लॉन्च झाला 18GB रॅम असलेला जगातील पहिला आणि सर्वात पावरफुल स्मार्टफोन, आता बदलेल मोबाईल गेमिंगचे विश्व

गेमिंग मोबाईल फोन्सच्या जगात पॉप्युलर स्मार्टफोन ब्रँड Nubia ने नवीन आणि दमदार मोबाईल सीरीज Nubia Red Magic 6 अधिकृतपणे चीनमध्ये लॉन्च केली आहे. नूबियाने नेहमीप्रमाणे यावेळी पण आपला नवीन स्मार्टफोन्स खासकरून गेमर्ससाठी बनवला आहे. गेमिंगच्या चाहत्यांसाठी फोनमध्ये पावरफुल प्रोसेसर आणि शानदार डिस्प्ले सोबतच दमदार बॅटरी पण देण्यात आली आहे जी 65 वॉट फास्ट चार्जिंग फीचरसह येते. कंपनीनुसार नूबिया रेड मॅजिक 6 सीरीजमध्ये 4 सर्वात फास्ट टेक्नॉलजीज आहेत, ज्या स्क्रीन, टच आणि फॅन संबंधित आहेत. इतकेच नव्हे तर फोन जगातील पहिला असा हँडसेट आहे, ज्यात तुम्हाला 18जीबी रॅमसह 165Hz रिफ्रेश रेट मिळेल. (nubia red magic 6 pro launch with 18gb ram 165hz refresh rate gaming phone know price specification)

165Hz रिफ्रेश रेट स्क्रीन असलेला जगातील पहिला फोन

नूबियाच्या Red Magic लाइनअप मध्ये सादर करण्यात आलेल्या रेडमॅजिक 6 सीरीज मध्ये दोन फोन Red Magic 6 आणि 6 Pro सादर केले गेले आहेत. 18GB रॅम व्यतिरिक्त दोन्ही फोन जगातील पहिले फोन आहेत जे 165Hz रिफ्रेश रेट स्क्रीनसह सादर केले गेले आहेत.

डिजाइन

Nubia Red Magic 6 आणि Red Magic 6 Pro दोन्ही वेरिएंट लुक आणि डिजाइनच्या बाबतीत जवळपास एकसारखे आहेत. कंपनीने RedMagic 6 सीरीजच्या डिजाइनला मेचा साइंस-फाय नाव दिले आहे. गेमिंग थीमशी जुळवण्यासाठी याच्या रियर पॅनल आणि लाइटिंगमध्ये कार्बन फाइबरदेण्यात आला आहे, ज्यात RedMagic आणि Tencent लोगो आहे. हे दोन कलर- कार्बन फाइबर ब्लॅक आणि सायबर नियॉन (ब्लू आणि पर्पल ग्रैडिएंट डिजाइन) मध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या फोनचे कॅमेरा पाहता यात ट्रिपल रियर कॅमेरा वर्टिकल सेटअप आहे. फ्रंंटला फोनच्या उजवीकडे एक छोटासा पंच-होल देण्यात आला आहे जो बेजल मध्ये आहे. फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत. तर, खाली बारीक चिन पार्ट मिळतो. दोन्ही फोन मध्ये डिजाइनचा फरक पाहता प्रो वेरिएंट मध्ये एविएशन ग्रेड एल्यूमीनियम मिश्र धातु आणि ग्लासचा कॉम्बो आहे. तर RedMagic 6 Pro मध्ये आयरन ब्लॅक आणि आइस ब्लेड सिल्वर कलर ऑप्शन देण्यात आला आहे.

अनेक खास टेक्नॉलजी

कंपनीचा दावा आहे कि हा मोबाईल सर्वात फास्ट आणि सर्वात जास्त पावरफुल आहे, ज्याची वैशिष्ट्ये लोकांना आवडतील. नूबिया रेड मॅजिक 6 सीरीज मध्ये इन-बिल्ट कूलिंग फॅन असेल. हि टेक्नॉलजी आतापर्यंत खूप कमी फोनमध्ये दिसली आहे असा पण कंपनीने दावा केला आहे.

