Meizu C9 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 05 Dec 2018 13:20:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6जीबी रॅम व इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह लॉन्च झाला मीजू 16टीएच, याच्या फर्स्ट लुक वरच व्हाल तुम्ही फिदा https://www.91mobiles.com/marathi/meizu-m16th-launched-in-india-c9-m6t-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-m16th-launched-in-india-c9-m6t-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 05 Dec 2018 13:20:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3061 मीजू16टीएच मूनलाईट व्हाईट आणि मीडनाईट ब्लॅक कलर मध्ये 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 6जीबी रॅम व इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह लॉन्च झाला मीजू 16टीएच, याच्या फर्स्ट लुक वरच व्हाल तुम्ही फिदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मीजू ने आज भारतात आपले स्मार्टफोन्स वाढवत एक साथ तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने मीजू एम6टी, मीजू सी9 आणि मीजू 16टीएच भारतीय बाजारात आणले आहेत. मीजू सी9 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे तर मीजू एम6टी कंपनी ने 7,999 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे. मीजू 16टीच कंपनी द्वारा आज लॉन्च केलेल्या तिन्ही स्मार्टफोन्स मध्ये सर्वात पावरफुल आणि महाग स्मार्टफोन आहे. हा फोन डिसेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

कंपनीने हा फोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला आहे. या फोन मध्ये 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.0-इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला जो ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. मीजू 16टीएच एंडरॉयड आधारित कंपनीच्या ओएस फ्लेम 7 वर सादर करण्यात आला आहे जो आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालतो.

मीजू ने हा फोन 6जीबी रॅम वर सादर केला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू आहे. कपंनी ने या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मीजू 16टीएच डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.6 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

मीजू16टीएच डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी मीजू ने आपल्या या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे, म्हणजे या फोनच्या डिस्प्ले वर टच करून हा फोन अनलॉक होईल. तसेच पावर बॅकअप साठी मीजू 16टीच मध्ये 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. मीजू16टीएच मूनलाईट व्हाईट आणि मीडनाईट ब्लॅक कलर मध्ये 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 6जीबी रॅम व इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह लॉन्च झाला मीजू 16टीएच, याच्या फर्स्ट लुक वरच व्हाल तुम्ही फिदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-m16th-launched-in-india-c9-m6t-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
शाओमीला टक्कर देण्यासाठी मीजू ने भारतात लॉन्च केले दोन स्वस्त व शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/meizu-c9-m6t-m16th-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-c9-m6t-m16th-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 05 Dec 2018 11:54:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3059 मीजू एम6टी ब्लॅक व गोल्ड कलर वेरिएंट मध्ये 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर मीजू सी9 ब्लॅक व रोज गोल्ड कलर वेरिएंट मध्ये 5,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post शाओमीला टक्कर देण्यासाठी मीजू ने भारतात लॉन्च केले दोन स्वस्त व शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मीजू ने बरेच दिवस भारतात कोणताही स्मार्टफोन लॉन्च केला नव्हता. आता याला शाओमी सारख्या इतर चिनी कंपन्यांचा वाढता दबदबा म्हणायचे की मीजू ची स्ट्रेटजी, पण कंपनीच्या फोन लॉन्च आगीत कारण म्हणजे मीजूची फॅन फॉलोइंग कमी होत होती. पण आपल्या फॅन्सना भेट देत व इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये आपले स्थान टिकवत मीजू ने आज भारतात एक साथ तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. मीजू ने मीजू एम6टी, मीजू सी9 आणि मीजू 16टीएच भारतीय बाजारात आणले आहेत.

मीजू एम6टी
मीजू ने आपला हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह आणला आहे. या फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.7-इंचाचा एचडी+ ​डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो सह कंपनीच्या आॅपरेटिंग सिस्टम फ्लेम 6 सह सादर करण्यात आला आहे जो मीडियाटेक एमटी6750 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली-टी860 जीपीयू आहे. कंपनीने या फोन मध्ये 3जीबी रॅम दिला आहे.

मीजू एम6टी 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी साठी या फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम व 4जी वोएलटीई सपोर्ट सोबत मीजू एम6टी च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर​ देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,300एमएएच ची बॅटरी आहे.

मीजू सी9
मीजू द्वारा आज लॉन्च केलेल्या तिन्ही फोन मध्ये हा सर्वात स्वस्त फोन आहे. मीजू सी9 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.45-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड ओरियो वर सादर केला गेला आहे जो 1.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सह स्नॅपड्रॅगॉन एससी9832ई चिपसेट वर चालतो. त्याचप्रमाणे ग्राफिक्स साठी हा फोन माली टी820 एमपी1 जीपीयू ला सपोर्ट करतो.

कंपनी ने हा फोन 2जीबी रॅम व 16जीबी इंटरनल स्टोरेज वर सादर केला आहे जी कार्ड द्वारे 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत मीजू सी9 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

मीजू एम6टी ब्लॅक व गोल्ड कलर वेरिएंट मध्ये 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर मीजू सी9 ब्लॅक व रोज गोल्ड कलर वेरिएंट मध्ये 5,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.
मीजू 16टीएच च्या स्पेसिफिकेशन्स व किंमतीसाठी (इथे क्लिक करा)

The post शाओमीला टक्कर देण्यासाठी मीजू ने भारतात लॉन्च केले दोन स्वस्त व शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-c9-m6t-m16th-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0