Mi Note 4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 24 Jun 2019 13:49:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी फॅन्ससाठी वाईट बातमी, कंपनीने हि सीरीज केली बंद https://www.91mobiles.com/marathi/mi-max-mi-note-series-discontinued-says-xiaomi-ceo/ https://www.91mobiles.com/marathi/mi-max-mi-note-series-discontinued-says-xiaomi-ceo/#respond Mon, 24 Jun 2019 10:34:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4639 यावर्षी या दोन्ही लाइनअपचा कोणताही नवीन मॉडेल लॉन्च करण्याचा विचार केला गेलेला नाही.

The post शाओमी फॅन्ससाठी वाईट बातमी, कंपनीने हि सीरीज केली बंद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही पण शाओमीच्या स्मार्टफोन्सचे फॅन असाल तर हि एक बातमी तुम्हाला आवडणार नाही. शाओमी ने आपली Mi Max आणि Mi Note सीरीज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती स्वतः शाओमीचे सीईओ ली जून यांनी दिली आहे.

त्यांनी चिनी माइक्रोब्लॉगिंग साइट वीबो वर एक पोस्ट शेयर केली. या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे कि यावर्षी या दोन्ही लाइनअपचा कोणताही नवीन मॉडेल लॉन्च करण्याचा विचार केला गेलेला नाही. वीबो वर पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले कि या जुन्या सीरीजच्या ऐवजी कंपनी आता संपूर्ण लक्ष रेडमी, Mi Mix सीरीज, Mi 9 आणि नवीन CC सीरीजच्या स्मार्टफोन्स वर केंद्रित करेल.

विशेष म्हणजे शाओमी ने Mi Max 3 गेल्या वर्षी लॉन्च केला होता. त्यामुळे यावर्षी याचा अपग्रेडेड वर्जन अपेक्षित होता. पण असे झाले नाही. शाओमी ने नोट सीरीज सर्वात आधी 2015 मध्ये लॉन्च केली होती.

चिनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने गेल्याच आठवड्यात आपल्या नवीन ‘CC’ सीरीजची घोषणा केली आहे. या सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन्स लॉन्च केले जाऊ शकतात. याआधी कंपनी ने आपल्या या सीरीज बद्दल चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर एक फोटो शेयर केला होता. या फोटो नुसार या नवीन सीरीज मध्ये अलीकडेच लॉन्च झालेल्या Asus 6Z प्रमाणे फ्लिप कॅमेरा मोड्यूल दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: 7,070एमएएच बॅटरी आणि 10.5-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला Samsung चा पावरफुल Galaxy Tab S5e

असे बोलले जात आहे कि या सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन्स MI CC9 आणि Mi CC9e लॉन्च केले जाऊ शकतात. हे दोन्ही स्मार्टफोन्स Meitu AI एस्थेटिक लॅब आणि शाओमीच्या टेक्नोलॉजी सह येतील. तसेच दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये सेल्फी कॅमेऱ्यावर लक्ष दिले जाईल.

The post शाओमी फॅन्ससाठी वाईट बातमी, कंपनीने हि सीरीज केली बंद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-max-mi-note-series-discontinued-says-xiaomi-ceo/feed/ 0
शाओमी मी नोट 4 15 ऑक्टोबरला होईल लॉन्च, फोन मध्ये असतिल तीन रियर कॅमेरा आणि इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-4-to-launch-on-15-october-along-with-mi-mix-3-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-4-to-launch-on-15-october-along-with-mi-mix-3-in-marathi/#respond Mon, 08 Oct 2018 10:43:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2395 लीक मधून समोर आलेले स्पेसिफिकेशन्स पाहता बोलले जात आहे की नोट 4 हाईएंड डिवाईस असेल जो मीड बजट मध्ये लॉन्च केला जाईल.

The post शाओमी मी नोट 4 15 ऑक्टोबरला होईल लॉन्च, फोन मध्ये असतिल तीन रियर कॅमेरा आणि इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनची अॅप्पल म्हणून ओळखली जाणारी टेक कपंनी शाओमी ने आधीच घोषणा केली आहे की कंपनी येत्या 15 ऑक्टोबरला आपला हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन मी मिक्स 3 लॉन्च करणार आहे. वेगवेगळ्या लीक्स मधून मी मिक्स च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती समोर आली आहे. पण आज शाओमी संबंधित अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जी शाओमी फॅन्स साठी खुशखबरच आहे. 15 ऑक्टोबरला मी मिक्स 3 सोबत शाओमी आपला अजून एक स्मार्टफोन सादर करेल आणि हा ​स्मार्टफोन मी नोट 4 नावाने लॉन्च केला जाईल.

शाओमी 15 ऑक्टोबरला चीन मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे. या ईवेंट मधून शाओमी एक साथ दोन स्मार्टफोन लॉन्च करेल. एक स्मार्टफोन मी मिक्स 3 असेल तर दुसरा फोन मी सीरीजचा मी नोट 4 असेल. शाओमी ने जरी मी नोट 4 ची आॅफिशियल माहिती दिली नसली तरी आईटी होम ने शाओमी मी नोट 4 ची टीजर ईमेज शेयर केली आहे ज्यावरून फोन च्या लॉन्च ची माहिती मिळाली आहे.

मी नोट 4 बद्दल बोलले जात आहे की हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह बाजारात येईल. लीक नुसार सॅमसंग बिक्सबे प्रमाणे मी नोट 4 मध्ये शाओमी चा एआई वॉयस असिस्टेंट असेल, ज्यासाठी डेडिकेटिड बटन देण्यात येईल. मीडिया रिपोर्ट नुसार शाओमी मी नोट 4 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल ​रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल.

शाओमी मी नोट 4 मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट असेल. वर सांगितल्याप्रमाणे कंपनी ने मी नोट 4 च्या लॉन्च तसेच याच्या स्पेसिफिकेशन्स संबंधीत कोणतीही माहिती दिली नाही. पण लीक मधून समोर आलेले स्पेसिफिकेशन्स पाहता बोलले जात आहे की नोट 4 हाईएंड डिवाईस असेल जो मीड बजट मध्ये लॉन्च केला जाईल. शाओमी च्या इंडियन फॅन्स च्या लक्षात असू द्या कि कंपनी भारतात मी नोट सीरीज लॉन्च करत नाही त्यामुळे मी नोट 4 इंडियन मध्ये लॉन्च होण्याची शक्यता कमी आहे.

The post शाओमी मी नोट 4 15 ऑक्टोबरला होईल लॉन्च, फोन मध्ये असतिल तीन रियर कॅमेरा आणि इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-4-to-launch-on-15-october-along-with-mi-mix-3-in-marathi/feed/ 0