पिक्सलचे आहे. हॅन्डसेट दिसायला बऱ्याच अंशी Lenovo Z5s स्मार्टफोन वाटतो जो गेल्यावर्षी लॉन्च झाला होता. तसेच डिवाइस मध्ये मिडरेंज हीलियो पी22 प्रोसेसर आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 4जीबी रॅम आणि स्टोरेज ऑप्शन- 64जीबी व 128जीबी आहेत. इतकेच नव्हे तर फोनची स्टोरेज यूजर्स माइक्रोएसडी कार्डने वाढवू पण शकतात.

हे देखील वाचा: 30 ऍप्रिल नंतर या फोन्स मध्ये चालणार नाही Facebook आणि Instagram, तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये

फोटोग्राफी साठी Lenovo K6 Enjoy मध्ये डुअल-एलईडी फ्लॅश सह ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात ऑटोफोकस सह 12-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, 5-मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सल वाला टेलीफोटो सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 10 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोन मध्ये डुअल 4जी वीओएलटीई, वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, यूएसबी-सी, 3.5एमएम ऑडियो जॅक आहेत. तसेच हॅन्डसेट एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो.

The post तीन रियर कॅमेरा आणि नॉच डिस्प्ले सह आला Lenovo K6 Enjoy स्मार्टफोन, बघा याची किंमत आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k6-enjoy-launch-in-china-with-triple-camera/feed/ 0