Mi Note 10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 30 Mar 2020 14:06:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi घेऊन येत आहे 5 रियर कॅमेरे आणि 5260एमएएच बॅटरी असलेला Mi Note 10 Lite, स्पेसिफिकेशन्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-lite-specs-leaked-with-penta-rear-camera-5260mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-lite-specs-leaked-with-penta-rear-camera-5260mah-battery/#respond Mon, 30 Mar 2020 14:06:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6943 Xiaomi ने गेल्यावर्षी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत Mi Note 10 आणि Mi Note 10 Pro स्मार्टफोन लॉन्च केले होते. या स्मार्टफोन्स सोबतच शाओमीने टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ब्रँडचा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले फोन्स सादर केले होते. शाओमीने अजूनही मी नोट 10 आणि मी नोट 10 प्रो भारतीय बाजारात उतरवले नाहीत, पण या […]

The post Xiaomi घेऊन येत आहे 5 रियर कॅमेरे आणि 5260एमएएच बॅटरी असलेला Mi Note 10 Lite, स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्यावर्षी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत Mi Note 10 आणि Mi Note 10 Pro स्मार्टफोन लॉन्च केले होते. या स्मार्टफोन्स सोबतच शाओमीने टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ब्रँडचा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले फोन्स सादर केले होते. शाओमीने अजूनही मी नोट 10 आणि मी नोट 10 प्रो भारतीय बाजारात उतरवले नाहीत, पण या सीरीजच्या भारतातील लॉन्चच्या आधीच अजून एका नवीन फोनची माहिती समोर आली आहे. बातमी आहे कि शाओमी मी नोट 10 सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाईस आणणार आहे आणि याचे नाव Mi Note 10 Lite असेल.

Xiaomi Mi Note 10 Lite ची माहिती प्रसिद्ध टिप्सटर सुधांशू याने दिले आहे. या टिपस्टरने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर ट्वीट करून मी नोट 10 लाइटची माहिती दिली आहे. ट्वीट मध्ये सांगण्यात आले आहे कि Mi Note 10 Lite Xiaomi M2002F4LG मॉडेल नंबर सह बाजारात येईल. या लीक मध्ये फोनच्या मॉडेल नंबर सोबतच स्पेसिफिकेशस पण शेयर केले आहेत. लीकनुसार हा फोन मोठ्या बॅटरी आणि शानदार कॅमेरा सेंसर्स सह लॉन्च केला जाईल.

Mi Note 10 Lite चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा स्मार्टफोन 6.47 इंचाच्या मोठ्या डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. फोन मध्ये एंडरॉयड 10 असल्याचे समोर आले आहे ज्या सोबत प्रोसेसिंगसाठी मी नोट 10 लाइट मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट दिला जाऊ शकतो. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 30वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,260एमएएच ची बॅटरी मिळू शकते. समोर आलेल्या लीकनुसार हा फोन पेंटा रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल. म्हणजे फोनच्या बॅक पॅनल वर 5 कॅमेरा सेंसर असतील.

शाओमी मी नोट 10 लाइट च्या फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर लीकनुसार फोनच्या बॅक पॅनल वर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर मिळेल. त्याचबरोबर 8 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे इतर 4 कॅमेरा सेंसर्स फोन मध्ये दिले जाऊ शकतात. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Mi Note 10 Lite मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे. सध्यातरी Xiaomi Mi Note 10 Lite चे हे स्पेसिफिकेशन्स फक्त लीकच म्हणता येतील.

Mi Note 10

मी नोट 10 मध्ये 6.47 इंचाचा कर्व्ड फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) ओलेड डिस्प्ले आहे. पिक्सल डेनसिटी 398 पीपीआई आहे. स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730जी प्रोसेसर सह 8 जीबी तक रॅम आहे. फोन मध्ये 256 जीबी पर्यंत स्टोरेज आहे. Mi Note 10 ची बॅटरी 5,260 एमएएच ची आहे जी 30 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने रिटेल बॉक्स मध्ये 30 वॉट चार्जर दिला आहे जो फोन 65 मिनिटांत पूर्ण चार्ज करतो. कनेक्टिविटी फीचर्स मध्ये 4जी एलटीई, वाई-फाई 802.11ए/बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस चा समावेश आहे.

