Moto G7 Power - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Motorola One, Moto G7 आणि Moto G7 Power च्या किंमती पण झाल्या कमी, कंपनी करत आहे मोठा प्लान https://www.91mobiles.com/marathi/moto-g7-g7-power-motorola-one-price-cut-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g7-g7-power-motorola-one-price-cut-in-india/#respond Fri, 14 Jun 2019 14:11:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4576 कंपनीने आपल्या तीन इतर स्मार्टफोन Moto G7, Moto G7 Power आणि Motorola One च्या किंमती पण कमी केल्या आहेत.

The post Motorola One, Moto G7 आणि Moto G7 Power च्या किंमती पण झाल्या कमी, कंपनी करत आहे मोठा प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola इंडियन स्मार्टफोन बाजारासाठी नवीन स्ट्रॅटेजी प्लान करत आहे. कंपनी येत्या 20 जूनला भारतात आपला पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन Motorola One Vision लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चच्या आधी कंपनी बाजारातील ब्रँडच्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करत आहे. Motorola ने आपल्या दोन नवीन स्मार्टफोन Motorola One Power आणि Moto G6 Plus च्या किंमती कमी केल्या होत्या. आता कंपनीने आपल्या तीन इतर स्मार्टफोन Moto G7, Moto G7 Power आणि Motorola One च्या किंमती पण कमी केल्या आहेत.

Motorola One
सर्वात आधी मोटोरोला वन पाहता हा स्मार्टफोन भारतात 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. कपंनीने आता Motorola One च्या किंमतीती थेट 1,000 रुपयांची कपात केली आहे. या प्राइस कट नंतर मोटोरोलाचा एंडरॉयड वन वर्जन आधारित स्मार्टफोन 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Moto G7
मोटो जी7 सीरीज मध्ये लॉन्च झालेला हा स्मार्टफोन पण कंपनी द्वारा 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. आपल्या फॅन्ससाठी मोटोरोला ने Moto G7 ची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर Moto G7 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Moto G7 Power
मोटो जी7 सीरीज मध्ये लॉन्च झालेल्या या मोठया बॅटरी वाल्या स्मार्टफोन कंपनीने 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. या स्मार्टफोनची किंमत कंपनी याआधी 1,000 रुपयांनी कमी केली आहे ज्यानंतर मोटो जी7 पावर 15,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता. पुन्हा एकदा Moto G7 Power ची किंमत 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे आणि आता हा स्मार्टफोन 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Motorola च्या उपरोक्त सर्व स्मार्टफोन वरील प्राइस कटची माहिती द मोबाईल इंडियन ने आपल्या रिपोर्ट मध्ये दिली आहे. वेबसाइट नुसार मोटोरोलाचे हे तुम्ही फोन आफलाईन रिटेल स्टोर्स वर नवीन किंमतीत सेल साठी उपलब्ध होतील. काल झालेल्या प्राइस कट बद्दल बोलायचे तर..

Motorola One Power
कंपनीने हा 15,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता ज्यात 1,000 रुपयांची कपात केली गेली होतीआणि हा डिवाईस 14,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता. तसेच आता पुन्हा कंपनीने या फोनची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर Motorola One Power 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन ऑनलाइन प्लॅटफॉर्म शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध आहे.

मोटोरोला ने आपला जी सीरीजचा हा स्मार्टफोन मीड रेंज मध्ये उतरवला होता ज्याची लॉन्च प्राइस 22,499 रुपये होती. मोटो चा हा फोन ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध आहे. द मोबाईल इंडियन ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर Moto G6 Plus च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. रिपोर्ट नुसार Moto G6 Plus रिटेल स्टोर्स वर 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Motorola One, Moto G7 आणि Moto G7 Power च्या किंमती पण झाल्या कमी, कंपनी करत आहे मोठा प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g7-g7-power-motorola-one-price-cut-in-india/feed/ 0
25 मार्चला भारतात लॉन्च होईल मोटो जी7 https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g7-to-launch-in-india-on-25-march-price-features-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g7-to-launch-in-india-on-25-march-price-features-specifications/#respond Wed, 20 Mar 2019 14:26:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3906 25 मार्चला मोटो जी7 सीरीजचा मोटो जी7 स्मार्टफोन पण भारतीय बाजारात येईल.

The post 25 मार्चला भारतात लॉन्च होईल मोटो जी7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला ने याच आठवड्यात आपल्या इंडियन फॅन्सना भेट देत घोषणा केली होती कि कंपनी लवकरच भारतात मोटो जी7 सीरीज वाढवणार आहे. मोटोरोला ने आपल्या आफिशियल ट्वीटर हॅंडल वरून मोटो जी7 सीरीजच्या इंडिया लॉन्चची माहिती दिली पण कंपनी लॉन्च तारीख सांगितली नव्हती. आता होळीच्या निमित्ताने इंडियन यूजर्सना खुश करत मोटोरोला ने घोषणा केली आहे कि पुढल्याच आठवड्यात 25 मार्चला मोटो जी7 सीरीजचे फोन भारतीय बाजारात येतील.

