LG W41 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 22 Feb 2021 11:41:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एलजीने लॉन्च केले तीन नवीन फोन LG W41, W41+ आणि W41 Pro, शानदार स्पेसिफिकेशन्ससह येत आहेत हे नॉन चीनी हँडसेट https://www.91mobiles.com/marathi/lg-w41-plus-pro-series-launched-in-india-mediatek-helio-g35-soc-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w41-plus-pro-series-launched-in-india-mediatek-helio-g35-soc-price-specifications/#respond Mon, 22 Feb 2021 11:41:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10119 LG च्या W41, W41+ आणि W41 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता यांचे सर्व फीचर्स अगदी एकसारखे आहेत. यात 6.5-इंचाच्या एचडी+ फुल विजन डिस्प्लेसह 20:9 आसपेक्ट रेश्यो देण्यात आला आहे.

The post एलजीने लॉन्च केले तीन नवीन फोन LG W41, W41+ आणि W41 Pro, शानदार स्पेसिफिकेशन्ससह येत आहेत हे नॉन चीनी हँडसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दक्षिण कोरियन ब्रँड LG ने आज भारतात आपली नवीन बजेट सेगमेंट मधील W41 सीरीज सादर केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीने तीन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत, ज्यात एलजी डब्ल्यू 41, डब्ल्यू 41 + आणि डब्ल्यू 41 प्रो चा समावेश आहे. तिन्ही फोन स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइनच्याबाबतीत जवळपास एकसारखे आहेत. फक्त रॅम व स्टोरेजच्याबाबतीत थोडे वेगळे आहेत. जसे कि तिन्ही मॉडेल 6.5-इंचाचा HD + पंच-होल डिस्प्ले आणि 48MP क्वाड कॅमेरा सेटअपसह येतात. (lg w41 plus pro series launched in india mediatek helio g35 soc price specifications)

डिजाइन

एलजी W41 सीरीजमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी एक पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. तर मागे क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर फोनमध्ये उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. तसेच हँडसेट मध्ये एक गुगल असिस्टंट बटन आहे.

स्पेसिफिकेशन्स

LG च्या W41, W41+ आणि W41 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता यांचे सर्व फीचर्स अगदी एकसारखे आहेत. यात 6.5-इंचाच्या एचडी+ फुल विजन डिस्प्लेसह 20:9 आसपेक्ट रेश्यो देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 2.3GHz ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G35 SoC आहे.

हे देखील वाचा : मिलिट्री ग्रेड सुरक्षेसह LG K42 फक्त 10,990 रुपयांमध्ये झाला लाॅन्च, पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन

त्याचबरोबर डिवाइस अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम आणि 4G कनेक्टिविटीसह डुअल सिमला सपोर्ट करतात. LG W41 सीरीजमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगसह येते. यात चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सीप पोर्ट आहे. सोबत सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोन मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

एलजी W41 लाइनअपच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 48MP प्राइमरी सेंसर, 8MP अल्ट्रा-वाइड सेंसर, 2MP डेप्थ आणि 5MP मॅक्रो सेंसरसह एलईडी फ्लॅश आहे. इतकेच नव्हे तर या फोन्समध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, गुगल असिस्टंट, आणि स्टॅंडर्ड कनेक्टिविटी ऑप्शन जसे कि बल्टूथ v5.0 आणि वाय-फाय आहे. स्मार्टफोनचा आकार 166.5 x 77.3 x 9.3 (mm) आणि वजन 201 ग्राम आहे.

हे देखील वाचा : 10,000 रुपयांनी स्वस्त झाला सर्वात अनोखा फोन LG Wing, जाणून घ्या नवीन किंमत

किंमत

वर सांगितल्याप्रमाणे या सीरीज मध्ये सादर करण्यात आलेल्या फोन्स मध्ये एकमेव फरक रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनचा आहे. या सीरीजची बेस किंमत 13,490 रुपये आहे. कंपनीने अजूनही सर्व मॉडेल्सच्या वेगवेगळ्या किंमतींचा खुलासा केला नाही. तसेच, LG W41 मध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. LG W41+ आणि LG W41 Pro मध्ये क्रमश: 4GB + 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.

The post एलजीने लॉन्च केले तीन नवीन फोन LG W41, W41+ आणि W41 Pro, शानदार स्पेसिफिकेशन्ससह येत आहेत हे नॉन चीनी हँडसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w41-plus-pro-series-launched-in-india-mediatek-helio-g35-soc-price-specifications/feed/ 0