Xiaomi 24 सप्टेंबरला लॉन्च करू शकते सर्वात पावरफुल फोन Mi MIX 4, फोन मध्ये असेल 108MP कॅमेरा आणि 12जीबी रॅम

Xiaomi Mi MIX 4 बद्दल आता पर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनचे वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले आहेत. Mi MIX 4 बद्दल काही लीक्स मध्ये असे सांगण्यात आले आहे कि हा जगातील पहिला स्मार्टफोन असू शकतो ज्यात 108-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर मिळाले. Xiaomi ने अजूनतरी या स्मार्टफोनची कोणतीही माहिती दिली नाही पण एका ताजा रिपोर्ट मध्ये बोलले जात आहे कि कंपनी येत्या 24 सप्टेंबरला Mi MIX 4 सादर करू शकते.

Xiaomi 24 सप्टेंबरला चीनच्या शांघाय मध्ये एका ईवेंटचे आयोजन करत आहे. शाओमी या ईवेंट मध्ये कंपनीचा नवीन यूजर इंटरफेस MIUI 11 सादर करेल. काही मीडिया रिपोर्ट्स नुसार याच दिवशी MIUI 11 सह Xiaomi Mi MIX 4 स्मार्टफोन समोर ठेवेल. दुसरीकडे 24 सप्टेंबरला आयोजित ईवेंट मध्ये Mi 9s स्मार्टफोन लॉन्च होण्याची पण चर्चा आहे. Xiaomi ने अजूनतरी या दोन्ही फोन बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार आगामी शाओमी फोनचे स्पेसिफिकेशन्स आम्ही पुढे दिले आहेत.

Xiaomi Mi MIX 4

लीक्स नुसार हा फोन सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे शानदार स्क्रीन-टू-बॉडी रेशियो सह येईल. या फोन मध्ये एमोलेड 2के रेज्ल्यूशन असलेला डिस्प्ले मिळू शकतो जो एचडीआर10+ क्वॉलिटी देईल. तसेच लीक्स नुसार Xiaomi Mi MIX 4 चा डिस्प्ले 120हर्ट्ज च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

Xiaomi Mi MIX 4 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा स्मार्टफोन 12जीबी रॅम मेमरीला सपोर्ट करेल. तसेच फोनच्या या वेरिएंट मध्ये 1टीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. त्याचबरोबर Mi MIX 4 मध्ये 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा सर्वात पावरफुल आणि दमदार चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ दिला जाऊ शकतो. हा शाओमीचा पहिला फोन असू शकतो जो MIUI 11 सह येईल.

Mi MIX 4 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन Xiaomi चा पहिला डिवाईस असू शकतो जो 108-मेगापिक्सल कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी सह सादर केला जाईल. हा फोन Samsung ISOCELL Bright HMX टेक्नॉलॉजी वर लॉन्च केला जाऊ शकतो. त्याचबरोबर मी मिक्स 4 मध्ये 12-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा, 16-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेंस आणि एक पॅरीस्कोप लेंस दिली जाऊ शकते.

या फोन मध्ये 4,500एमएएच ची बॅटरी असल्याचे बोलले जात आहे. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोनची बॅटरी 100वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन यूएफएस 3.1 स्टोरेजला सपोर्ट करेल त्याचबरोबर Mi MIX 4 आईपी68 रेटिंग सह बाजारात येईल. फोनच्या स्पेसिफिकेशन्स वर तोपर्यंत विश्वास ठेवता येणार नाही जोपर्यंत Xiaomi हा सादर करत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here