जर तुम्ही पण शाओमीच्या स्मार्टफोन्सचे फॅन असाल तर हि एक बातमी तुम्हाला आवडणार नाही. शाओमी ने आपली Mi Max आणि Mi Note सीरीज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती स्वतः शाओमीचे सीईओ ली जून यांनी दिली आहे.
त्यांनी चिनी माइक्रोब्लॉगिंग साइट वीबो वर एक पोस्ट शेयर केली. या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे कि यावर्षी या दोन्ही लाइनअपचा कोणताही नवीन मॉडेल लॉन्च करण्याचा विचार केला गेलेला नाही. वीबो वर पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले कि या जुन्या सीरीजच्या ऐवजी कंपनी आता संपूर्ण लक्ष रेडमी, Mi Mix सीरीज, Mi 9 आणि नवीन CC सीरीजच्या स्मार्टफोन्स वर केंद्रित करेल.
विशेष म्हणजे शाओमी ने Mi Max 3 गेल्या वर्षी लॉन्च केला होता. त्यामुळे यावर्षी याचा अपग्रेडेड वर्जन अपेक्षित होता. पण असे झाले नाही. शाओमी ने नोट सीरीज सर्वात आधी 2015 मध्ये लॉन्च केली होती.
चिनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने गेल्याच आठवड्यात आपल्या नवीन ‘CC’ सीरीजची घोषणा केली आहे. या सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन्स लॉन्च केले जाऊ शकतात. याआधी कंपनी ने आपल्या या सीरीज बद्दल चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर एक फोटो शेयर केला होता. या फोटो नुसार या नवीन सीरीज मध्ये अलीकडेच लॉन्च झालेल्या Asus 6Z प्रमाणे फ्लिप कॅमेरा मोड्यूल दिला जाऊ शकतो.
हे देखील वाचा: 7,070एमएएच बॅटरी आणि 10.5-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला Samsung चा पावरफुल Galaxy Tab S5e
असे बोलले जात आहे कि या सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन्स MI CC9 आणि Mi CC9e लॉन्च केले जाऊ शकतात. हे दोन्ही स्मार्टफोन्स Meitu AI एस्थेटिक लॅब आणि शाओमीच्या टेक्नोलॉजी सह येतील. तसेच दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये सेल्फी कॅमेऱ्यावर लक्ष दिले जाईल.