शाओमी मी ​मिक्स 3 चा बॅक पॅनल होईल स्लाईड, पहिला आॅफिशियल फोटो कपंनी ने केला शेयर

शाओमी इंडिया ने कालच आॅफि​शिल ट्वीटर हँडल वरून माहिती दिली आहे की कंपनी 5 सप्टेंबरला भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल जे रेडमी 6 व रेडमी 6ए असू शकतात. तसेच तिकडे ग्लोबल मंचावर पण शाओमी प्रेसिडेंट लीन​ बिन ने एक मोठी घोषणा केली आहे. एकीकडे आईएफए 2018 मध्ये टेक कंपन्या आपल्या नवीन प्रोजेक्ट आणि डिवाईसचे प्रदर्शन करत आहेत तर दुसरीकडे लीन बिन ने शाओमीच्या आगामी फ्लॅगशिप डिवाईस मी मिक्स 3 चा अधिकृत फोटो पण शेयर केला आहे. या फोटो सोबतच बिन यांनी मी मिक्स 3 च्या लॉन्च ची माहिती पण दिली आहे.

आईएफए 2018 मध्ये सामील न होता पण शाओमी ने संपूर्ण टेक विश्वाचे लक्ष वेधले आहे. शाओमी प्रेसिडेंट लीन बिन यांनी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वरून मी मिक्स 3 चा फोटो शेयर केला आहे. या फोन च्या माध्यमातून शाओमी स्लाईड पॅनल वाली टेक्नोलॉजी समोर घेऊन येणार आहे. शाओमी मी मिक्स 3 अशा प्रकारे बनवण्यात आला आहे की फोन चा संपूर्ण बॅक पॅनल स्लाईड होईल. फोनचा फ्रंट कॅमेरा आणि ईयरपीस स्लाईडर वर असतील आणि फोन बॉडी च्या आत राहतील.

शाओमी मी मिक्स 3 चा फोटो शेयर करण्यासोबत लीन बिन यांनी सांगितले की कंपनी आपला हा शानदार स्मार्टफोन मी मिक्स 3 ऑक्टोबर मध्ये लॉन्च करेल. फोनचा लुक पाहता हा फोन ट्रू बेजल लेस फोन असेल. फ्रंट पॅनल पूर्णपणे डिस्प्ले ने कवर होईल. डिस्प्ले वर कोणतीही नॉच ​किंवा बेजल नसतील. फ्रंट कॅमेरा आणि कॉल वर बोलण्यासाठी ईयरपीस फोन च्या बॉडी च्या आत असतील जे बाहेरून दिसणार नाहीत. फक्त सेल्फी क्लिक करताना तसेच फोन वर बोलताना फोनचा बॅक पॅनल स्लाईड होऊन वर येईल.

तसेच मी मिक्स 3 च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये ​डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल ज्या सोबत फ्लॅश लाईट असेल. शाओमी मी मिक्स 3 च्या बॅक पॅनल वर कोणतेही फिंगरप्रिंट सेंसर नाही. त्यामुळे फोन मध्ये अंडर डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर असण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या फोटो मध्ये स्लाईडर वरील दोन सेंसर दिसत आहेत म्हणजे मी मिक्स 3 डुअल सेल्फी कॅमेराला सपोर्ट करेल. तसेच स्लाईडर वर ईयरपीस आणि सेल्फी फ्लॅश आहे.

शाओमी मी मिक्स 3 चे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन 8जीबी रॅम आणि 6जीबी रॅम मेमरी सह सादर केला जाईल जो 256जीबी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करेल. तसेच प्रोसेसिंग साठी यात क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट मिळू शकतो. लीक नुसार मी मिक्स 3 मध्ये 2के रेज्ल्यूशन असलेला एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. शाओमी ऑक्टोबर मध्ये मी मिक्स 3 आॅफिशियली लॉन्च करेल जो लगेचच भारतीय बाजारात पण येऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here