Micromax IN - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 03 Nov 2020 12:51:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Micromax चा चीनी कंपन्यांवर वार, लॉन्च केले 5000mAh बॅटरी आणि 48MP रियर कॅमेरा असलेले दोन फोन https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-note-1-in-1b-launched-today-with-5000mah-battery-48mp-camera-know-price-sale-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-note-1-in-1b-launched-today-with-5000mah-battery-48mp-camera-know-price-sale-flipkart/#respond Tue, 03 Nov 2020 12:51:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8774 Micromax In Note 1 आणि In 1b च्या डिजाइन बद्दल बोलायचे झाले तर दोन्ही फोन खूप वेगळे आहेत. In-सीरीजच्या दोन्ही डिवाइसेज मध्ये मीडियाटेकचा प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याची माहिती कंपनीने आधीच दिली होती.

The post Micromax चा चीनी कंपन्यांवर वार, लॉन्च केले 5000mAh बॅटरी आणि 48MP रियर कॅमेरा असलेले दोन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय स्मार्टफोन मेकर Micromax ने भारतीय बाजारात पुन्हा एकदा वापसी केली आहे. जवळपास दोन वर्षांनंतर आज कंपनीने In सीरीज अंतगर्त दोन नवीन स्मार्टफोन्स जगासमोर ठेवले आहेत. ‘आओ करें चीनी कम’ टॅगलाइन सह सादर करण्यात आलेल्या या फोन्सच्या जीवावर कंपनी भारतीयांच्या मनात पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मेड इन इंडिया फोन आणि भारतीय कंपनी असल्याचा फायदा घेत कंपनी सरळ चीनी स्मार्टफोन वर ब्रँड वर हल्ला करत आहे. चला जाणून घेऊया Micromax In सीरीज मध्ये सादर केल्या गेलेल्या Micromax In Note 1 आणि In 1b बाबत सर्वकाही.

सुंदर डिजाइन

Micromax In Note 1 आणि In 1b च्या डिजाइन बद्दल बोलायचे झाले तर दोन्ही फोन खूप वेगळे आहेत. सर्वप्रथम Micromax In Note 1 बद्दल बोलूया, कंपनीने हा पंच-होल डिस्प्ले सह सादर केला आहे. फोनच्या फ्रंटला मधोमध एक कटआउट देण्यात आली आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. पंच-होल असल्यामुळे फोनच्या तिन्ही कडा वर बेजल लेस आहेत. पण खाली थोडा चिन पार्ट मिळेल. तसेच मागे टॉप लेफ्ट मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे जो आयताकृती आहे. तसेच मागे फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

दुसरीकडे Micromax In 1b कंपनीने वॉटर ड्रॉप-नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे. तसेच या फोन मध्ये पण डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत आणि खालच्या बाजूला थोडी जाड बेजल मिळेल. तसेच मागे आयताकृती ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. Micromax In Note 1 प्रमाणेच In 1b मध्ये पण बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

शानदार डिस्प्ले

Micromax In Note 1 मध्ये 6.67-इंच FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे जो 21:9 आसपेक्ट रेशियो आणि पंच-होल कटआउट सह येतो. तर दुसरीकडे लो बजेट Micromax In 1b मध्ये 6.52-इंचाच्या HD+ एलसीडी डिस्प्ले सह 20:9 आसपेक्ट रेश्यो आहे.

दमदार कॅमेरा

कॅमेरा बद्दल बोलायचे तर Micromax In Note 1 मध्ये कंपनीने मागे क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 5 मेगापिक्सलचा वाइड-अँगल लेंस आणि दोन 2-मेगापिक्सल कॅमेरा आहेत. तसेच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फ्रंटला 16 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आहे जो 78-degree FoV सह येतो.

