Moto G10 Power - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 09 Mar 2021 14:29:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेरा असलेला हा Motorola फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g10-power-india-launched-at-rs-9999-price-with-6000mah-battery-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g10-power-india-launched-at-rs-9999-price-with-6000mah-battery-specs-sale/#respond Tue, 09 Mar 2021 14:29:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10303 Moto G10 Power एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेरा असलेला हा Motorola फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने इंडियन मार्केटमध्ये आज आपली ‘जी’ सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Moto G30 आणि Moto G10 Power लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन लो बजेट मध्ये सादर करण्यात आले आहेत जे या महिन्यात सेलसाठी उपलब्ध होतील. मोटो जी30 10,999 रुपयांच्या किंमतीत बाजारात आला आहे तर मोटो जी10 पावर ने 9,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री केली आहे. मोटो जी10 पावर 6,000एमएएच च्या पावरफुल बॅटरीला सपोर्ट करतो.

Moto G10 Power
मोटोरोला मोटो जी10 पावर बद्दल बोलायचे तर हा मोबाईल फोन पण बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर झाला आहे. फोनची स्क्रीन तीन बाजूंनी बेजल लेस आहे खालच्या बाजूला रुंद बॉडी पार्ट आहे. स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेली नॉच देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मॅक्स विजन डिस्प्लेला सपोर्ट करतो. मोटोरोलाचा हा फोन आईपी52 रेटेड आहे.

Moto G10 Power एंडरॉयड 11 ओएसच्या ‘स्टॉक’ वर लॉन्च केला गेला आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 460 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा फोन 4 जीबी रॅम मेमरीसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे ज्यात मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी मोटो जी10 पावर क्वॉड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा मोटोरोला फोन एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto G10 Power एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. या फोनमध्ये डेडिकेटेट गूगल असिस्टेंट बटन पण देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड मोटो लोगो आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी मोटो जी10 पावर स्मार्टफोन 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा येत्या 16 मार्च पासून फक्त 9,999 रुपयांमध्ये Aurora Grey आणि Breeze Blue कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेरा असलेला हा Motorola फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g10-power-india-launched-at-rs-9999-price-with-6000mah-battery-specs-sale/feed/ 0
Moto G30 भारतात लॉन्च, Realme च्या समोर नवे आव्हान https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g30-launched-in-india-price-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g30-launched-in-india-price-specs-sale-offer/#respond Tue, 09 Mar 2021 11:04:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10300 Moto G30 एंडरॉयड 11 ओएस ‘स्टॉक’ वर लॉन्च केला गेला आहे. स्टॉक एंडरॉयडला प्योर एंडरॉयड पण म्हणतात ज्यात ओएस किंवा यूआईची एक्स्ट्रा लेयर दिली जात नाही.

The post Moto G30 भारतात लॉन्च, Realme च्या समोर नवे आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने आज भारतात एकसाथ दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. स्मार्टफोन Moto G30 आणि Moto G10 Power नावाने लॉन्च झाले आहेत. मोटोरोलाचे दोन्ही नवीन स्मार्टफोन्स स्टॉक एंडरॉयड 11 सह बाजारात आले आहेत. आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले हे मोबाईल फोन्स कंपनीने द्वारे कमी किंमतीत लॉन्च केले गेले आहेत. Moto G30 10,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 17 मार्चपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध होईल. मोटो जी30 ची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे. (motorola moto g30 launched in india price specs sale offer)

Moto G30
मोटोरोला मोटो जी30 वॉटरड्रॉप नॉच डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत परंतु खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 20:09 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मॅक्सविजन आईपीएस टीएफटी एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. तसेच 269पीपीआई पिक्सल डेनसिटीला सपोर्ट करतात.

Moto G30 एंडरॉयड 11 ओएस ‘स्टॉक’ वर लॉन्च केला गेला आहे. स्टॉक एंडरॉयडला प्योर एंडरॉयड पण म्हणतात ज्यात ओएस किंवा यूआईची एक्स्ट्रा लेयर दिली जात नाही. मोटोरोला मोटो जी30 स्मार्टफोन आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट वर चालतो. बाजारात हा फोन 4 जीबी रॅम मेमरीसह लॉन्च झाला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. माइक्रोएसडी कार्डने मेमरी 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटो जी30 क्वॉड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढ्याच अपर्चरचा 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Motorola Moto G30 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड मोटो लोगो देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी मोटो जी30 मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन Dark Pearl आणि Pastel Sky कलर मध्ये 17 मार्च पासून विकत घेता येईल.

The post Moto G30 भारतात लॉन्च, Realme च्या समोर नवे आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g30-launched-in-india-price-specs-sale-offer/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी असलेला Moto G10 Power उद्या होईल भारतात लॉन्च, पावरफुल Moto G30 ची पण होईल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/moto-g10-power-and-moto-g30-india-launch-how-to-watch-live-with-6000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g10-power-and-moto-g30-india-launch-how-to-watch-live-with-6000mah-battery/#respond Mon, 08 Mar 2021 11:59:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10291 Moto G30 आणि Moto G10 Power स्मार्टफोन उद्या म्हणजे 9 मार्चला भारतात लॉन्च होतील. हा उद्या दुपारी 12 वाजता सुरु होईल जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच मोटोरोला इंडियाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण दाखवला जाईल.

