LG W10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 19 Feb 2020 14:59:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 3 जीबी रॅम आणि 3,450एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला एलजी चा स्वस्त स्मार्टफोन LG W10 Alpha https://www.91mobiles.com/marathi/lg-w10-alpha-launched-full-specifications-price-9999-sale/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w10-alpha-launched-full-specifications-price-9999-sale/#respond Wed, 19 Feb 2020 14:59:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6642 पावर बॅकअपसाठी LG W10 Alpha 3,450एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. एलजी चा हा नवीन फोन ब्लॅक कलर मध्ये फक्त 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 3 जीबी रॅम आणि 3,450एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला एलजी चा स्वस्त स्मार्टफोन LG W10 Alpha first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी LG ने गेल्यावर्षी भारतात नवीन स्ट्रॅटेजी सह ‘LG W’ सीरीज सादर केली होती. या सीरीजची सुरवंट करत कंपनीने भारतात एक साथ तीन नवीन फोन लॉन्च केले होते ज्यात LG W10, LG W30 आणि LG W30 Pro चा समावेश होता. एलजी ने हे स्मार्टफोन्स लो बजेट मध्ये आणले होते, जे मोबाईल यूजर्सना आवडले होते. आता आपल्या फॅन्सना भेट देत एलजी ने या सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाईस जोडला आहे. कंपनीने नवीन स्मार्टफोन LG W10 Alpha भारतात लॉन्च केला आहे जो फक्त 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LG W10 Alpha

एलजी डब्ल्यू10 अल्फा चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2.5डी ग्लास ने प्रोटेक्टेड 5.41 इंचाच्या एचडी+ रेनड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वर तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडी रुंद बॉडी देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या वर ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. LG W10 Alpha चा स्क्रीन-टू-बॉडी 86.83 टक्के आहे.

LG W10 Alpha एंडरॉयड पाई आधारित फोन आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह स्प्रेडट्रम एससी9863 चिपसेट वर चालतो. कंपनीने हा फोन 3 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी कार्डने 128 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एलजी डब्ल्यू10 अल्फा सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फ्लॅश लाईट सह बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल आकारात आहे.

फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच LG W10 Alpha सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. LG W10 Alpha डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी LG W10 Alpha 3,450एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. एलजी चा हा नवीन फोन ब्लॅक कलर मध्ये फक्त 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

विशेष म्हणजे कालच LG ने अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक साथ तीन नवीन फोन लॉन्च केले आहेत. कंपनीने LG K61, LG K51S आणि LG K41S स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. हे तीनही स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले सह क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात जो MIL-STD-810G सर्टिफाइड आहे. हे डिवाईस वेगवेगळ्या बाजारांत वेगवेगळ्या चिपसेट सह येतील. LG चे हे फोन इंडियन मार्केट मध्ये कधी येतील हे अजून समजले नाही पण एवढे नक्की आहे कि कंपनी आपले हे तिन्ही स्मार्टफोन्स मीड बजेट मध्ये आणेल.

The post 3 जीबी रॅम आणि 3,450एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला एलजी चा स्वस्त स्मार्टफोन LG W10 Alpha first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w10-alpha-launched-full-specifications-price-9999-sale/feed/ 0
फक्त 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला LG W30 Pro, 4050एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह आहे ट्रिपल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/lg-w30-pro-launch-india-price-sale-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w30-pro-launch-india-price-sale-specifications/#respond Tue, 29 Oct 2019 10:30:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5608 हा डिवाईस शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर विकत घेता येईल

The post फक्त 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला LG W30 Pro, 4050एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह आहे ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने जून मध्ये इंडियन स्मार्टफोन बाजारात नवी स्ट्रेटजी वापरत ‘LG W’ सीरीज सादर केली होती. या सीरीजची सुरवात करत कंपनीने एक साथ तीन नवीन फोन लॉन्च केले होते ज्यात LG W10, LG W30 आणि LG W30 Pro चा समावेश होता. कंपनीने LG W10 आणि LG W30 स्मार्टफोन तेव्हा देशात सेल साठी उपलब्ध केले होते, जे शॉपिंग साइट अमेझॉन सोबत रिटेल स्टोर्सवरून पण विकत घेता येतील. आता एलजी ने डब्ल्यू सीरीजच्या सर्वात पावरफुल फोन LG W30 Pro ची किंमत सांगत हा सेल साठी उपलब्ध केला आहे.

किंमत व सेल

LG W30 Pro कंपनीने 12,490 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच हा डिवाईस शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर विकत घेता येईल. कंपनीने हा फोन 4 जीबी की रॅम सह लॉन्च केला आहे. हा फोन 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

LG W30 Pro

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता एलजी डब्ल्यू सीरीजचा हा स्मार्टफोन कंपनीने 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.26-इंचाच्या एचडी+ फुलविजन डॉट नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. LG W30 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता LG W30 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा लो लाईट कॅमेरा, 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी LG W30 Pro 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: LG W सीरीज आली भारतात! लॉन्च झाले 3 नवीन फोन, Samsung-Realme-Xiaomi च्या अडचणी वाढल्या

LG W30 Pro डुअल सिम सह 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर सह येतो. पावर बॅकअप साठी LG W30 Pro मध्ये 4,050एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे LG W30 Pro स्टीरियो साउंड प्लस टेक्नोलॉजी सह येतो ज्यामुळे फोनच्या डिस्प्ले मधून आवाज येईल.

