MIUI 11 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 04 Sep 2019 13:11:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi 24 सप्टेंबरला लॉन्च करू शकते सर्वात पावरफुल फोन Mi MIX 4, फोन मध्ये असेल 108MP कॅमेरा आणि 12जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-4-might-launch-on-24-september-with-108mp-camera-12gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-4-might-launch-on-24-september-with-108mp-camera-12gb-ram/#respond Wed, 04 Sep 2019 13:11:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5221 लीक्स नुसार Xiaomi Mi MIX 4 चा डिस्प्ले 120हर्ट्ज च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

The post Xiaomi 24 सप्टेंबरला लॉन्च करू शकते सर्वात पावरफुल फोन Mi MIX 4, फोन मध्ये असेल 108MP कॅमेरा आणि 12जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi Mi MIX 4 बद्दल आता पर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनचे वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले आहेत. Mi MIX 4 बद्दल काही लीक्स मध्ये असे सांगण्यात आले आहे कि हा जगातील पहिला स्मार्टफोन असू शकतो ज्यात 108-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर मिळाले. Xiaomi ने अजूनतरी या स्मार्टफोनची कोणतीही माहिती दिली नाही पण एका ताजा रिपोर्ट मध्ये बोलले जात आहे कि कंपनी येत्या 24 सप्टेंबरला Mi MIX 4 सादर करू शकते.

Xiaomi 24 सप्टेंबरला चीनच्या शांघाय मध्ये एका ईवेंटचे आयोजन करत आहे. शाओमी या ईवेंट मध्ये कंपनीचा नवीन यूजर इंटरफेस MIUI 11 सादर करेल. काही मीडिया रिपोर्ट्स नुसार याच दिवशी MIUI 11 सह Xiaomi Mi MIX 4 स्मार्टफोन समोर ठेवेल. दुसरीकडे 24 सप्टेंबरला आयोजित ईवेंट मध्ये Mi 9s स्मार्टफोन लॉन्च होण्याची पण चर्चा आहे. Xiaomi ने अजूनतरी या दोन्ही फोन बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार आगामी शाओमी फोनचे स्पेसिफिकेशन्स आम्ही पुढे दिले आहेत.

Xiaomi Mi MIX 4

लीक्स नुसार हा फोन सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे शानदार स्क्रीन-टू-बॉडी रेशियो सह येईल. या फोन मध्ये एमोलेड 2के रेज्ल्यूशन असलेला डिस्प्ले मिळू शकतो जो एचडीआर10+ क्वॉलिटी देईल. तसेच लीक्स नुसार Xiaomi Mi MIX 4 चा डिस्प्ले 120हर्ट्ज च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

Xiaomi Mi MIX 4 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा स्मार्टफोन 12जीबी रॅम मेमरीला सपोर्ट करेल. तसेच फोनच्या या वेरिएंट मध्ये 1टीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. त्याचबरोबर Mi MIX 4 मध्ये 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा सर्वात पावरफुल आणि दमदार चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ दिला जाऊ शकतो. हा शाओमीचा पहिला फोन असू शकतो जो MIUI 11 सह येईल.

Mi MIX 4 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन Xiaomi चा पहिला डिवाईस असू शकतो जो 108-मेगापिक्सल कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी सह सादर केला जाईल. हा फोन Samsung ISOCELL Bright HMX टेक्नॉलॉजी वर लॉन्च केला जाऊ शकतो. त्याचबरोबर मी मिक्स 4 मध्ये 12-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा, 16-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेंस आणि एक पॅरीस्कोप लेंस दिली जाऊ शकते.

या फोन मध्ये 4,500एमएएच ची बॅटरी असल्याचे बोलले जात आहे. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोनची बॅटरी 100वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन यूएफएस 3.1 स्टोरेजला सपोर्ट करेल त्याचबरोबर Mi MIX 4 आईपी68 रेटिंग सह बाजारात येईल. फोनच्या स्पेसिफिकेशन्स वर तोपर्यंत विश्वास ठेवता येणार नाही जोपर्यंत Xiaomi हा सादर करत नाही.

