Mi 10i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 04 Jan 2021 12:43:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi Mi 10i 5G उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून कशाप्रकारे बघता येईल लाईव आणि कसे असतील स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-5g-india-launch-how-to-watch-live-know-specs-feature-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-5g-india-launch-how-to-watch-live-know-specs-feature-price-sale/#respond Mon, 04 Jan 2021 12:43:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9521 Xiaomi Mi 10i कंपनी ऑनलाईन पद्धतीने लॉन्च करणार आहे. हा ईवेंट उद्या म्हणजे 5 जानेवारीला दुपारी 12 वाजता सुरु होईल.

The post Xiaomi Mi 10i 5G उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून कशाप्रकारे बघता येईल लाईव आणि कसे असतील स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi उद्या भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Mi 10i लॉन्च करणार आहे. ‘मी सीरीज’ कंपनीने सप्टेंबर मध्ये टेक मंचावर सादर केली होती ज्यात Xiaomi Mi 10T, Xiaomi Mi 10T Pro आणि Xiaomi Mi 10T Lite लॉन्च झाले होते. शाओमी मी 10आय सह कंपनी भारतात पण हि सीरीज वाढवत आहे. फोन लॉन्चच्या आधीच शाओमीने Mi 10i च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती दिली आहे, त्यावरून वाटत आहे कि शाओमी मी 10आय एक पावरफुल फोन असेल.

सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो कि Xiaomi Mi 10i कंपनी ऑनलाईन पद्धतीने लॉन्च करणार आहे. हा ईवेंट उद्या म्हणजे 5 जानेवारीला दुपारी 12 वाजता सुरु होईल. या लॉन्च ईवेंटचे थेट प्रक्षेपण केले जाईल जे शाओमी इंडियाच्या अधिकृत वेबसाइट सोबतच कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर बघता येईल. शॉपिंग साइट अमेझॉन वर पण शाओमी मी 10आय चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे आणि शाओमी फॅन्स या पेज वर पण लॉन्च ईवेंट लाईव बघू शकतात.

Xiaomi Mi 10i

शाओमी मी 10आय ची माहिती पाहता कंपनीने फोनच्या रियर पॅनलचे फोटोज इंटरनेट वर शेयर केले आहेत पण आतापर्यंत फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला नाही. त्यामुळे फोन डिस्प्ले बद्दल काही ठोस माहिती मिळाली नाही पण लेटेस्ट ट्रेंड आणि बजेट सेग्मेंट पाहता आशा व्यक्त केली जात आहे कि हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल जो फुलएचडी+ रेज्ल्यूशन सह येऊ शकतो. हा फोन Atlantic blue आणि Pacific Sunrise रंगात समोर आला आहे.

हे देखील वाचा : 7 जानेवारीला लॉन्च होईल 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Realme V15

मी 10आय च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो पॅनलच्या मध्यवरील रिंग मध्ये आहे. या सेटअप मध्ये दोन सेंसर वर आणि दोन सेंसर खाली आहेत. तसेच सेटअपच्या बाहेर डावीकडे फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वरून फिंगरप्रिंट सेंसर गायब आहे तसेच खालच्या बाजूला Mi लोगो आणि 5G लिहिण्यात आले आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे.

Xiaomi Mi 10i बद्दल कंपनीने सांगितले आहे कि हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट वर लॉन्च केला जाईल जो र्कोटेक्स ए-77 सीपीयू वर चालतो. हा चिपसेट 5जी कनेक्टिविटी सह येतो, म्हणजे शाओमी मी 10आय एक 5जी फोन असेल. शाओमीने याची अधिकृत घोषणा केली आहे कि मी 10आय 108 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. Xiaomi Mi 10i च्या इतर सर्व स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती उद्या फोन लॉच झाल्यानंतर त्वरित दिली जाईल.

The post Xiaomi Mi 10i 5G उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून कशाप्रकारे बघता येईल लाईव आणि कसे असतील स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-5g-india-launch-how-to-watch-live-know-specs-feature-price-sale/feed/ 0
8 जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट सह Xiaomi Mi 10i वेबसाइट वर लिस्ट, लवकरच होईल भारतात लाॅन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-on-geekbench-m2007j17i-8-gb-ram-snapdragon-750g-soc/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-on-geekbench-m2007j17i-8-gb-ram-snapdragon-750g-soc/#respond Thu, 10 Dec 2020 14:36:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9262 Xiaomi Mi 10i ची हि लिस्टिंग काल म्हणजे 9 डिसेंबरची आहे जिथे फोन M2007J17I मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे.

The post 8 जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट सह Xiaomi Mi 10i वेबसाइट वर लिस्ट, लवकरच होईल भारतात लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi बद्दल गेल्या अनेक दिवसांपासून बातमी येत होती कि कंपनी भारतात आपल्या ‘मी 10 सीरीज’ चा विस्तार करण्याची योजना बनवत आहे आणि याअंतर्गत Mi 10i स्मार्टफोन लाॅन्च केला जाईल. कंपनीने आतापर्यंत स्पष्ट केले नाही कि हा मोबाईल फोन कधी भारतीय बाजारात एंट्री गेहींल पण शाओमी मी 10आय च्या घोषणेच्या आधी हा स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट वर लिस्ट झाला आहे जिथे लाॅन्च डेट समोर येण्याआधी या च्या फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. या लिस्टिंग नंतर आशा आहे कि Xiaomi Mi 10i लवकरच भारतात येणार आहे.

Xiaomi Mi 10i ची हि लिस्टिंग काल म्हणजे 9 डिसेंबरची आहे जिथे फोन M2007J17I मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. गीकबेंच वर मी 10आय एंडराॅयड 10 ओएस सह दाखवण्यात आला आहे त्यासोबत 8 जीबी रॅम देण्यात आला आहे. लिस्टिंग नुसार हा फोन 1.80गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करेल त्यासोबतच क्वाॅलकाॅमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट वर चालेल. या फोनला सिंगल-कोर मध्ये 652 आणि मल्टी-कोर मध्ये 2004 बेंचमार्क स्कोर मिळाला आहे.

Xiaomi Mi 10i

बोलले जात आहे कि भारतात येणारा मी 10आय स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये लाॅन्च झालेल्या Mi Note 10 Lite चा रि-ब्रँडिड वर्जन असेल. मी नोट 10 लाइट 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.47 इंचाच्या फुलएचडी+ 3डी कर्व्ड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. शाओमीने आपल्या फोनला फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स वर 3डी कर्व्ड ग्लासची सुरक्षा दिली आहे. Xiaomi ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो मीयूआई 11 वर चालतो.

Xiaomi ने हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सोबतच 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीने फोनचा 8जीबी रॅम वेरिएंट पण सादर केला आहे पण तो बाजारात येण्यास वेळ लागेल. तसेच प्रोसेसिंगसाठी Mi Note 10 Lite आक्टा-कोर प्रोसेसर सह 8एनएम टेक्नॉलॉजी असलेला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेटला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Mi Note 10 Lite क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX686 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Xiaomi Mi Note 10 Lite रियल डुअल सिम फोन आहे जो 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी हा फोन कंपनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 30वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 5,260एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 8 जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट सह Xiaomi Mi 10i वेबसाइट वर लिस्ट, लवकरच होईल भारतात लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-on-geekbench-m2007j17i-8-gb-ram-snapdragon-750g-soc/feed/ 0