mercedes benz amg - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 26 Aug 2022 13:29:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फुल चार्जमध्ये 586km ची रेंज! इतकी आहे Mercedes च्या शक्तिशाली इलेक्ट्रिक कारची किंमत https://www.91mobiles.com/marathi/mercedes-amg-eqs-53-performance-ev-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/mercedes-amg-eqs-53-performance-ev-launched-in-india/#respond Sun, 28 Aug 2022 03:28:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12546 भारतीय कार बाजारात हाय रेंज असलेल्या इलेक्ट्रिक कार्स लाँच होण्याची मालिका सुरूच आहे. मर्सिडीज बेंज इंडियानं आपलं नवीन AMG EQS 53 परफॉर्मन्स इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) लाँच केलं आहे. ही इलेक्ट्रिक कार फक्त 3.4 सेकंदांत 0-100 किमी ताशी वेग गाठू शकते. तसेच या इलेक्ट्रिक कारचा टॉप स्पीड ताशी 250 किमी आहे. मिळते 586 km ची रेंज […]

The post फुल चार्जमध्ये 586km ची रेंज! इतकी आहे Mercedes च्या शक्तिशाली इलेक्ट्रिक कारची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय कार बाजारात हाय रेंज असलेल्या इलेक्ट्रिक कार्स लाँच होण्याची मालिका सुरूच आहे. मर्सिडीज बेंज इंडियानं आपलं नवीन AMG EQS 53 परफॉर्मन्स इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) लाँच केलं आहे. ही इलेक्ट्रिक कार फक्त 3.4 सेकंदांत 0-100 किमी ताशी वेग गाठू शकते. तसेच या इलेक्ट्रिक कारचा टॉप स्पीड ताशी 250 किमी आहे.

मिळते 586 km ची रेंज

Mercedes AMG EQS 53 मध्ये 107.8kWh लीथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे, ही 200 kWh पर्यंतच्या फास्ट चार्जसह येते. AMG EQS 53 ची WLTP रेंज सामान्य परिस्थितीमध्ये 580 किलोमीटर पर्यंत आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीत, AMG EQS 53 ब्रँडच्या नावाला साजेशी कामगिरी करते. ही कार 762 hp ची पावर जेनरेट करते. Mercedes-Benz AMG EQS 53 कारचा टॉप स्पीड ताशी 250 किमी आहे आणि ही फक्त 3.4 सेकंदांत 0 ते 100 किमी ताशी वेग गाठू शकते. या कारची किंमत 2.45 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. ही कंपनीची देशातील दुपारी EV आहे, जिची किंमती सध्या उपलब्ध असलेल्या EQC इलेक्ट्रिक कार पेक्षा 1.46 कोटी जास्त आहे. सध्या ही कर देशात CBU पद्धतीनं सादर करण्यात आली आहे. हे देखील वाचा: 5G सर्व्हिसबद्दल सरकारची मोठी घोषणा, सांगितली लाँच डेट!

Mercedes-AMG EQS EV फक्त 19 मिनिटं चार्ज झाल्यावर 300 किलोमीटरची रेंज देते. परफॉर्मन्स इलेक्ट्रिक सेडान 6-पिस्टन कॅलिपर्ससह एएमजी हाय-परफॉर्मन्स कंपाउंड ब्रेक सिस्टमसह येते. ब्रेकमध्ये आय-बूस्टर फंक्शन देखील आहे, जे ब्रेकिंग कुशलरित्या हायड्रॉलिक ब्रेकसह इलेक्ट्रिक रिकव्हरी जोडू शकतं. हे देखील वाचा: 6,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला 6GB RAM असलेला स्वस्त OPPO फोन, 5000 mAh बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा

फीचर्स पाहता नवीन Mercedes-AMG EQS EV मध्ये मल्टी-लिंक फ्रंट आणि रियर सस्पेंशन मिळतात. यात रियर एक्सल बीम आणि सबफ्रेम आणि मोटर माउंटिंग दोन्ही कंपोनेंट्सवर नव्यानं काम करण्यात आलं आहे. यात एएमजीचा राइड कंट्रोल + एयर सस्पेंशन देखील देखील आहे, जो इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल्ड अ‍ॅक्टिव्ह डॅम्पर्स आणि रियर-एक्सल स्टीयरिंगसह सयुंक्तरिया चालतो. नवीन EQS मध्ये कंपनीनं स्टँडर्ड 21-इंचाच्या टायर्स आणि हाय-परफॉर्मन्स AMG ब्रेक दिले आहेत. तसेच यात सिरॅमिक ब्रेकचा पर्याय देखील उपलब्ध आहे. Mercedes-AMG EQS 53 4Matic+ मध्ये अनेक AMG ड्रायविंग मोड्स मिळतात जे सस्पेंशन, हँडलिंग, पावर डिलिव्हरी आणि बॅटरी मॅनेजमेंटसह सिंथेसाइज्ड साउंड अ‍ॅडजस्ट करतात. ही कार महाग असली तरी हिची रेंज आणि फीचर्स जबरदस्त आहेत .

The post फुल चार्जमध्ये 586km ची रेंज! इतकी आहे Mercedes च्या शक्तिशाली इलेक्ट्रिक कारची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mercedes-amg-eqs-53-performance-ev-launched-in-india/feed/ 0