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला Moto G10 Power उद्या होईल भारतात लॉन्च, पावरफुल Moto G30 ची पण होईल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने सांगितले आहे कि कंपनी उद्या म्हणजे 9 मार्चला भारतात आपली ‘जी’ सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Moto G10 Power आणि Moto G30 लॉन्च करेल. हे दोन्ही स्मार्टफोन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होतील ज्यांचे प्रोडक्ट पेज पण लाईव झाले आहे. मोटो जी10 पावर बद्दल बोलले जात होते कि हा स्मार्टफोन यूरोपमध्ये लॉन्च झालेल्या Moto G10 चा रीब्रँडेड वर्जन असेल. पण लॉन्चच्या आधीच कंपनीने स्पष्ट केले आहे कि Moto G10 Power एक वेगळा आणि नवीन डिवायस असेल जो 6,000एमएएच बॅटरी, 48एमपी क्वॉड कॅमेरा आणि अँड्रॉइड 11 सारख्या फीचर्ससह येईल. (Moto G10 Power and Moto G30 India Launch how to watch live with 6000mah battery)

Moto G10 Power मोटोरोला इंडियाद्वारे सतत टीज केला जात आहे. टेक विश्वात चर्चा होती कि यूरोपमध्ये जो फोन मोटो जी10 नावाने लॉन्च झाला होता तोच फोन भारतात मोटो जी10 पावर नावाने येईल. पण कंपनीने स्पेसिफिकेशन्स शेयर केल्यानंतर स्पष्ट झाले आहे कि मोटो जी10 पावर एक वेगळा फोन असेल. मोटोरोलाने सांगितले आहे कि Moto G10 Power भारतात 6,000एमएएचच्या मोठी बॅटरीसह लॉन्च होईल तसेच फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल ज्याचा प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल.

लॉन्च डिटेल

Moto G30 आणि Moto G10 Power स्मार्टफोन उद्या म्हणजे 9 मार्चला भारतात लॉन्च होतील. हा उद्या दुपारी 12 वाजता सुरु होईल जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच मोटोरोला इंडियाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण दाखवला जाईल. या लॉन्चचा एक प्रोडक्ट पेज शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर पण लिस्ट केला गेला आहे आणि दुपारी 12 वाजता लॉन्च सुरु होताच हा वेबसाइटवर पण लाईव दिसेल.

Moto G10 Power आणि Moto G30

यूरोपमध्ये लॉन्च केले गेले आहेत मोटो जी10 आणि मोटो जी30 पाहता हे दोन्ही मोबाईल फोन 2000 x 1,600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या आयपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. Moto G30 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि Moto G10 मध्ये 60Hz रिफ्रेश रेट आहे. प्रोसेसिंगसाठी मोटो G30 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे तर मोटो जी10 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेटला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : लॉन्च झाला 18GB रॅम असलेला जगातील पहिला आणि सर्वात पावरफुल स्मार्टफोन, आता बदलेल मोबाईल गेमिंगचे विश्व

दोन्ही फोन्स मध्ये कॅमेरा फीचर्स आणि सेंसर एकसारखे आहेत फक्त मेन सेंसरमध्ये फरक आहे. Moto G30 मध्ये मागे अपर्चर f/1.7 सह 64MP चा मेन सेंसर क्वाड पिक्सल टेकसह येतो. तर, Moto G10 मध्ये अपर्चर f/1.7 आणि नाइट विजनसह 48MP कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही फोन मध्ये 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा (118º) आहे. तसेच फोन मध्ये 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे.

Moto G30 मध्ये 4GB आणि 6GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते. मोटो जी10 मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेजसह, 4जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट आहेत आणि मोटो जी30 प्रमाणे माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज वाढवता येते.

हे देखील वाचा : गेमिंग फोन्सची व्याख्या बदलण्यास येत आहे Nokia G10, लॉन्चच्याआधी बघा यातील फीचर्स

दोन्ही 4जी फोन (कॅट 4) आहेत, ज्यांच्यात कनेक्टिविटी ऑप्शनसाठी वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, एनएफसी आणि अनेक सॅटेलाइट पोजिशनिंग सिस्टम सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच वायर्ड कनेक्टिविटी मध्ये यूएसबी-सी आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकचा समावेश आहे. फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यूरोपमध्ये हे दोन्ही फोन 5,000एमएएच बॅटरीवर लॉन्च झाले होते त्यातील मोटो जी10 पावर भारतात 6,000एमएएच बॅटरीसह येईल.

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला Moto G10 Power उद्या होईल भारतात लॉन्च, पावरफुल Moto G30 ची पण होईल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g10-power-and-moto-g30-india-launch-how-to-watch-live-with-6000mah-battery/feed/ 0