मिलिट्री ग्रेड सुरक्षेसह LG K42 फक्त 10,990 रुपयांमध्ये झाला लाॅन्च, पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन

LG ने भारतीय बाजारात अपना प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन LG K42 लाॅन्च केला आहे. एलजी के42 ने लो बजेट सेग्मेंट मध्ये एंट्री घेतली आहे जो फक्त 10,990 रुपयांमध्ये लाॅन्च झाला आहे. 4,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन MIL-STD-810G सर्टिफिकेशनसह बाजारात सादर केला गेला आहे, त्यामुळे हा इतर स्मार्टफोन्सच्या तुलनेत मजबूत असल्याचे समजते.

एलजी के42 चे स्पेसिफिकेशन्स चांगले आहेत पण MIL-STD-810G सर्टिफाइड असल्यामुळे हा इतर फोन्स पेक्षा वेगळा ठरतो. याला मिलिट्री ग्रेड सर्टिफिकेशन पण म्हटले जाते, ज्यात फोनचे बाहेरील आवरण याला थंड आणि गरम हवामानापासून वाचवते, तसेच स्क्रॅच पासून वाचवते. फक्त इतकेच नव्हे तर जमिनीवर पडल्यावर किंवा कुठेही धडकल्यावर पण फोनचे नुकसान होत नाही. या फोनचे डायमेंशन 76.7 x 165.0 x 8.4एमएम तसेच वजन 182ग्राम आहे.

LG K42 हा एक मिल्ट्री ग्रेड फोन आहे.

LG K42

एलजी के42 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. स्क्रीनच्या दोन्ही बाजू बेजल लेस आहेत तर वरच्या आणि खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे. हा फोन 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : सॅमसंगला टक्कर देण्याच्या विचारात LG, घेऊन येत आहे अजून एक अनोखा फोन

LG K42 अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो एलजी यूएक्स वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. एलजीचा हा नवीन फोन 3 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता पण येईल.

LG K42 मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एलजी के42 चौकोनी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्या सोबत 5 मेगापिक्सलची सुपर वाइड लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी सह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, किंमत 7,000 रुपयांपेक्षा पण कमी

LG K42 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. एलजीने आपला फोन गुगल असिस्टंट, गुगल लेंस सारख्या फीचर्ससह बाजारात आणला आहे. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोन मध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे, तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी एलजी के42 मध्ये 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here