हे देखील वाचा : Motorola ने केली Xiaomi-Realme ला टक्कर देण्याची तयारी, Moto G10 आणि Moto G30 होत आहेत भारतात लॉन्च

शानदार आहे डिस्प्ले

या फोन मध्ये 6.8-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले देण्यात आला, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz आहे. स्क्रीन डायनेमिक कंटेंट उपलब्ध नसतात 30Hz पर्यंत जाते, पण मेनू किंवा ऍप मध्ये 120Hz पर्यंत आणि सपोर्टेड गेम टाइटल मध्ये 165Hz पर्यंत स्केल करता येतो. इतकेच नव्हे तर फोनमध्ये इनपुट लेटेंसी कमी करण्यासाठी 400Hz टच सॅम्पलिंग रेट सपोर्ट देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे पॅनल एक 360Hz मल्टी-टच सॅम्पलिंग रेट आणि 500Hz एक-फिंगर टच सॅम्पलिंग रेट सपोर्टसह येतो. डिस्प्ले 10-बिट कलरला सपोर्ट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह चालतो. डिस्प्लेच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये 91.28% स्क्रीन-बॉडी रेश्यो आणि 1000000: 1 कंट्रास्ट रेशिओचा समावेश आहे.

पावरफुल प्रोसेसर व रॅम/स्टोरेज

फोनमध्ये प्रोसेसिंग पावरसाठी स्नॅपड्रॅगॉन 888 एसओसी Adreno 660 GPU सह देण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगॉन 888 मध्ये 25 टक्के वेगवान CPU परफॉर्मन्स आणि 35 टक्के वेगवान ग्राफिक्स सह 7.5 Gbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड मिळतो. तसेच फोन मध्ये 18GB LPDDR5 रॅम आणि 512GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

बॅटरी आणि कॅमेरा

रेड मॅजिक 6 मध्ये 5,050mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि 38 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकते. तर दुसरीकडे रेड मॅजिक 6 प्रो मध्ये 4,500 एमएएचची बॅटरी आहे जी 120W चार्जिंगला सपोर्टसह येते, जी फक्त 5 मिनिटांत 0-50% चार्ज केली जाऊ शकते. दोन्ही मॉडेल हेडफोन जॅकसह येतात आणि नूबियाच्या ऑप्शनल एयर कूलिंग ऍक्सेसरीला सपोर्ट करतात.

कॅमेरा पाहता या सीरीज मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 64MP मुख्य लेंस, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो सेंसर आहे. वहीं, फ्रंटला तुम्हाला सिंगल 8MP चा सेल्फी शूटर मिळतो. नूबियाने डिवाइस 4K व्हिडीओ, एचडीआरला सपोर्ट आणि इन-हाउस नेओविजन कॅमेरा ऑप्टिमाइजेशन, साइबरपंक फिल्टर इत्यादी कॅमेरा फीचर्ससह आणले आहेत.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M12 अमेझॉनवर लिस्ट, 6000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेऱ्यासह 11 मार्चला होईल लॉन्च

किंमत

नूबिया रेड मॅजिक 6 स्मार्टफोनच्या 8/128 स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,799 (जवळपास 42,800 रुपये), 12/ 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 4,099 (जवळपास 46,000 रुपये) आणि 12 / 256GB वेरिएंटची किंमत CNY 4,399 (जवळपास 49,990 रुपये) आहे.

तर, Red Magic 6 Pro च्या 12/128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 4,399 (जवळपास 49,990 रुपये), 12/256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 4,799 (जवळपास 54,000 रुपये) आणि 16/256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 5,299 (जवळपास 59,000 रुपये) आहे.

या दोन्ही फोन व्यतिरिक्त कंपनीने डिवाइसचा Transparent Edition पण सादर केला आहे, ज्याच्या 16GB रॅम आणि 256 GB स्टोरेजची किंमत CNY 5,599 (जवळपास 63,000 रुपये) आहे. तर, 18GB रॅम आणि 512GB स्टोरेजची किंमत CNY 6,599 (जवळपास 74,000 रुपये) आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here