Mi Note 10 बद्दल बोलायचे तर यात एफ/ 1.69 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सह येतो. सोबत 117 डिग्री फील्ड ऑफ व्यू असलेला 20 मेगापिक्सलचा वाइड एंगल कॅमेरा, 12 मेगापिक्सलची शॉर्ट टेलीफोटो लेंस, सेकेंडरी 5 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/ 2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

शाओमी ने 100W सुपर चार्ज टर्बो चार्जिंग टेक्नोलॉजी सादर करत दावा केला आहे कि या टेक्नॉलॉजी द्वारे 4,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. Vivo ची 120W charging technology पाहता शाओमीच्या पुढे आहे आणि 4000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज करते.

The post Xiaomi घेऊन येत आहे 5 रियर कॅमेरे आणि 5260एमएएच बॅटरी असलेला Mi Note 10 Lite, स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-lite-specs-leaked-with-penta-rear-camera-5260mah-battery/feed/ 0
Xiaomi घेऊन येत आहे ‘ब्लॅक फ्रायडे सेल’, स्मार्टफोन वर मिळेल दमदार डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-black-friday-sale-starts-november-29/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-black-friday-sale-starts-november-29/#respond Wed, 27 Nov 2019 10:44:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5885 कंपनीने सेलच्या तारखेची घोषणा केली आहे, पण डील्स बद्दल कोणतीही माहिती अजून समोर आली नाही.

The post Xiaomi घेऊन येत आहे ‘ब्लॅक फ्रायडे सेल’, स्मार्टफोन वर मिळेल दमदार डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आपल्या Mi Super Sale ची सुरवात केली आहे जो 28 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहील. या सेल मध्ये शाओमी अनेक सेगमेंटमधील स्मार्टफोन काही काळासाठी स्वस्तात विकले जात आहेत. तसेच कंपनी हा सेल संपल्यावर आपला ब्लॅक फ्रायडे सेल सुरु करेल. तीन दिवस चालणार हा सेल 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत चालेल. शाओमीचा हा सेल मी.कॉम, फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडिया वर आयोजित केला जाईल. कंपनीने सेलच्या तारखेची घोषणा केली आहे, पण डील्स बद्दल कोणतीही माहिती अजून समोर आली नाही.

ब्लॅक फ्रायडे सेल मध्ये कंपनी आपल्या स्मार्टफोन्स वर शानदार डिस्काउंट देईल. डिस्काउंट व्यतिरिक्त स्मार्टफोन्स वर खास डील्स पण मिळतील. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी या सेल मध्ये आपल्या एखाद्या खास प्रॉडक्टची घोषणा पण करू शकते.

हे देखील वाचा: 10 डिसेंबरला लॉन्च होईल डुअल पंच-होल डिस्प्ले असलेला Xiaomi चा 5G फोन Redmi K30

दुसरीकडे कंपनीच्या वेबसाइट वर चालू असलेला Redmi Super Sale 28 नोव्हेंबर पर्यंत चालू राहील. या सेल मध्ये शाओमीने आपल्या रेडमी 7ए हँडसेट वर 1,200 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. तर Redmi 7A चा 2 जीबी + 16 जीबी वेरिएंट 5,499 रुपये आणि 2 जीबी + 32 जीबी वेरिएंट 5,799 रुपयांमध्ये विकला जात आहे.

इतकेच नव्हे तर Redmi K20 Pro वर 3,000 रुपयांची सूट मिळत आहे. शाओमीच्या वेबसाइट वर रेडमी के20 प्रो चा 6 जीबी आणि 128 जीबी वेरिएंट 25,999 रुपये आणि 8 जीबी + 256 जीबी वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

हे देखील वाचा: Xiaomi चा धमाका, फक्त 1 महिन्यात विकले 10 लाख Redmi Note 8 आणि Note 8 Pro स्मार्टफोन

विशेष म्हणजे शाओमीने काही दिवसांपूर्वी Mi Note 10 चा टीजर पण लॉन्च केला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी हा फोन भारतात लवकरच लॉन्च करेल. भारतात या फोनचा ग्लोबल वेरियंट गूगल प्ले सपॉर्ट सह लॉन्च केला जाईल. तर इंडियन मार्केट मध्ये या फोनची टक्कर OnePlus 7T आणि Realme X2 Pro शी होईल.

