Micromax In सीरीज लॉन्चच्या आधीच आली महत्वाची माहिती समोर, 3 नोव्हेंबरला एंट्री करतील स्वस्त ‘Made In India’ फोन

Micromax ने सांगितले आहे कि कंपनी स्मार्टफोन मार्केट मध्ये पुन्हा एकदा वापसी करणार आहे आणि येत्या 3 नोव्हेंबरला माइक्रोमॅक्सचे नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले जातील. हि नवीन सुरवात कंपनीने ‘आत्मनिर्भर भारत’ ला समर्पित करत असल्याचे सांगितले आहे कि तसेच माइक्रोमॅक्सचे आगामी स्मार्टफोन्स ‘Micromax In’ सीरीज अंतगर्त लॉन्च केले जातील. हि सीरीज बाजारात येण्याआधीच माइक्रोमॅक्सने आपल्या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स संबंधित महत्वाची माहिती सार्वजनिक केली आहे.

माइक्रोमॅक्सने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर ट्वीट करून कंपनीच्या आगामी मोबाईल फोन्स मधील चिपसेटचा खुलासा केला आहे. Micromax ने सांगितले आहे कि कंपनी द्वारे लॉन्च केल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्स पैकी एक डिवायस मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेट सह बाजारात येईल, तसेच दुसऱ्या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट मिळेल. चर्चा अशी आहे कि माइक्रोमॅक्सचे आगामी स्मार्टफोन Micromax In 1 आणि Micromax In 1a नावाने मार्केट मध्ये येतील.

स्पेसिफिकेशन्स

कंपनीने आतापर्यंत इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण मीडिया रिपोट्स आणि लीक्समसूर मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेटला सपोर्ट करणाऱ्या फोन मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिली जाईल. हा फोन अँड्रॉइड 10 ओएस वर काम करेल तसेच दोन वेरिएंट्स सह मार्केट मध्ये लॉन्च होईल त्यातील एकात 2 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज आणि दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल मेमरी मिळू शकते.

हे देखील वाचा : मोबाईल डेटा स्पीड मध्ये अशी आहे India ची रँकिंग, भारताची पुन्हा घसरण

बोलले जात आहे कि उपरोक्त फोनच्या 2 जीबी रॅम वेरिएंट मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल तसेच 3 जीबी रॅम वेरिएंट मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. 2 जीबी रॅम वेरिएंटची बद्दल बोलायचे तर यात 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल असलेला रियर कॅमेरा सेटअप तसेच 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

तसेच फोन मध्ये 3 जीबी रॅम वेरिएंटच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलची थर्ड लेंस दिली जाऊ शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच लीकनुसार Micromax चा हा फोन पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा : LG Velvet भारतात लॉन्च, ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह इतकी दमदार डिजाईन कि पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन

Micromax In सीरीजच्या या स्मार्टफोनची किंमत 7,000 रुपयांच्या आसपास असल्याचे बोलले जात लेकिन 3 नोव्हेंबरला फोन लॉन्च होईस्तोवर हे स्पेसिफिकेशन्स निश्चित म्हणता येणार नाहीत. माइक्रोमॅक्स आपल्या आगामी फोन्स सह ‘आओ चीनी कम करें’ टॅग लाईनचा वापर करत आहे, ज्यावरून स्पष्ट होते कि इंडियन कंपनी Micromax चे थेट टारगेट Xiaomi, Realme, OPPO आणि Vivo सारख्या चायनीज कंपन्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here