Micromax In 1b मध्ये डुअल-कॅमेरा मागे देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलची सेकेंडरी लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि रिवर्स चार्जिंग

Micromax In Note 1 आणि In 1b दोन्ही मध्ये कंपनीने रिवर्स चार्जिंगचा ऑप्शन दिला आहे, ज्याचा अर्थ असा आहे कि या फोन द्वारे कोणताही वायरलेस चार्ज असलेला फोन चार्ज केला जाऊ शकतो. दोन्ही फोन अँड्रॉइड 10 ओएस वर चालतात. कंपनी या दोन्ही फोन मध्ये अँड्रॉइड 11 आणि अँड्रॉइड 12 अपडेट देणार आहे. सुरक्षेसाठी फोन्स मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

पावर बॅकअप पाहता दोन्ही फोन मध्ये 5000एमएएच बॅटरी सह येतात. Micromax In Note 1 मध्ये 18W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे आणि In 1B मध्ये 10W चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी दोन्ही फोन मध्ये 4जी एलटीई, वाय-फाई, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, आणि यूएसबी टाइप सी पोर्ट आहे.

हार्डवेयर

In-सीरीजच्या दोन्ही डिवाइसेज मध्ये मीडियाटेकचा प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याची माहिती कंपनीने आधीच दिली होती. Micromax In Note 1 मध्ये HyperEngine गेमिंग असलेला MediaTek Helio G85 SoC सह 4GB रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे. तर In 1b मध्ये MediaTek Helio G35 SoC सह Mali-G52 GPU देण्यात आला आहे. सोबतच या फोन मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे.

किंमत

Micromax IN 1b कंपनीने 6,999 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला आहे. हि किंमत फोनच्या 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंटची आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वर्जनची किंमत 7,999 रुपये आहे. तसेच या सीरीजच्या मोठ्या फोन Micromax IN Note 1 च्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये व 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. दोन्ही फोन 24 नोव्हेंबर पासून ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑफिशियल साइट वर विक्रीसाठी येतील.

The post Micromax चा चीनी कंपन्यांवर वार, लॉन्च केले 5000mAh बॅटरी आणि 48MP रियर कॅमेरा असलेले दोन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-note-1-in-1b-launched-today-with-5000mah-battery-48mp-camera-know-price-sale-flipkart/feed/ 0
Micromax In सीरीज लॉन्चच्या आधीच आली महत्वाची माहिती समोर, 3 नोव्हेंबरला एंट्री करतील स्वस्त ‘Made In India’ फोन https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-series-mediatek-g35-g85-india-launch-on-3-november-specs/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-series-mediatek-g35-g85-india-launch-on-3-november-specs/#respond Wed, 28 Oct 2020 14:20:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8710 Micromax In सीरीजच्या या स्मार्टफोनची किंमत 7,000 रुपयांच्या आसपास असल्याचे बोलले जात लेकिन 3 नोव्हेंबरला फोन लॉन्च होईस्तोवर हे स्पेसिफिकेशन्स निश्चित म्हणता येणार नाहीत.

The post Micromax In सीरीज लॉन्चच्या आधीच आली महत्वाची माहिती समोर, 3 नोव्हेंबरला एंट्री करतील स्वस्त ‘Made In India’ फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Micromax ने सांगितले आहे कि कंपनी स्मार्टफोन मार्केट मध्ये पुन्हा एकदा वापसी करणार आहे आणि येत्या 3 नोव्हेंबरला माइक्रोमॅक्सचे नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले जातील. हि नवीन सुरवात कंपनीने ‘आत्मनिर्भर भारत’ ला समर्पित करत असल्याचे सांगितले आहे कि तसेच माइक्रोमॅक्सचे आगामी स्मार्टफोन्स ‘Micromax In’ सीरीज अंतगर्त लॉन्च केले जातील. हि सीरीज बाजारात येण्याआधीच माइक्रोमॅक्सने आपल्या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स संबंधित महत्वाची माहिती सार्वजनिक केली आहे.