The post Xiaomi घेऊन येत आहे ‘ब्लॅक फ्रायडे सेल’, स्मार्टफोन वर मिळेल दमदार डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-black-friday-sale-starts-november-29/feed/ 0
108MP कॅमेरा असलेला Xiaomi Mi Note 10 भारतात लवकरच होईल लॉन्च, करेल सर्वांची सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-launch-in-india-soon-with-108mp-penta-camera/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-launch-in-india-soon-with-108mp-penta-camera/#respond Mon, 25 Nov 2019 10:37:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5862 कंपनीने साल 2017 मध्ये ऑक्टोबर मध्ये आपला शेवटाचा Mi Mix 2 फ्लॅगशिप फोन भारतात लॉन्च केला होता, ज्याची सुरवाती किंमत 35,999 रुपये होती.

The post 108MP कॅमेरा असलेला Xiaomi Mi Note 10 भारतात लवकरच होईल लॉन्च, करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी ने या महिन्यात स्पेन मध्ये आयोजित इवेंट मध्ये Mi Note 10 लॉन्च केला होता जो कंपनीच्या घरच्या मार्केट मधील Mi CC9 Pro चा ग्लोबल वेरिएंट आहे. आता 91मोबाईल्सला सोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी 108MP पेंटा कॅमेरा असलेला Mi Note 10 भारतात लॉन्च करण्यासाठी तयार झाली आहे. लॉन्च टाइमिंगची माहिती समोर आली नाही. बराच काळ झाला शाओमीने आपल्या फ्लॅगशिप कॅटेगरी मध्ये फोन्स लॉन्च केले नाहीत. कंपनीने साल 2017 मध्ये ऑक्टोबर मध्ये आपला शेवटाचा Mi Mix 2 फ्लॅगशिप फोन भारतात लॉन्च केला होता, ज्याची सुरवाती किंमत 35,999 रुपये होती.

शाओमी इंडिया हेड मनु कुमार जैन सध्या चीन मध्ये आहेत, तिथून त्यांनी Xiaomi ने च्या नव्या फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी 100W सुपर चार्ज टर्बो चार्जिंग टेक्नोलॉजी बद्दल ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे कि जर तुम्हाला ही टेक्नोलॉजी भारतात हवी असेल तर जास्तीत जास्त रीट्वीट करा. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Vivo ने 120W सुपर फ्लॅश फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सादर केली होती आणि Xiaomi ची चार्जिंग टेक्नॉलॉजी Vivo च्या टेक्नॉलॉजीला टक्कर देईल. Xiaomi च्या या टेक्नॉलॉजीचा वापर यूएसबी टाईप-सी केबल द्वारे करता येईल.

कंपनीने Mi Note 10 सोबत Mi Note 10 Pro लॉन्च केला होता. मी नोट 10 आणि मी नोट 10 प्रो मध्ये फरक फक्त रॅम आणि स्टोरेजचा आहे. तसेच मी नोट 10 प्रो 8P लेंस सह तर मी नोट 10 7P लेंस सह येतो.

Mi Note 10 चे स्पेसिफिकेशन्स

मी नोट 10 मध्ये 6.47 इंचाचा कर्व्ड फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) ओलेड डिस्प्ले आहे. पिक्सल डेनसिटी 398 पीपीआई आहे. स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730जी प्रोसेसर सह 8 जीबी तक रॅम आहे. फोन मध्ये 256 जीबी पर्यंत स्टोरेज आहे. Mi Note 10 ची बॅटरी 5,260 एमएएच ची आहे जी 30 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने रिटेल बॉक्स मध्ये 30 वॉट चार्जर
दिला आहे जो फोन 65 मिनिटांत पूर्ण चार्ज करतो. कनेक्टिविटी फीचर्स मध्ये 4जी एलटीई, वाई-फाई 802.11ए/बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस चा समावेश आहे.

Mi Note 10 चा कॅमेरा

Mi Note 10 बद्दल बोलायचे तर यात एफ/ 1.69 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सह येतो. सोबत 117 डिग्री फील्ड ऑफ व्यू असलेला 20 मेगापिक्सलचा वाइड एंगल कॅमेरा, 12 मेगापिक्सलची शॉर्ट टेलीफोटो लेंस, सेकेंडरी 5 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/ 2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

अशी आहे शाओमीची 100W टेक्नोलॉजी

शाओमी ने 100W सुपर चार्ज टर्बो चार्जिंग टेक्नोलॉजी सादर करत दावा केला आहे कि या टेक्नॉलॉजी द्वारे 4,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. Vivo ची 120W charging technology पाहता शाओमीच्या पुढे आहे आणि 4000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज करते.