The post फक्त 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला LG W30 Pro, 4050एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह आहे ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w30-pro-launch-india-price-sale-specifications/feed/ 0
LG W सीरीज आली भारतात! लॉन्च झाले 3 नवीन फोन, Samsung-Realme-Xiaomi च्या अडचणी वाढल्या https://www.91mobiles.com/marathi/lg-w10-w30-w30-pro-official-launch-in-india-price-specifications-samsung-realme-xiaomi-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w10-w30-w30-pro-official-launch-in-india-price-specifications-samsung-realme-xiaomi-in-marathi/#respond Wed, 26 Jun 2019 11:01:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4661 LG W10 आणि LG W30 चा पहिला फ्लॅश सेल शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर येत्या 3 जुलैला होईल.

The post LG W सीरीज आली भारतात! लॉन्च झाले 3 नवीन फोन, Samsung-Realme-Xiaomi च्या अडचणी वाढल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन मार्केट साठी हे वर्ष खूप बदल घेऊन आला आहे. एकीकडे Realme आणि Xiaomi सारख्या कंपन्या आपल्या बजेट स्मार्टफोन्सच्या जीवावर लाखो यूजर्स आपल्या ब्रँडशी जोडत आहेत तर Samsung ने भारतीय बाजारासाठी खास Galaxy M सीरीज सादर करून स्मार्टफोन सेग्मेंट मध्ये मोठा बदल घडवला आहे. आता यात टेक कंपनी LG ची भर पडली आहे. LG ने पण इंडियन स्मार्टफोन बाजारात आपली योजना बदलली आहे आणि नवीन स्ट्रॅटेजी आजमावली आहे. या स्ट्रॅटेजी अंतर्गत कंपनीने भारतात अगदी नवीन ‘W’ सीरीजची सुरवात केली आहे. या स्वस्त व दमदार सीरीजची सुरवात करत कंपनीने आज भारतात एक साथ तीन नवीन फोन LG W10, LG W30 आणि LG W30 Pro लॉन्च केले आहेत.

अश्या आहेत किंमती

सर्वात आधी किंमतीबद्दल बोलायचे तर LG W10 या सीरीजचा सर्वात स्वस्त फोन आहे. कंपनीने हा डिवाईस 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. त्याचप्रमाणे LG W30 एलजीने 9,999 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे. W सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल LG W30 Pro बद्दल बोलायचे तर कंपनीने या डिवाईसची किंमत अजूनपर्यंत सांगितली नाही. हा स्मार्टफोन याइतया काही आठवड्यांत भारतात सेल साठी उपलब्ध होईल. तसेच LG W10 आणि LG W30 चा पहिला फ्लॅश सेल शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर येत्या 3 जुलैला होईल.

LG W10

LG W सीरीजच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन LG W10 बद्दल बोलायचे तर हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.19-इंचाच्या एचडी+ नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

LG W10 कंपनी द्वारा 3जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता LG W10 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे.

सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी LG W10 मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. एलजी चा हा नवीन स्मार्टफोन 4जी एलटीई व डुअल सिमला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरने सुसज्ज आहे. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी LG W10 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन देशात टुलीप पर्पल आणि स्मॉकी ग्रे कलर मध्ये विकला जाईल.

LG W30 / W30 Pro

LG W सीरीजचा हा स्मार्टफोन कंपनीने 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 6.26-इंचाच्या एचडी+ फुलविजन डॉट नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने LG W30 3जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज वर लॉन्च केला आहे तर LG W30 Pro मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: जगातील पहिला 64-एमपीचा कॅमेरा असलेला फोन आला समोर, बघा या अनोख्या फोनची पहिली झलक

एंडरॉयड 9 पाई आधारित LG W30 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. तर LG W30 Pro 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हे दोन्ही स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. LG W30 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा लो लाईट कॅमेरा, 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे W30 Pro मॉडेल 13 + 5 + 8 च्या रियर कॅमेरा सेंसर्सला सपोर्ट करतो. सेल्फी साठी या स्मार्टफोन मॉडेल्स मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: शाओमी सादर करणार आहे 5 नवीन प्रॉडक्ट, बघा स्मार्टफोन व्यतिरिक्त अजून काय काय होणार आहे लॉन्च

LG W30 आणि LG W30 Pro डुअल सिम सह 4जी एलटीई ला सपोर्ट करतात. सिक्योरिटी साठी हे फोन मॉडेल रियर फिंगरप्रिंट सेंसर सह फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतात. तसेच पावर बॅकअप साठी LG W10 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे LG W30 Pro स्टीरियो साउंड प्लस टेक्नोलॉजी सह येतो ज्यात फोनच्या डिस्प्ले मधून आवाज येईल.

