LG W31 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 09 Nov 2020 12:34:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 नॉन-चायनीज कंपनीने लॉन्च केले तीन धमाकेदार लो बजेट स्मार्टफोन, किंमत 9,490 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/lg-w11-w31-and-w31-launched-in-india-at-affordable-prices/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w11-w31-and-w31-launched-in-india-at-affordable-prices/#respond Mon, 09 Nov 2020 12:34:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8863 एलजी इलेक्ट्रॉनिक्सने भारतात W-सीरीजचा विस्तार करत तीन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. हे फोन्स कंपनीने LG W11, LG W31 आणि LG W31+ नावाने सादर केले आहेत.

The post नॉन-चायनीज कंपनीने लॉन्च केले तीन धमाकेदार लो बजेट स्मार्टफोन, किंमत 9,490 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एलजी इलेक्ट्रॉनिक्सने भारतात W-सीरीजचा विस्तार करत तीन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. हे फोन्स कंपनीने LG W11, LG W31 आणि LG W31+ नावाने सादर केले आहेत. तिन्ही फोन्स बजेट कॅटेगरी मध्ये आले आहेत. तिन्ही फोन सिंगल कलर ऑप्शन सह आले आहेत. एलजी W31 आणि W31 + दोन्ही जवळपास एक सारखे आहेत. या दोन्ही फोन मध्ये फक्त स्टोरेज वेगवेगळी आहे.

LG W11 चे स्पेसिफिकेशन्स

LG W11 मध्ये 6.52-इंचाचा HD + फुलविजन डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबतच हा फोन 2.0GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर वर चालतो. कंपनीने डिवाइस मध्ये वापर केलेल्या चिपसेटच्या नावाचा खुलासा केला नाही. फोन 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह स्टोरेज सह आला आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी LG W11 मध्ये 13 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे आणि सोबत 2 मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा पण आहे. फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी पण देण्यात आली आहे. तसेच फोन अँड्रॉइड 10. वर चालतो.

हे देखील वाचा : सॅमसंगला टक्कर देण्याच्या विचारात LG, घेऊन येत आहे अजून एक अनोखा फोन

LG W31/W31+ चे स्पेसिफिकेशन्स

LG W31 मध्ये 6.52-इंचाचा HD + डिस्प्ले मिळतो आणि हा पण एका निनावी 2.0GHz ओक्टा-कोर SoC वर चालतो. W31 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह येतो, तर W31 + मध्ये 128GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही मॉडेलची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. डिवाइस मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4,000mAh ची बॅटरी आहे.

हे देखील वाचा : 64MP कॅमेरा आणि 6GB रॅम सह लॉन्च झाला नॉन-चायनीज LG K92 5G, जाणून घ्या याची किंमत

फोटोग्राफीसाठी LG W31 / W31 + मध्ये मागे 13MP चा मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ सेंसर आणि 5MP वाइड-अँगल लेंस आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 8MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. फोन एंड्रॉइड 10 वर चालतो आणि एलजी डब्ल्यू 11 प्रमाणे Google असिस्टंट बटन यात मिळतो.

LG W11, W31, W31 + की किंमत आणि उपलब्धता

भारतात LG W11 ची किंमत 9,490 रुपये आहे आणि हा 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज सह येतो. LG W31 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह 10,990 रुपयांमध्ये येतो तर W31 + 4GB + 128GB कॉन्फिगरेशन मध्ये येतो ज्याची किंमत 11,990 रुपये आहे. फोन नोव्हेंबर मध्ये विक्रीसाठी मिडनाइट ब्लू कलर मध्ये उपलब्ध होतील. एलजीने ठराविक रिलीज डेटचा खुलासा केला नाही.

The post नॉन-चायनीज कंपनीने लॉन्च केले तीन धमाकेदार लो बजेट स्मार्टफोन, किंमत 9,490 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w11-w31-and-w31-launched-in-india-at-affordable-prices/feed/ 0