The post 108MP कॅमेरा असलेला Xiaomi Mi Note 10 भारतात लवकरच होईल लॉन्च, करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-launch-in-india-soon-with-108mp-penta-camera/feed/ 0
48MP क्वाड कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Redmi Note 8T https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8t-launch-with-48mp-quad-camera-setup-in-spain/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8t-launch-with-48mp-quad-camera-setup-in-spain/#respond Thu, 07 Nov 2019 11:27:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5707 याच्या भारतातील उपलब्धतेचा कंपनीने कोणताही खुलासा केला नाही.

The post 48MP क्वाड कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Redmi Note 8T first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ‘रेडमी नोट’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन Redmi Note 8T कंपनीने आज अधिकृतपणे लॉन्च केला आहे. गेले काही दिवस या फोन बद्दल अनेक लीक्स समोर येत होते. हा फोन कंपनीने स्पेन मध्ये आयोजित इवेंट मध्ये सादर केला आहे. तसेच कंपनीने या इवेंट मध्ये नुकत्याच लॉन्च झालेल्या Mi CC9 Pro चा ग्लोबल वेरिएंट Mi Note 10 आणि याचा मोठा वेरिएंट Mi Note 10 Pro पण सादर केले आहेत.

Redmi Note 8T बद्दल बोलायचे तर कंपनीने याचा 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरिएंट 199 यूरो (जवळपास 15,672 रुपये) मध्ये सादर केला आहे. फोन स्पेन मध्ये 8 नोव्हेंबर पासून सेल केला जाईल. तसेच 15 नोव्हेंबरपासून जर्मनी मध्ये सेल साठी येईल. इतकेच नव्हे तर कंपनी लवकरच हा फोन यूके मध्ये पण उपलब्ध करेल. पण याच्या भारतातील उपलब्धतेचा कंपनीने कोणताही खुलासा केला नाही.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता Redmi Note 8T मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ डॉट डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये पुढे मागे कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आला आहे. फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर आहे. तसेच यात 4जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्य मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे. तर फोन मध्ये 8एमपी+2एमपी +2एमपी कॅमेरा लेंस देण्यात आली आहे, ज्यात एक मेक्रो लेंस पण आहे. फोन मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 13 मेगापिक्सलचा हाई-रेजोल्यूशन का कॅमेरा देण्यात आला आहे.

फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंग सह येते. तसेच फोन मध्ये एनएफसी सपोर्ट पण देण्यात आला आहे. , फोन मध्ये सर्व बेसिक कनेक्टिविटी ऑप्शन्स आहेत.

The post 48MP क्वाड कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Redmi Note 8T first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8t-launch-with-48mp-quad-camera-setup-in-spain/feed/ 0
Xiaomi ने शेयर केले Mi Note 10 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स, 108 MP प्राइमरी कॅमेऱ्यासह असतील 5 रियर कॅमेरा सेंसर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-108-mp-penta-camera-full-details-specifications-officially-revealed-launch-date-14-november/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-108-mp-penta-camera-full-details-specifications-officially-revealed-launch-date-14-november/#respond Fri, 01 Nov 2019 10:33:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5647 या कॅमेरा सेटअप मध्ये सर्वात वर 5 मेगापिक्सलचा सेंसर असेल जो 50x Zoom च्या क्षमतेसह येईल.

The post Xiaomi ने शेयर केले Mi Note 10 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स, 108 MP प्राइमरी कॅमेऱ्यासह असतील 5 रियर कॅमेरा सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने घोषणा केली आहे कि येत्या 14 नोव्हेंबरला कंपनी अपना पेंटा कॅमेरा असलेला स्मार्टफोन Mi Note 10 लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन सर्वातआधी पोलॅंड मध्ये लॉन्च केला जाईल, त्यानंतर ग्लोबल मार्केट मध्ये वेगवेगळ्या बाजारांत येईल. Xiaomi आधीच सांगितले आहे कि Mi Note 10 108MP Penta Camera सह लॉन्च केला जाईल. आज फोनच्या लॉन्च आधीच कंपनीने या फोनचे फुल स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत.

असा आहे संपूर्ण कॅमेरा सेटअप

Xiaomi ने निश्चित केले आहे कि Mi Note 10 मध्ये पांच कॅमेरा सेंसर दिले जातील. थेट फोनच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे तर Mi Note 10 चा प्राइमरी कॅमेरा सेंसर 108 मेगापिक्सलचा असेल. हा सेंसर फोनच्या बॅक पॅनल वर देण्यात आलेल्या वर्टिकल शेप कॅमेरा सेटअप मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये सर्वात वर 5 मेगापिक्सलचा सेंसर असेल जो 50x Zoom च्या क्षमतेसह येईल.