The post Xiaomi 24 सप्टेंबरला लॉन्च करू शकते सर्वात पावरफुल फोन Mi MIX 4, फोन मध्ये असेल 108MP कॅमेरा आणि 12जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-4-might-launch-on-24-september-with-108mp-camera-12gb-ram/feed/ 0
हे शाओमी स्मार्टफोन होतील नवीन आणि एडवांस मीयूआई 11 ने अपडेट, बघा तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये https://www.91mobiles.com/marathi/miui-11-update-xiaomi-mi-redmi-mix-smartphone-list-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/miui-11-update-xiaomi-mi-redmi-mix-smartphone-list-in-marathi/#respond Fri, 15 Feb 2019 14:01:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3641 मीयूआई जून पासून वरील स्मार्टफोन्स वर अपडेट व्हायला सुरुवात होईल.

The post हे शाओमी स्मार्टफोन होतील नवीन आणि एडवांस मीयूआई 11 ने अपडेट, बघा तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने कालच घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 28 फेब्रुवारीला भारतात आपल्या रेडमी ब्रॅण्डचा नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 7 लॉन्च करणार आहे. शाओमीच्या अन्य स्मार्टफोन्स प्रमाणे रेडमी नोट 7 ची वाट पण टेक यूजर्स उत्सुकतेने बघत आहेत. शाओमीचे स्मार्टफोन लोकांना आवडतात कारण हि कंपनी कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन्स देते तसेच वेळोवेळी आपल्या फोनचे सॉफ्टवेयर व आपरेटिंग सिस्टम पण अपडेट करत असते. गेल्याच महिन्यात कंपनीने आपल्या नवा यूजर इंटरफेस मीयूआई 11 सादर केला होता, तसेच आता त्या स्मार्टफोन्सची लिस्ट पण समोर आली आहे जे लवकरच मीयूआई 11 ने अपडेट होतील.

शाओमी ने मीयूआई 11 अजून अधिकृतपणे रोल आउट केला नाही. शाओमीचा हा यूजर इंटरफेस खूपच एडवांस फीचर्स सह येईल. शाओमीचे सीईओ लेई जून यांच्यानुसार मीयूआई चा हा नवा अपडेट यूजर इंटरफेसचा अनुभव वरच्या थराला नेईल. मीयूआई 11 मध्ये स्मार्टफोनच्या ऑपरेशन पासून फोन मधील ऍपचा वापर, कॅमेरा फीचर्स तसेच इतर सेटिंग्स पण पहिल्यापेक्षा अटरेक्टिव आणि एडवांस होतील.

मी सीरीजचे हे फोन होतील मीयूआई 11 ने अपडेट

शाओमी मी 9,
मी 8,
मी 6एक्स,
मी 6,
मी 5एक्स,
मी 5सी,
मी 5एस,
मी 5एस प्लस,
मी प्ले

मिक्स सीरीजचे हे फोन होतील मीयूआई 11 ने अपडेट

मी मिक्स 3,
मी मिक्स 2एस,
मी मिक्स 2,
मी मिक्स 1
मी नोट 2,
मी नोट 3,
मी मॅक्स 2,
मी मॅक्स,
मी मॅक्स 3

रेडमी सीरीजचे हे फोन होतील मीयूआई 11 ने अपडेट

रेडमी नोट 7,
रेडमी 6 प्रो,
रेडमी नोट 7 प्रो,
रेडमी नोट 5,
रेडमी नोट 5 प्रो,
रेडमी नोट 5ए,
रेडमी नोट 4,
रेडमी नोट 4एक्स,
रेडमी नोट 6,
रेडमी नोट 6 प्रो,
रेडमी 6,
रेडमी 6ए,
रेडमी 5,
रेडमी 5ए,
रेडमी 5 प्लस,
रेडमी 4,
रेडमी 4ए,
रेडमी 4एक्स,
रेडमी 3एस/3एक्स,
रेडमी एस2

हि लिस्ट शाओमी कडून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही पण परदेशी मीडिया ने हि लिस्ट शेयर केली आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि मीयूआई जून पासून वरील स्मार्टफोन्स वर अपडेट व्हायला सुरुवात होईल.

The post हे शाओमी स्मार्टफोन होतील नवीन आणि एडवांस मीयूआई 11 ने अपडेट, बघा तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/miui-11-update-xiaomi-mi-redmi-mix-smartphone-list-in-marathi/feed/ 0