माइक्रोमॅक्सने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर ट्वीट करून कंपनीच्या आगामी मोबाईल फोन्स मधील चिपसेटचा खुलासा केला आहे. Micromax ने सांगितले आहे कि कंपनी द्वारे लॉन्च केल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्स पैकी एक डिवायस मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेट सह बाजारात येईल, तसेच दुसऱ्या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट मिळेल. चर्चा अशी आहे कि माइक्रोमॅक्सचे आगामी स्मार्टफोन Micromax In 1 आणि Micromax In 1a नावाने मार्केट मध्ये येतील.

स्पेसिफिकेशन्स

कंपनीने आतापर्यंत इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण मीडिया रिपोट्स आणि लीक्समसूर मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेटला सपोर्ट करणाऱ्या फोन मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिली जाईल. हा फोन अँड्रॉइड 10 ओएस वर काम करेल तसेच दोन वेरिएंट्स सह मार्केट मध्ये लॉन्च होईल त्यातील एकात 2 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज आणि दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल मेमरी मिळू शकते.

हे देखील वाचा : मोबाईल डेटा स्पीड मध्ये अशी आहे India ची रँकिंग, भारताची पुन्हा घसरण

बोलले जात आहे कि उपरोक्त फोनच्या 2 जीबी रॅम वेरिएंट मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल तसेच 3 जीबी रॅम वेरिएंट मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. 2 जीबी रॅम वेरिएंटची बद्दल बोलायचे तर यात 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल असलेला रियर कॅमेरा सेटअप तसेच 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

तसेच फोन मध्ये 3 जीबी रॅम वेरिएंटच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलची थर्ड लेंस दिली जाऊ शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच लीकनुसार Micromax चा हा फोन पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा : LG Velvet भारतात लॉन्च, ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह इतकी दमदार डिजाईन कि पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन

Micromax In सीरीजच्या या स्मार्टफोनची किंमत 7,000 रुपयांच्या आसपास असल्याचे बोलले जात लेकिन 3 नोव्हेंबरला फोन लॉन्च होईस्तोवर हे स्पेसिफिकेशन्स निश्चित म्हणता येणार नाहीत. माइक्रोमॅक्स आपल्या आगामी फोन्स सह ‘आओ चीनी कम करें’ टॅग लाईनचा वापर करत आहे, ज्यावरून स्पष्ट होते कि इंडियन कंपनी Micromax चे थेट टारगेट Xiaomi, Realme, OPPO आणि Vivo सारख्या चायनीज कंपन्या आहेत.

The post Micromax In सीरीज लॉन्चच्या आधीच आली महत्वाची माहिती समोर, 3 नोव्हेंबरला एंट्री करतील स्वस्त ‘Made In India’ फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-series-mediatek-g35-g85-india-launch-on-3-november-specs/feed/ 0
Micromax चा ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन 3 नोव्हेंबरला होईल लॉन्च, किंमत असेल फक्त 7,000 रुपयांच्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-smartphone-india-launch-on-3-november-aao-karein-cheeni-kum/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-smartphone-india-launch-on-3-november-aao-karein-cheeni-kum/#respond Fri, 23 Oct 2020 14:40:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8657 Micromax बद्दल काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यात सांगण्यात आले होते कि कंपनी भारतात तीन नवीन स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे.

The post Micromax चा ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन 3 नोव्हेंबरला होईल लॉन्च, किंमत असेल फक्त 7,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Micromax ने ज्या दिवशी घोषणा केली होती कि कंपनी स्मार्टफोन मार्केट मध्ये पुन्हा एकदा प्रवेश करण्याची तयारी करत आहे, तेव्हा पासून भारतीय मोबाईल युजर्स माइक्रोमॅक्स फोनची वाट बघत आहेत. कंपनीने सांगितले होते कि आपले आगामी स्मार्टफोन्स ‘इन मोबाईल्स’ अंतगर्त सादर करेल. आज माइक्रोमॅक्सने आपल्या नवीन फोनची लॉन्च डेट पण सांगितली आहे. माइक्रोमॅक्स आपल्या नवीन स्मार्टफोन्स सह येत्या 3 नोव्हेंबरला पुन्हा एकदा मोबाईल बाजारात येईल.

