7 जानेवारीला लॉन्च होईल 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Realme V15

Realme बाबत गेल्या आठवड्यातच बातमी समोर आली होती कि कंपनी लवकरच भारतात आपल्या ‘क्यू सीरीज’ चा विस्तार करू शकते. हि सीरीज ऑक्टोबर मध्ये चीन मध्ये सादर करण्यात आली होती ज्यात Realme Q2, Realme Q2 Pro आणि Realme Q2i लॉन्च झाले होते. यातील एक Realme Q2 स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट बीआयएस वर लिस्ट झाला होता. आज रियलमी बद्दल अजून एक नवीन बातमी मिळत आहे कि कंपनी येत्या 7 जानेवारीला आपला नवीन फोन Realme V15 लॉन्च करणार आहे.

Realme V15 संबंधित बातमी समोर आली आहे कि कंपनी 7 जानेवारीला हा फोन जगासमोर ठेवणार आहे. 7 जानेवारीला कंपनी रियलमी वी15 स्मार्टफोन आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये लॉन्च करेल. रियलमीने आतापर्यंत या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार Realme V15 64 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल आणि हा फोन मीडियाटेक डायमनसिटी 800यू चिपसेट वर चालेल. फोन मध्ये 50वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते.

Realme Q2

भारतात लवकरच लॉन्च होणारा रियलमी क्यू2 स्मार्टफोन पाहता हा फोन 6.5-इंचाच्या एफएचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेट सह येतो. Realme Q2 Pro मध्ये 6.43-इंचाचा एफएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, त्यासोबत 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 600 निट्स पीक ब्राइटनेस आहे. हा स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह येतो.

हे देखील वाचा : Redmi 9T झाला तयार, 6000एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वाॅड कॅमेऱ्यासह होऊ शकतो लाॅन्च

रियलमीचे हे दोन्ही फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाले आहेत ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा डायमनसिटी 800यू चिपसेट देण्यात आला आहे. Realme Q2 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर Realme Q2 Pro स्मार्टफोन चीन मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे. पावर बॅकअपसाठी रियलमी क्यू2 मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे तर प्रो वर्जन 65वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 4,300एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Realme Q2i

Realme Q2 मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये f/1.8 अपर्चर सह 48-मेगापिक्सल प्राइमरी लेंस, 8-मेगापिक्सल वाइड अँगल लेंस 119-डिग्री FoV आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. दुसरीकडे Realme Q2 Pro मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 48MP ची प्राइमरी लेंस, 8MP वाइड-अँगल लेंस 119-डिग्री FoV, 2MP B&W पोर्टेट लेंस आणि 2MP 4cm मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी यात पण 16MP चा लेंस देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here