26 जूनला येईल LG W सीरीज, Samsung आणि Xiaomi ला मिळेल जबरदस्त टक्कर

LG अनेक दिवसांपासून टेक बाजारात चर्चेत आहे. कंपनी भारतीय स्मार्टफोन बाजारासाठी नवीन स्ट्रॅटेजी बनवत आहे आणि या स्ट्रॅटेजी अंतर्गत LG W सीरीज लॉन्च केली जाईल. कंपनीने अजूनतरी या सीरीज मध्ये लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनच्या नावाचा खुलासा झाला नाही पण चर्चा अशी आहे कि एलजी डब्ल्यू सीरीज अंतर्गत लॉन्च होणार पहिला स्मार्टफोन LG W10 असेल. या स्मार्टफोनचे अनेक महत्वाच्या फीचरची माहिती कंपनीने आधीच दिली आहे. तर आज LG ने आपल्या W सीरीजची लॉन्च डेट पण सांगितली आहे. LG W सीरीज येत्या 26 जूनला भारतात येईल.

LG India ने W सीरीजची लॉन्च डेट सांगत भारतीय मीडियाला इन्वाइट पाठवले आहेत. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 26 जूनला LG दिल्लीत एका ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंट मध्ये कंपनीची W सीरीज टेक मंचावर येईल. विशेष म्हणजे हि स्मार्टफोन सीरीज संपूर्ण जगभरात सर्वात आधी भारतात लॉन्च केली जात आहे. या सीरीजची मुख्य यूएसपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि पावरफुल बॅटरी असेल जी स्वस्तात ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

असा असेल लुक

LG W10 च्या लीक झालेल्या फोटो मध्ये फोनचा ट्रिपल रियर कॅमेरा दाखवण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये दोन सेंसर ब्लॅक रिंग मध्ये आहेत तर तिसरा सेंसर रेड रिंग मध्ये दाखवण्यात आला आहे. या फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण दाखवण्यात आला आहे जो कॅमेरा सेटअपच्या बाजूला पॅनलच्या मधोमध आहे. फोनच्या बॅक पॅनल वर खाली LG ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. या फोटो मध्ये फोनचा साईड पॅनल आणि लोवर पॅनल पण दिसला आहे. फोनच्या साईड पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे तसेच त्याखाली पावर बटण आहे. LG W सीरीजच्या या आगामी स्मार्टफोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट आहे. एलजी चा हा फोन एंटिना बॅंड डिजाईन वर बनवण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

LG W10 संबंधित एका लीक मध्ये समोर आले आहे कि एलजी आपल्या डब्ल्यू सीरीजचा पहिला स्मार्टफोन 6.2-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करेल. लीक नुसार एलजी चा हा फोन एंडरॉयड 9.0 पाई वर्जन वर सादर केला जाईल. लीक नुसार LG W10 3जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल तसेच या फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. एलजी डब्ल्यू10 एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात येऊ शकतो.

विशेष म्हणजे LG India आधीच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर LG W10 चे प्रोडक्ट पेज बनवले आहे, जिथे फोन संबंधित इतर स्पेसिफिकेशन्स व माहिती उपलब्द आहे. या पेज वरून समजले आहे कि LG आपल्या W सीरीजचे स्मार्टफोन 4,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह बाजारात लॉन्च करेल. फोनच्या बॅटरी सोबत हि माहिती पण समोर आली आहे कि LG W सीरीज स्मार्टफोन एंडरॉयडच्या नवीन आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल. सोबतच प्रोसेसिंग साठी फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. या फोनचा चिपसेट 12एनएम टेकनॉलॉजी वर बनलेल्या 64बिट आर्कटेक्चर प्रोसेसिंग वर चालेल.

LG W10 ला कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये उतरवेल. LG W सीरीजने कंपनी Samsung च्या Galaxy M सीरीज आणि Xiaomi तसेच Realme सारख्या ब्रँडसना टक्कर देणार आहे. विशेष म्हणजे LG W सीरीज साठी कंपनीने शॉपिंग साइट अमेझॉनशी भागीदारी केली आहे आणि हा स्मार्टफोन या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here