माइक्रोमॅक्सने माहिती दिली आहे कि कंपनी येत्या 3 नोव्हेंबरला आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर करेल. कंपनीने या दिवशी लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनचे नाव सांगितले नाही पण चर्चा आहे कि यादिवशी एकापेक्षा जास्त स्मार्टफोन भारतात लॉन्च होतील. फोनच्या लॉन्च डेटची माहिती देण्यासोबतच माइक्रोमॅक्सने स्पष्ट केले आहे कि नवीन मोबाईल फोन्सने ते थेट चायनीज ब्रँड्सना टक्कर देण्याची तयारी करत आहेत. माइक्रोमॅक्सने फोनच्या लॉन्च इन्वायट सह ‘आओ चीनी कम करें’ टॅग लाईनचा वापर केला आहे.

Micromax चे को-फाउंडर राहुल शर्मा यांनी सांगितले होते कि कंपनी देशात आपला नवीन सब-ब्रँड घेऊन येत आहे ज्याचा नाव ‘IN Mobiles’ असेल. इथे IN चा अर्थ इंडियाच आहे. माइक्रोमॅक्सच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे कि कंपनीचा थेट टारगेट देशातील चीनी कंपन्या असतील आणि IN Mobiles ‘आत्मनिर्भर भारत’ ला समर्पित असेल. कंपनीने दावा केला आहे कि त्यांच्या आगामी स्मार्टफोन्स पूर्णपणे भारतात बनलेले असतील आणि भारतीय युजर्सना लक्षात ठेऊन बनवले जात आहेत.

7,000 रुपये असू शकते बजेट

Micromax बद्दल काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यात सांगण्यात आले होते कि कंपनी भारतात तीन नवीन स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट नुसार माइक्रोमॅक्स तिन्ही स्मार्टफोन्स मीडियाटेक चिपसेट सह बाजारात येतील. या मोबाईल फोन्सच्या नावाबाबत सध्या काही जास्त बोलता येणार नाही पण रिपोर्टनुसार माइक्रोमॅक्सचे दोन स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट सह येऊ शकतात आणि एक फोन मध्ये मीडियाटेक हीलियो जी25 चिपसेट मिळेल.

असे पण होऊ शकते कि वर सांगितलेले फोन IN Mobiles अंतगर्त लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्स पेक्षा वेगळे असतील. रिपोर्टनुसार हे तिन्ही स्मार्टफोन बजेट सेग्मेंट मध्ये येतील. या तिन्ही डिवाईसेज मध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोनची किंमत 7,000 रुपयांपर्यंत असू शकते तर सर्वात महागड्या फोनचे मूल्य जास्तीत जास्त 15,000 रुपये ठेवले जाईल. Micromax कडून कोणताही नवीन अपडेट मिळताच वाचकांना कळवले जाईल.

The post Micromax चा ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन 3 नोव्हेंबरला होईल लॉन्च, किंमत असेल फक्त 7,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-smartphone-india-launch-on-3-november-aao-karein-cheeni-kum/feed/ 0
Micromax ने केली घोषणा येत आहे ‘Indian’ सीरीज, आता मिळेल चिनी कंपन्यांना चोख प्रत्युत्तर https://www.91mobiles.com/marathi/micromax-founder-rahul-sharma-announced-new-sub-brand-in-indian-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-founder-rahul-sharma-announced-new-sub-brand-in-indian-smartphone/#respond Fri, 16 Oct 2020 14:03:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8551 IN Mobiles माइक्रोमॅक्सने ‘आत्मनिर्भर भारत’ ला समर्पित केला आहे.

