सॅमसंगला टक्कर देण्याच्या विचारात LG, घेऊन येत आहे अजून एक अनोखा फोन

LG अनेक दिवसांपासून डुअल स्क्रीन असलेले फोन्स सादर करत आहे. अलीकडेच कंपनीने आपला अनोखा डिजाइन असलेला LG Wing सादर केला होता. आता बातमी समोर येत आहे कि कंपनी Rollable नावाच्या नवीन एक्सपेरिमेंट रोलेबल स्मार्टफोन वर काम करत आहे. LG ने EUIPO (यूरोपियन यूनियन इन्टलेक्चुअल प्रोपर्टी ऑफिस) सोबत मिळून नावासाठी एक ट्रेडमार्क फाइल केले आहे. ट्रेडमार्कचा अर्थ असा नाही कि कंपनी याचा वापर स्मार्टफोनच्या नावात करेल, हे फक्त हा शब्द सुरक्षित करण्याचा प्रयत्न पण असू शकतो. बोलले जात आहे कि हा एलजीच्या “Explorer Project” चा दुसरा स्मार्टफोन असेल.

तसेच काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यात सांगण्यात आले आहे कि हा रोलेबल फोन मार्च 2021 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. पण ट्रेडमार्कमुळे फोनबाबत जास्त काही माहिती समोर आली नाही. Mitscherlich ने हा अर्ज 2 नोव्हेंबरला केला होता, हि एक जर्मन कंपनी आहे जी LG कडून ट्रेडमार्क फाइल करते. या ट्रेडमार्क लिस्टिंगची माहिती सर्वप्रथम LetsGoDigital द्वारे देण्यात आली होती.

हे देखील वाचा : 64MP कॅमेरा आणि 6GB रॅम सह लॉन्च झाला नॉन-चायनीज LG K92 5G, जाणून घ्या याची किंमत

वर सांगितल्याप्रमाणे हा फोन एलजीच्या एक्सपेरिमेंटल एक्सप्लोरर प्रोजेक्टचा दुसरा स्मार्टफोन असू शकतो. याआधी कंपनीने या प्रोजेक्ट अंतगर्त सप्टेंबर मध्ये डुअल-स्क्रीन असलेला LG Wing स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

एलजी विंग

यात 6.8 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,460 पिक्सल) पी-ओलेड फुलविजन पॅनल आहे. हि प्राइमरी स्क्रीन आहे. सेकेंडरी स्क्रीन 3.9 इंचाची आहे. हा फुल-एचडी+ (1,080×1,240 पिक्सल) जी-ओलेड पॅनल आहे. प्राइमरी स्क्रीन 20.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेली आहे. पिक्सल डेनसिटी 395 पीपीआई आहे.

हे देखील वाचा : LG Velvet भारतात लॉन्च, ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह इतकी दमदार डिजाईन कि पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन

तसेच एलजी विंग मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765जी प्रोसेसर देण्यात आला आहे. डिवाइस मध्ये 8 जीबी रॅम आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे, एफ/ 1.8 अपर्चर सह सेकेंडरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे, एफ/ 1.9 अल्ट्रा वाइड अँगल लेंस आहे. तसेच यात 12 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here