Mi Mix 3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 18 Oct 2018 07:32:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 10जीबी रॅम आणि 5जी सपोर्ट सह येत आहे शाओमी मी मिक्स 3! 25 ऑक्टोबरला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-with-10gb-ram-and-5g-support-to-launch-on-25-october-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-with-10gb-ram-and-5g-support-to-launch-on-25-october-in-marathi/#respond Thu, 18 Oct 2018 07:32:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2560 शाओमी मी मिक्स 3 च्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की या फोन मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल.

The post 10जीबी रॅम आणि 5जी सपोर्ट सह येत आहे शाओमी मी मिक्स 3! 25 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने दीर्घ प्रतीक्षेनंतर सांगितले आहे की कंपनीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन मी मिक्स 3 येत्या 25 ऑक्टोबरला सादर होईल. मी मिक्स 3 च्या लॉन्च बद्दल कंपनी ने अनेक टीजर ईमेज पण शेयर केल्या आहेत ज्यातून फोनच्या डिजाईन व लुकचा अंदाज लावला जात आहे. जरी शाओमी ने अजून मी मिक्स 3 चे स्पेसिफिकेशन्स सांगितले नसले तरी एका ताज्या लीक मधून अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यामुळे इतर स्मार्टफोन कंपन्यांना धक्का बसेल तर दुसरीकडे शाओमी फॅन्सना मोठे सरप्राइज मिळेल. बातमी अशी आहे की शाओमी मी ​मिक्स 3 10जीबी रॅम सह लॉन्च होईल.

शाओमी ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर फोटो ईमेज शेयर केली आहे ज्यात दोन कार्ड आहेत, एकावर ‘5’ लिहिण्यात आले आहे तर दुसर्‍या वर ’10’ लिहिलेल आहे. आपल्या पोस्ट वर शाओमी चाइना ने सांगितले आहे की शाओमीचा हा आगामी डिवाईस मी मिक्स 3 5जी नेटवर्क सपोर्ट सह लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे शाओमी मी मिक्स 3 जगातील पहिला फोन असेल जो 5जी सपोर्ट सह येईल आणि लोकांच्या वापरासाठी उपलब्ध होईल.

शाओमी मी मिक्स 3 बद्दल समजले आहे की कंपनी हा फोन 10जीबी रॅम सह बाजारात आणेल. काही दिवसांपूर्वी शाओमी मी मिक्स 3 चा वीडियो पण शेयर करण्यात आला होता की ज्यावरून समजले होते की हा स्मार्टफोन स्लाइड आउट कॅमेर्‍या सह लॉन्च होईल. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मी मिक्स 3 च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल ज्या सोबत फ्लॅश लाईट असेल.

शाओमी मी मिक्स 3 च्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की या फोन मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. या आधी कंपनी शाओमी मी 8 चे एक वर्जन सादर केले आहे ज्यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. मी मिक्स 3 डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. तसेच स्लाईडर वर ईयरपीस आणि सेल्फी फ्लॅश आहे.

शाओमी मी मिक्स 3 10जीबी रॅम सोबत 8जीबी रॅम आणि 6जीबी रॅम सह सादर केला जाईल ज्यात 256जीबी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. तसेच प्रोसेसिंग साठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट असेल. लीक नुसार मी मिक्स 3 मध्ये 2के रेज्ल्यूशन वाला एमोलेड डिस्प्ले मिळेल. येत्या 25 ऑक्टोबरला शाओमी बीजिंग मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून शाओमी मी मिक्स 3 आॅफिशियली लॉन्च केला जाईल.

The post 10जीबी रॅम आणि 5जी सपोर्ट सह येत आहे शाओमी मी मिक्स 3! 25 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-with-10gb-ram-and-5g-support-to-launch-on-25-october-in-marathi/feed/ 0
शाओमी मी नोट 4 15 ऑक्टोबरला होईल लॉन्च, फोन मध्ये असतिल तीन रियर कॅमेरा आणि इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-4-to-launch-on-15-october-along-with-mi-mix-3-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-4-to-launch-on-15-october-along-with-mi-mix-3-in-marathi/#respond Mon, 08 Oct 2018 10:43:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2395 लीक मधून समोर आलेले स्पेसिफिकेशन्स पाहता बोलले जात आहे की नोट 4 हाईएंड डिवाईस असेल जो मीड बजट मध्ये लॉन्च केला जाईल.