The post Micromax ने केली घोषणा येत आहे ‘Indian’ सीरीज, आता मिळेल चिनी कंपन्यांना चोख प्रत्युत्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन बाजारावर चायनीज कंपन्यांचे राज्य आहे आणि हे काही मोठे गुपित नाही. Xiaomi, Realme, Oppo, Vivo, OnePlus आणि Poco सारख्या ब्रॅंड्सनी भारतीय मोबाईल बाजाराच्या मोठ्या भागावर कब्जा केला आहे. कुठे ना कुठे तरी देशात पर्यायांची कमतरता आणि या कंपन्यांद्वारे योग्य बजेट मध्ये चांगले स्पेसिफिकेशन्स दिल्यामुळे पण भारतीय जनता आकर्षित होत आहे. पण या दरम्यान देशी कंपनी Micromax ने घोषणा केली आहे कि ते भारतात आपला सब-ब्रँड घेऊन येत आहेत आणि याचे नाव ‘IN Mobiles’ असेल.

Micromax चे को-फाउंडर राहुल शर्मा यांनी अधिकृतपणे कंपनीच्या आगामी प्रोडक्ट्सची घोषणा केली आहे. राहुलने असा खुलासा पण केला आहे कि कंपनी देशात आपला नवीन सब-ब्रँड घेऊन येत आहे. आतापर्यंत मिळलेल्या माहितीनुसार या सब-ब्रँडचे नाव ‘IN Mobiles’ असेल. इथे IN चा अर्थ इंडियाच आहे. या ब्रँड अंतगर्त लॉन्च होणारे सर्व स्मार्टफोन्स या टाइटल सह बाजारात येतील. नवीन अनाउंसमेंट सोबतच माइक्रोमॅक्सच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे कि कंपनीचा थेट टारगेट देशातील चीनी कंपन्या असतील.

IN Mobiles माइक्रोमॅक्सने ‘आत्मनिर्भर भारत’ ला समर्पित केला आहे. कंपनीने दावा केला आहे कि त्यांचे आगामी स्मार्टफोन्स पूर्णपणे भारतात बनलेले असतील आणि भारतीय यूजर्सना लक्षात ठेऊन बनवले जातील. ‘इन मोबाईल्स’ अंतगर्त सुरवातीला किती स्मार्टफोन्स लॉन्च केले जातील आणि त्यांची नावे काय असतील हि माहिती समोर आली नाही. पण ते म्हटले येईल कि Xiaomi व Realme सारख्या ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी Micromax आणि IN Mobiles लो बजेटला आपले हत्यार बनवेल.

बजेट असू शकते 7,000 रुपये

Micromax बद्दल काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यात सांगण्यात आले होते कि कंपनी भारतात तीन नवीन स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट नुसार माइक्रोमॅक्स तिन्ही स्मार्टफोन्स मीडियाटेक चिपसेट सह बाजारात येतील. या मोबाईल फोन्सच्या नावाबाबत सध्या काही जास्त बोलता येणार नाही पण रिपोर्टनुसार माइक्रोमॅक्सचे दोन स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट सह येऊ शकतात आणि एक फोन मध्ये मीडियाटेक हीलियो जी25 चिपसेट मिळेल.

असे पण होऊ शकते कि वर सांगितलेले फोन IN Mobiles अंतगर्त लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्स पेक्षा वेगळे असतील. रिपोर्टनुसार हे तिन्ही स्मार्टफोन बजेट सेग्मेंट मध्ये येतील. या तिन्ही डिवाईसेज मध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोनची किंमत 7,000 रुपयांपर्यंत असू शकते तर सर्वात महागड्या फोनचे मूल्य जास्तीत जास्त 15,000 रुपये ठेवले जाईल. Micromax कडून कोणताही नवीन अपडेट मिळताच वाचकांना कळवले जाईल.

The post Micromax ने केली घोषणा येत आहे ‘Indian’ सीरीज, आता मिळेल चिनी कंपन्यांना चोख प्रत्युत्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-founder-rahul-sharma-announced-new-sub-brand-in-indian-smartphone/feed/ 0