Mi Note 10 मध्ये वरून दुसरा कॅमेरा सेंसर पोर्टरेट लेंस आहे. हा कॅमेरा सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे. तसेच Mi Note 10 मध्ये 20 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे जी कॅमेरा सेटअप मध्ये चौथ्या नंबर वर आहे. रियर कॅमेरा सेटअप मध्ये सर्वात खाली 2 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे जी एक मॅक्रो लेंस आहे. Mi Note 10 च्या रियर कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे Mi Note 10 मध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर नसेल त्यामुळे यात इन-डिस्प्ले सेंसर टेक्नॉलॉजी असू शकते.

हे देखील वाचा: जाणून घ्या PUBG आणि Call Of Duty पैकी कोण आहे दमदार

Xiaomi Mi Note 10

Mi Note 10 संबंधित लीक मध्ये समोर आले होते कि हा स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो जो 1080पिक्सलला सपोर्ट करेल. लीकनुसार हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल तसेच डिवाईस मध्ये 128 जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळेल. तर प्रोसेसिंग साठी Mi Note 10 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट असल्याचे समोर आले आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Mi Note 10 मध्ये 108 मेगापिक्सल प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर सह एकूण 5 सेंसर्स दिले जातील तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. लीक नुसार Xiaomi Mi Note 10 कपंनी द्वारा 4000एमएमएच बॅटरी सह लॉन्च केला जाईल जी 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल.

108 MP कॅमेरा ऐसे करेल काम

Xiaomi Mi Note 10 मध्ये Samsung ने सादर केलेला ISOCELL Bright HMX सेंसर मिळेल. हा नवीन सेंसर 1/1.33-इंचाचा आहे जास्तीत जास्त प्रकाश गोळा करू शकतो. ISOCELL Bright HMX मध्ये Tetracell टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हि टेक्नॉलॉजी चार वेगवेगळ्या पिक्सल्सला सोबत घेऊन काम करते आणि चारही कॅप्चर फोटो एक बनवते. एकाच आब्जेक्ट वर चार पिक्सलने काम केल्यामुळे लो लाईट मध्ये पण फोटो चांगले येतात आणि सोबतच फोटो मध्ये नॉइज कमी असल्यामुळे आब्जेक्टचे रंग पण योग्यरीत्या कॅप्चर होतात.

हे देखील वाचा: एका महिन्यात 120 लाख प्रोडक्ट्स विकून Xiaomi ने केला रेकॉर्ड, 85 लाख स्मार्टफोन्स सह विकले गेले 6 लाख MI TV

तसेच जास्त प्रकाश असल्यास Samsung चा 108-megapixel camera sensor कंपनीच्या Smart-ISO मेकनिजम वर काम करेल जो या प्रक्रिया मध्ये ISOCELL Bright HMX चा प्रकाश नियंत्रित करून पिक्सल चांगले बनवतो. विशेषसा म्हणजे सॅमसंगचा हा नवीन सेंसर 6016 x 3384 पिक्सल रेज्ल्यूशन वर 6K वीडियो बनवू शकतो तसेच हा सेंसर 30 fps (फ्रेम वर सेकेंड) च्या स्पीडने शूटिंग करू शकतो.

The post Xiaomi ने शेयर केले Mi Note 10 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स, 108 MP प्राइमरी कॅमेऱ्यासह असतील 5 रियर कॅमेरा सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-108-mp-penta-camera-full-details-specifications-officially-revealed-launch-date-14-november/feed/ 0
14 नोव्हेंबरला लॉन्च होईल 108 MP पेंटा कॅमेरा असेलेला Xiaomi Mi Note 10, लॉन्चच्या आधी फोनचा रिटेल बॉक्स आला समोर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-world-first-108-mp-penta-camera-retail-box-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-world-first-108-mp-penta-camera-retail-box-leaked/#respond Thu, 31 Oct 2019 11:09:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5639 Xiaomi Mi Note 10 कपंनी द्वारा 4000एमएमएच बॅटरी सह लॉन्च केला जाईल जी 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल.

