Exclusive : ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000 एमएएच बॅटरी सह या महिन्यात लॉन्च होईल वीवो वाय5, बघा फोनचे स्पेसिफिकेशन

गेल्या महिन्यात आम्ही माहिती दिली होती कि वीवो आपला मोबाईल पोर्टफोलियो बदलणार आहे. कंपनी नवीन सीरीजचे फोन सादर करणार आहे आणि याअंतर्गत सर्वात आधी वाय5 लॉन्च केला जाईल. पण तेव्हा या फोन्स बद्दल आम्हाला जास्त माहिती मिळाली नव्हती पण आता अजून थोडी माहिती मिळाली आहे जिच्या आधारावर फोन बद्दल बरच काही सांगता येईल. 91मोबाईल्सला हि माहिती वीवोच्या एका अधिकाऱ्याकडून मिळाली आहे ज्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हि माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितले आहे कि वीवो वाय5 या महिन्यात 15 एप्रिल नंतर कधीही लॉन्च केला जाऊ शकतो. सर्वात खास बाब अशी कि कंपनी कमी रेंज मध्ये ट्रिपल कॅमेरा असलेला फोन लॉन्च करणार आहे. ट्रिपल कॅमेरा सह फोन मध्ये मोठी बॅटरी दिली जाईल. वीवो वाय5 मध्ये तुम्हाला 5,000 एमएएच ची बॅटरी मिळेल. कंपनी सुरवातीला दोन मॉडेल घेऊन येत आहे जे एंडरॉयड 9 पाई वर चालतील. राहिला प्रश्न किंमतीचा तर हा 15,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. पण आमच्याकडे जी बातमी आहे त्यानुसार वीवो वाय5 ऐवजी वाय3 मॉडेल पण भारतात लॉन्च करणार आहे आणि हा फोन 15,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये येईल.

वीवो वाय5 चे स्पेसिफिकेशन पाहता याबाबदल अजूनतरी अधिकृत माहिती नाही मिळाली पण काल वीवोचे दोन फोन वी1901ए आणि वी1901टी चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर लिस्ट केले गेले होते ज्यात ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. आशा आहे कि हे वाय5 सीरीजचे फोन असतील. टेना वर फोनची स्क्रीन साइज आणि बॅटरीची माहिती उपलब्ध आहे. लिस्ट केल्या गेलेल्या फोन मध्ये 6.35—इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. फोनचा आकार 159.43×76.77×8.92एमएम आहे आणि यात 4,880 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. जरी हि प्रोसेसर, रॅम आणि कॅमेरा सेंसरची माहिती नसली तरी लेकिन टेना वर फोटो उपलब्ध आहे ज्यात डिजाइन स्पष्टपणे दिसत आहे. फोनच्या मागील पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे आणि वीवो वी15 प्रो स्टाइलड ट्रिपल कॅमेरा आहे.

वीवो वी1091ए आणि वीवो वी1902 नावाने दोन मॉडेल मार्च मध्ये गीकबेंच वर लिस्ट केले गेले होते तेव्हा यांचे मॉडेल नंबर समजले नव्हते पण आता आमच्याकडे माहिती उपलब्ध आहे. हा फोन वाय5 नावाने येऊ शकतो. गीकबेंच वर फोनचा प्रोसेसर आणि रॅम देण्यात आला आहे आणि याव्यतिरिक्त ओएस ची पण माहिती उपलब्ध आहे. हा फोन्स मीडियाटेक हेलिया पी35 चिपसेट सह लिस्ट करण्यात आला होता तसेच यात 4जीबी रॅम देण्यात आला होता. सोबतच दोन्ही फोन एंडरॉयड एंडरॉयड 9 पाई वर उपलब्ध होते.

एकंदरीत पाहता कंपनी या सेग्मेंट मध्ये कोरियन कंपनी सॅमसंगच्या गॅलेक्सी ए7, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 सहित इतर मॉडेलला चांगलीच टक्कर देण्याचा विचार करत आहे. याबाबत आम्ही आधीच माहिती दिली आहे कि शाओमीव्यतिरिक्त वीवो पण सॅमसंगला टक्कर देणार आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here