The post LG W सीरीज आली भारतात! लॉन्च झाले 3 नवीन फोन, Samsung-Realme-Xiaomi च्या अडचणी वाढल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w10-w30-w30-pro-official-launch-in-india-price-specifications-samsung-realme-xiaomi-in-marathi/feed/ 0
26 जूनला येईल LG W सीरीज, Samsung आणि Xiaomi ला मिळेल जबरदस्त टक्कर https://www.91mobiles.com/marathi/lg-w-series-to-debut-in-india-on-26-june-lg-w10-triple-camera-specs/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w-series-to-debut-in-india-on-26-june-lg-w10-triple-camera-specs/#respond Fri, 21 Jun 2019 15:43:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4630 एलजी डब्ल्यू10 एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात येऊ शकतो.

The post 26 जूनला येईल LG W सीरीज, Samsung आणि Xiaomi ला मिळेल जबरदस्त टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG अनेक दिवसांपासून टेक बाजारात चर्चेत आहे. कंपनी भारतीय स्मार्टफोन बाजारासाठी नवीन स्ट्रॅटेजी बनवत आहे आणि या स्ट्रॅटेजी अंतर्गत LG W सीरीज लॉन्च केली जाईल. कंपनीने अजूनतरी या सीरीज मध्ये लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनच्या नावाचा खुलासा झाला नाही पण चर्चा अशी आहे कि एलजी डब्ल्यू सीरीज अंतर्गत लॉन्च होणार पहिला स्मार्टफोन LG W10 असेल. या स्मार्टफोनचे अनेक महत्वाच्या फीचरची माहिती कंपनीने आधीच दिली आहे. तर आज LG ने आपल्या W सीरीजची लॉन्च डेट पण सांगितली आहे. LG W सीरीज येत्या 26 जूनला भारतात येईल.

LG India ने W सीरीजची लॉन्च डेट सांगत भारतीय मीडियाला इन्वाइट पाठवले आहेत. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 26 जूनला LG दिल्लीत एका ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंट मध्ये कंपनीची W सीरीज टेक मंचावर येईल. विशेष म्हणजे हि स्मार्टफोन सीरीज संपूर्ण जगभरात सर्वात आधी भारतात लॉन्च केली जात आहे. या सीरीजची मुख्य यूएसपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि पावरफुल बॅटरी असेल जी स्वस्तात ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

असा असेल लुक

LG W10 च्या लीक झालेल्या फोटो मध्ये फोनचा ट्रिपल रियर कॅमेरा दाखवण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये दोन सेंसर ब्लॅक रिंग मध्ये आहेत तर तिसरा सेंसर रेड रिंग मध्ये दाखवण्यात आला आहे. या फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण दाखवण्यात आला आहे जो कॅमेरा सेटअपच्या बाजूला पॅनलच्या मधोमध आहे. फोनच्या बॅक पॅनल वर खाली LG ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. या फोटो मध्ये फोनचा साईड पॅनल आणि लोवर पॅनल पण दिसला आहे. फोनच्या साईड पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे तसेच त्याखाली पावर बटण आहे. LG W सीरीजच्या या आगामी स्मार्टफोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट आहे. एलजी चा हा फोन एंटिना बॅंड डिजाईन वर बनवण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

LG W10 संबंधित एका लीक मध्ये समोर आले आहे कि एलजी आपल्या डब्ल्यू सीरीजचा पहिला स्मार्टफोन 6.2-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करेल. लीक नुसार एलजी चा हा फोन एंडरॉयड 9.0 पाई वर्जन वर सादर केला जाईल. लीक नुसार LG W10 3जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल तसेच या फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. एलजी डब्ल्यू10 एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात येऊ शकतो.

विशेष म्हणजे LG India आधीच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर LG W10 चे प्रोडक्ट पेज बनवले आहे, जिथे फोन संबंधित इतर स्पेसिफिकेशन्स व माहिती उपलब्द आहे. या पेज वरून समजले आहे कि LG आपल्या W सीरीजचे स्मार्टफोन 4,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह बाजारात लॉन्च करेल. फोनच्या बॅटरी सोबत हि माहिती पण समोर आली आहे कि LG W सीरीज स्मार्टफोन एंडरॉयडच्या नवीन आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल. सोबतच प्रोसेसिंग साठी फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. या फोनचा चिपसेट 12एनएम टेकनॉलॉजी वर बनलेल्या 64बिट आर्कटेक्चर प्रोसेसिंग वर चालेल.

LG W10 ला कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये उतरवेल. LG W सीरीजने कंपनी Samsung च्या Galaxy M सीरीज आणि Xiaomi तसेच Realme सारख्या ब्रँडसना टक्कर देणार आहे. विशेष म्हणजे LG W सीरीज साठी कंपनीने शॉपिंग साइट अमेझॉनशी भागीदारी केली आहे आणि हा स्मार्टफोन या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post 26 जूनला येईल LG W सीरीज, Samsung आणि Xiaomi ला मिळेल जबरदस्त टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w-series-to-debut-in-india-on-26-june-lg-w10-triple-camera-specs/feed/ 0