मोठी बातमी: BSNL चे मोबाइल टॉवर खरेदी करणार Jio; सरकारी कंपनी विकणार 13,000 पेक्षा जास्त Telecom Tower

भारत सरकारची टेलीकॉम कंपनी Bharat Sanchar Nigam Limited म्हणजे BSNL 10,000 Mobile towers विकण्याची योजना बनवत आहे. हे मोबाइल टॉवर देशात कार्यरत असलेल्या प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्यांना विकले जातील ज्यात अंबानींच्या Reliance Jio सह Airtel आणि Vi च्या नावांचा समावेश असेल. बीएसएनएलचे मोबाइल टॉवर national monetisation pipeline (NMP) अंतगर्त विकण्याची योजना आहे त्यामुळे सरकारला जवळपास 4,000 कोटी रुपयांची कमाई होण्याची शक्यता आहे.

ईटीच्या रिपोर्टनुसार भारत संचार निगम लिमिटेडचे मोबाइल टॉवर विकण्याची योजना सरकारद्वारे बनवली जात आहे. हे मोबाइल टॉवर देशात मॉनिटायजेशन अंतगर्त प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्यांना विकले जातील आणि यातून सरकारला 4 हजार कोटी रुपयांचं महसूल मिळेल. रिपोर्टनुसार या लिलावसाठी KPMG ची नेमणूक आर्थिक सल्लागार म्हणून केली जाईल. हे देखील वाचा: 200 रुपयांत 3 महिन्यांच्या रिचार्ज; BSNL चे 90 दिवसांचे बेस्ट रिचार्ज पॅक, कॉलिंगसह डेटा फ्री

BSNL Tower ची होणार विक्री

ही भारतातील एकमेव टेलीकॉम कंपनी आहे जी संपूर्ण देशात सक्रिय आहे. बीएसएनएलकडे सध्या जवळपास 68,000 टेलीकॉम टॉवर असल्याची माहिती मिळाली आहे. यात मुंबई आणि दिल्ली सर्कल्समधील टॉवर्सचा समावेश केलेला नाही. नॅशनल मॉनिटायजेशन स्कीम अंतर्गत आर्थिक वर्ष 2025 पर्यंत बीएसएनएलचे 13,567 टेलीकॉम टॉवर विकले जातील. तसेच दिल्ली व मुंबई मधील 1350 एमटीएनएल टॉवर देखील स्कीम अंतगर्त विकले जातील.

BSNL 4G Services

5G in India चं लवकरच सत्यात येणार आहे. एकीकडे Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्या 5G Services लाँच करण्याची तयारी करत आहेत, तर दुसरीकडे देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलला अजूनही संपूर्ण देशात आपलं 4G Network देखील सुरु करता आलं नाही. संसाधनांच्या अभावात असलेल्या बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय कॅबिनेटनं अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार BSNL ला मोठी आर्थिक मदत केली जाईल, तसेच कंपनी देशात नवीन मोबाईल टॉवर उभारून दुर्गम भागात आपली 4G Services सुरु करेल. हे देखील वाचा: Jio-Airtel ची डोकेदुखी वाढवणारी BSNL ची जबरदस्त ऑफर; या दोन रिचार्जवर मिळतोय अतिरिक्त 75GB डेटा

दूरसंचार मंत्री अश्वनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की, कॅबिनेटच्या निर्णयानंतर आता देशातील 24,680 गावांमध्ये BSNL 4G Services देण्यात येईल. या भागांमध्ये 4जी सर्व्हिस देण्यासाठी कंपनीला 26,316 कोटी रुपयांच्या पॅकेजची मंजूरी देण्यात आली आहे. फक्त इतकेच नव्हे तर 6,279 अशा गावांची निवड करण्यात आली आहे जिथे सध्या 2G आणि 3G सर्व्हिसच उपलब्ध आहे, या गावांमधील नेटवर्क आता 4जी वर अपग्रेड करण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार देशात 4जी सेवा चालू करण्यासाठी तसेच सर्व्हिस सुधारण्यासाठी बीएसएनएल 19,722 नवीन मोबाईल टॉवर देखील उभारेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here