चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी ने या महिन्यात स्पेन मध्ये आयोजित इवेंट मध्ये Mi Note 10 लॉन्च केला होता जो कंपनीच्या घरच्या मार्केट मधील Mi CC9 Pro चा ग्लोबल वेरिएंट आहे. आता 91मोबाईल्सला सोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी 108MP पेंटा कॅमेरा असलेला Mi Note 10 भारतात लॉन्च करण्यासाठी तयार झाली आहे. लॉन्च टाइमिंगची माहिती समोर आली नाही. बराच काळ झाला शाओमीने आपल्या फ्लॅगशिप कॅटेगरी मध्ये फोन्स लॉन्च केले नाहीत. कंपनीने साल 2017 मध्ये ऑक्टोबर मध्ये आपला शेवटाचा Mi Mix 2 फ्लॅगशिप फोन भारतात लॉन्च केला होता, ज्याची सुरवाती किंमत 35,999 रुपये होती.
शाओमी इंडिया हेड मनु कुमार जैन सध्या चीन मध्ये आहेत, तिथून त्यांनी Xiaomi ने च्या नव्या फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी 100W सुपर चार्ज टर्बो चार्जिंग टेक्नोलॉजी बद्दल ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे कि जर तुम्हाला ही टेक्नोलॉजी भारतात हवी असेल तर जास्तीत जास्त रीट्वीट करा. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Vivo ने 120W सुपर फ्लॅश फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सादर केली होती आणि Xiaomi ची चार्जिंग टेक्नॉलॉजी Vivo च्या टेक्नॉलॉजीला टक्कर देईल. Xiaomi च्या या टेक्नॉलॉजीचा वापर यूएसबी टाईप-सी केबल द्वारे करता येईल.
Yes, you heard it right.. This week @Xiaomi introduced 100W super charge turbo technology.
This 100W charger can fully charge a 4000mAh battery phone in only – 17 mins! ⚡⚡⚡
This is super crazy. Isn't it? RT if you want us to launch it. ?#Xiaomi ❤️ pic.twitter.com/nb90FQlU5r
— #MiFan Manu Kumar Jain (@manukumarjain) November 22, 2019
कंपनीने Mi Note 10 सोबत Mi Note 10 Pro लॉन्च केला होता. मी नोट 10 आणि मी नोट 10 प्रो मध्ये फरक फक्त रॅम आणि स्टोरेजचा आहे. तसेच मी नोट 10 प्रो 8P लेंस सह तर मी नोट 10 7P लेंस सह येतो.
Mi Note 10 चे स्पेसिफिकेशन्स
मी नोट 10 मध्ये 6.47 इंचाचा कर्व्ड फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) ओलेड डिस्प्ले आहे. पिक्सल डेनसिटी 398 पीपीआई आहे. स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730जी प्रोसेसर सह 8 जीबी तक रॅम आहे. फोन मध्ये 256 जीबी पर्यंत स्टोरेज आहे. Mi Note 10 ची बॅटरी 5,260 एमएएच ची आहे जी 30 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने रिटेल बॉक्स मध्ये 30 वॉट चार्जर
दिला आहे जो फोन 65 मिनिटांत पूर्ण चार्ज करतो. कनेक्टिविटी फीचर्स मध्ये 4जी एलटीई, वाई-फाई 802.11ए/बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस चा समावेश आहे.
Mi Note 10 चा कॅमेरा
Mi Note 10 बद्दल बोलायचे तर यात एफ/ 1.69 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सह येतो. सोबत 117 डिग्री फील्ड ऑफ व्यू असलेला 20 मेगापिक्सलचा वाइड एंगल कॅमेरा, 12 मेगापिक्सलची शॉर्ट टेलीफोटो लेंस, सेकेंडरी 5 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/ 2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
अशी आहे शाओमीची 100W टेक्नोलॉजी
शाओमी ने 100W सुपर चार्ज टर्बो चार्जिंग टेक्नोलॉजी सादर करत दावा केला आहे कि या टेक्नॉलॉजी द्वारे 4,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. Vivo ची 120W charging technology पाहता शाओमीच्या पुढे आहे आणि 4000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज करते.