The post 14 नोव्हेंबरला लॉन्च होईल 108 MP पेंटा कॅमेरा असेलेला Xiaomi Mi Note 10, लॉन्चच्या आधी फोनचा रिटेल बॉक्स आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi घोषणा केली आहे कि कंपनी लवकरच Mi Note 10 स्मार्टफोन आणणार आहे. Xiaomi च्या पोलॅंड वेबसाइटने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे सांगितले आहे कि Mi Note 10 108MP Penta Camera सह लॉन्च केला जाईल तसेच पोलॅंडच्या बाजारात हा फोन येत्या 14 नोव्हेंबरला येईल. Mi Note 10 जगातील पहिला स्मार्टफोन असेल ज्यात 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. Mi Note 10 च्या लॉन्चच्या आधीच आता या फोनच्या रिटेल बॉक्सचे फोटो इंटरनेट वर वायरल झाले आहेत.

Mi Note 10 च्या रिटेल बॉक्स संबंधित एक लीक काही दिवसांपूर्वी पण समोर आला होता, पण आता नवीन लीक मध्ये फोनच्या रिटेल बॉक्सची फुल ईमेज दाखवण्यात आली आहे. सर्वात आधी फोन बद्दल बोलायचे झाले तर Mi Note 10 पेंटा कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाईल. म्हणजे फोनच्या बॅक पॅनल वर पाच रियर कॅमेरा सेंसर मिळतील. जास्त सेंसर्स सोबतच हा फोन हाई मेगापिक्सलला पण सपोर्ट करेल. Mi Note 10 108MP च्या प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर सह लॉन्च केला जाईल.

Xiaomi Mi Note 10

Mi Note 10 संबंधित लीक मध्ये समोर आले होते कि हा स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो जो 1080पिक्सलला सपोर्ट करेल. लीकनुसार हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल तसेच डिवाईस मध्ये 128 जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळेल. तर प्रोसेसिंग साठी Mi Note 10 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट असल्याचे समोर आले आहे.

हे देखील वाचा: एका महिन्यात 120 लाख प्रोडक्ट्स विकून Xiaomi ने केला रेकॉर्ड, 85 लाख स्मार्टफोन्स सह विकले गेले 6 लाख MI TV

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Mi Note 10 मध्ये 108 मेगापिक्सल प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर सह एकूण 5 सेंसर्स दिले जातील तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. लीक नुसार Xiaomi Mi Note 10 कपंनी द्वारा 4000एमएमएच बॅटरी सह लॉन्च केला जाईल जी 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल.

108 MP कॅमेरा ऐसे करेल काम

Xiaomi Mi Note 10 मध्ये Samsung ने सादर केलेला ISOCELL Bright HMX सेंसर मिळेल. हा नवीन सेंसर 1/1.33-इंचाचा आहे जास्तीत जास्त प्रकाश गोळा करू शकतो. ISOCELL Bright HMX मध्ये Tetracell टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हि टेक्नॉलॉजी चार वेगवेगळ्या पिक्सल्सला सोबत घेऊन काम करते आणि चारही कॅप्चर फोटो एक बनवते. एकाच आब्जेक्ट वर चार पिक्सलने काम केल्यामुळे लो लाईट मध्ये पण फोटो चांगले येतात आणि सोबतच फोटो मध्ये नॉइज कमी असल्यामुळे आब्जेक्टचे रंग पण योग्यरीत्या कॅप्चर होतात.

हे देखील वाचा: 108 MP कॅमेरा असलेल्या Xiaomi CC9 Pro ची संपूर्ण माहिती झाली लीक, 5X ऑप्टिकल झूम सपोर्ट असेल यात

तसेच जास्त प्रकाश असल्यास Samsung चा 108-megapixel camera sensor कंपनीच्या Smart-ISO मेकनिजम वर काम करेल जो या प्रक्रिया मध्ये ISOCELL Bright HMX चा प्रकाश नियंत्रित करून पिक्सल चांगले बनवतो. विशेषसा म्हणजे सॅमसंगचा हा नवीन सेंसर 6016 x 3384 पिक्सल रेज्ल्यूशन वर 6K वीडियो बनवू शकतो तसेच हा सेंसर 30 fps (फ्रेम वर सेकेंड) च्या स्पीडने शूटिंग करू शकतो.

The post 14 नोव्हेंबरला लॉन्च होईल 108 MP पेंटा कॅमेरा असेलेला Xiaomi Mi Note 10, लॉन्चच्या आधी फोनचा रिटेल बॉक्स आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-world-first-108-mp-penta-camera-retail-box-leaked/feed/ 0