The post शाओमी मी नोट 4 15 ऑक्टोबरला होईल लॉन्च, फोन मध्ये असतिल तीन रियर कॅमेरा आणि इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनची अॅप्पल म्हणून ओळखली जाणारी टेक कपंनी शाओमी ने आधीच घोषणा केली आहे की कंपनी येत्या 15 ऑक्टोबरला आपला हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन मी मिक्स 3 लॉन्च करणार आहे. वेगवेगळ्या लीक्स मधून मी मिक्स च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती समोर आली आहे. पण आज शाओमी संबंधित अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जी शाओमी फॅन्स साठी खुशखबरच आहे. 15 ऑक्टोबरला मी मिक्स 3 सोबत शाओमी आपला अजून एक स्मार्टफोन सादर करेल आणि हा ​स्मार्टफोन मी नोट 4 नावाने लॉन्च केला जाईल.

शाओमी 15 ऑक्टोबरला चीन मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे. या ईवेंट मधून शाओमी एक साथ दोन स्मार्टफोन लॉन्च करेल. एक स्मार्टफोन मी मिक्स 3 असेल तर दुसरा फोन मी सीरीजचा मी नोट 4 असेल. शाओमी ने जरी मी नोट 4 ची आॅफिशियल माहिती दिली नसली तरी आईटी होम ने शाओमी मी नोट 4 ची टीजर ईमेज शेयर केली आहे ज्यावरून फोन च्या लॉन्च ची माहिती मिळाली आहे.

मी नोट 4 बद्दल बोलले जात आहे की हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह बाजारात येईल. लीक नुसार सॅमसंग बिक्सबे प्रमाणे मी नोट 4 मध्ये शाओमी चा एआई वॉयस असिस्टेंट असेल, ज्यासाठी डेडिकेटिड बटन देण्यात येईल. मीडिया रिपोर्ट नुसार शाओमी मी नोट 4 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल ​रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल.

शाओमी मी नोट 4 मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट असेल. वर सांगितल्याप्रमाणे कंपनी ने मी नोट 4 च्या लॉन्च तसेच याच्या स्पेसिफिकेशन्स संबंधीत कोणतीही माहिती दिली नाही. पण लीक मधून समोर आलेले स्पेसिफिकेशन्स पाहता बोलले जात आहे की नोट 4 हाईएंड डिवाईस असेल जो मीड बजट मध्ये लॉन्च केला जाईल. शाओमी च्या इंडियन फॅन्स च्या लक्षात असू द्या कि कंपनी भारतात मी नोट सीरीज लॉन्च करत नाही त्यामुळे मी नोट 4 इंडियन मध्ये लॉन्च होण्याची शक्यता कमी आहे.

The post शाओमी मी नोट 4 15 ऑक्टोबरला होईल लॉन्च, फोन मध्ये असतिल तीन रियर कॅमेरा आणि इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-4-to-launch-on-15-october-along-with-mi-mix-3-in-marathi/feed/ 0
शाओमी मी ​मिक्स 3 चा बॅक पॅनल होईल स्लाईड, पहिला आॅफिशियल फोटो कपंनी ने केला शेयर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-teaser-image-slider-backpanel-launch-date-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-teaser-image-slider-backpanel-launch-date-features-specifications-in-marathi/#respond Fri, 31 Aug 2018 09:46:02 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1895 शाओमी मी मिक्स 3 अशा प्रकारे बनवण्यात आला आहे की फोन चा संपूर्ण बॅक पॅनल स्लाईड होईल. फोनचा फ्रंट कॅमेरा आणि ईयरपीस स्लाईडर वर असतील आणि फोन बॉडी च्या आत राहतील.

The post शाओमी मी ​मिक्स 3 चा बॅक पॅनल होईल स्लाईड, पहिला आॅफिशियल फोटो कपंनी ने केला शेयर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी इंडिया ने कालच आॅफि​शिल ट्वीटर हँडल वरून माहिती दिली आहे की कंपनी 5 सप्टेंबरला भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल जे रेडमी 6 व रेडमी 6ए असू शकतात. तसेच तिकडे ग्लोबल मंचावर पण शाओमी प्रेसिडेंट लीन​ बिन ने एक मोठी घोषणा केली आहे. एकीकडे आईएफए 2018 मध्ये टेक कंपन्या आपल्या नवीन प्रोजेक्ट आणि डिवाईसचे प्रदर्शन करत आहेत तर दुसरीकडे लीन बिन ने शाओमीच्या आगामी फ्लॅगशिप डिवाईस मी मिक्स 3 चा अधिकृत फोटो पण शेयर केला आहे. या फोटो सोबतच बिन यांनी मी मिक्स 3 च्या लॉन्च ची माहिती पण दिली आहे.

आईएफए 2018 मध्ये सामील न होता पण शाओमी ने संपूर्ण टेक विश्वाचे लक्ष वेधले आहे. शाओमी प्रेसिडेंट लीन बिन यांनी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वरून मी मिक्स 3 चा फोटो शेयर केला आहे. या फोन च्या माध्यमातून शाओमी स्लाईड पॅनल वाली टेक्नोलॉजी समोर घेऊन येणार आहे. शाओमी मी मिक्स 3 अशा प्रकारे बनवण्यात आला आहे की फोन चा संपूर्ण बॅक पॅनल स्लाईड होईल. फोनचा फ्रंट कॅमेरा आणि ईयरपीस स्लाईडर वर असतील आणि फोन बॉडी च्या आत राहतील.

शाओमी मी मिक्स 3 चा फोटो शेयर करण्यासोबत लीन बिन यांनी सांगितले की कंपनी आपला हा शानदार स्मार्टफोन मी मिक्स 3 ऑक्टोबर मध्ये लॉन्च करेल. फोनचा लुक पाहता हा फोन ट्रू बेजल लेस फोन असेल. फ्रंट पॅनल पूर्णपणे डिस्प्ले ने कवर होईल. डिस्प्ले वर कोणतीही नॉच ​किंवा बेजल नसतील. फ्रंट कॅमेरा आणि कॉल वर बोलण्यासाठी ईयरपीस फोन च्या बॉडी च्या आत असतील जे बाहेरून दिसणार नाहीत. फक्त सेल्फी क्लिक करताना तसेच फोन वर बोलताना फोनचा बॅक पॅनल स्लाईड होऊन वर येईल.

तसेच मी मिक्स 3 च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये ​डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल ज्या सोबत फ्लॅश लाईट असेल. शाओमी मी मिक्स 3 च्या बॅक पॅनल वर कोणतेही फिंगरप्रिंट सेंसर नाही. त्यामुळे फोन मध्ये अंडर डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर असण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या फोटो मध्ये स्लाईडर वरील दोन सेंसर दिसत आहेत म्हणजे मी मिक्स 3 डुअल सेल्फी कॅमेराला सपोर्ट करेल. तसेच स्लाईडर वर ईयरपीस आणि सेल्फी फ्लॅश आहे.

शाओमी मी मिक्स 3 चे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन 8जीबी रॅम आणि 6जीबी रॅम मेमरी सह सादर केला जाईल जो 256जीबी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करेल. तसेच प्रोसेसिंग साठी यात क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट मिळू शकतो. लीक नुसार मी मिक्स 3 मध्ये 2के रेज्ल्यूशन असलेला एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. शाओमी ऑक्टोबर मध्ये मी मिक्स 3 आॅफिशियली लॉन्च करेल जो लगेचच भारतीय बाजारात पण येऊ शकतो.

The post शाओमी मी ​मिक्स 3 चा बॅक पॅनल होईल स्लाईड, पहिला आॅफिशियल फोटो कपंनी ने केला शेयर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-3-teaser-image-slider-backpanel-launch-date-features-specifications-in-marathi/feed/ 0