मोटोरोला इंडिया ने सांगितले आहे कि येत्या 25 मार्चला मोटो जी7 सीरीजचा विस्तार भारतीय बाजारात केला जाईल. विशेष म्हणजे यादिवशी मोटो जी7 सीरीजचा फक्त एकच स्मार्टफोन मोटो जी7 भारतात लॉन्च केला जाईल. 25 मार्चला लॉन्च झाल्यांनतर मोटो जी7 कोणत्या किंमतीत आणि कधी सेल साठी उपलब्ध होईल यासाठी फोन लॉन्चची वाट बघावी लागेल.

लक्षात असू दे कि मोटोरोला अंर्तराष्ट्रीय मंचावर मोटो जी7 सीरीज मध्ये 4 शानदार स्मार्टफोन सादर केले आहेत ज्यात मोटो जी7, मोटो जी7 प्ले, मोटो जी7 प्लस आणि मोटो जी7 पावर स्मार्टफोनचा समावेश आहे. या चार पैकी मोटो जी7 पावर इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये आधीच उपलब्ध झाला आहे तर आता 25 मार्चला मोटो जी7 सीरीजचा मोटो जी7 स्मार्टफोन पण भारतीय बाजारात येईल.

वनप्लस 6टी चे 7 फीचर्स जे आहेत इतरांपेक्षा वरचढ

मोटो जी7
हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2270 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.24-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनी ने मोटो जी7 मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल मेमरी दिली आहे जी माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येते. एंडरॉयड 9 पाई सह मोटो जी7 1.8गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी साठी मोटो जी7 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन आईपी154 रेटिड आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत मोटो जी7 मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

6जीबी रॅम वाला पोको एफ1 झाला 2,000 रुपयांनी स्वस्त, कुठे आणि कसा घ्यावा विकत वाचा सविस्तर

मोटो जी7 पावर
मोटो जी7 मध्ये हा फोन सर्वात मोठ्या बॅटरी साठी ओळखला जातो. नावाप्रमाणे मोटो जी7 पावर मध्ये 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची बॅटरी 15वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन की स्पेसिफिकेशन्सचे पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई सह मोटो जी7 पावर क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 3जीबी रॅम तसेच 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड द्वारे 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटो जी7 पावर च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी मोटो जी7 पावर 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post 25 मार्चला भारतात लॉन्च होईल मोटो जी7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g7-to-launch-in-india-on-25-march-price-features-specifications/feed/ 0
मोटो जी7 सीरीज झाली लॉन्च, मोटो जी7 सह मोटो जी7 प्ले, मोटो जी7 पावर आणि मोटो जी7 प्लस झाले सादर https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g7-moto-g7-play-moto-g7-power-moto-g7-plus-launched-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g7-moto-g7-play-moto-g7-power-moto-g7-plus-launched-feature-specifications-price-in-marathi/#respond Fri, 08 Feb 2019 10:09:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3580 मोटो जी7 प्ले आणि मोटो जी7 पावर रेग्यूलर नॉच सह सादर केले गेले आहेत तर मोटो जी7 प्लस आणि मोटो जी7 मध्ये ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे.

The post मोटो जी7 सीरीज झाली लॉन्च, मोटो जी7 सह मोटो जी7 प्ले, मोटो जी7 पावर आणि मोटो जी7 प्लस झाले सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला ने अनेक दिवसांपूर्वी घोषणा केली होती कि कंपनी 7 फेब्रुवारीला आपली मोटो जी7 सीरीज सादर करणार आहे. त्यानुसार काल कंपनी ने ब्राजील मध्ये ईवेंटचे आयोजन करून आपला लेटेस्ट मोटो जी7 समोर आणला आहे. मोटोरोला ने या ईवेंट मध्ये मोटो जी7, मोटो जी7 प्ले, मोटो जी7 प्लस आणि मोटो जी7 पावर स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. मोटो जी7 प्ले आणि मोटो जी7 पावर रेग्यूलर नॉच सह सादर केले गेले आहेत तर मोटो जी7 प्लस आणि मोटो जी7 मध्ये ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे.

मोटो जी7

हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2270 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.24-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनी ने मोटो जी7 मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल मेमरी दिली आहे जी माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येते. एंडरॉयड 9 पाई सह मोटो जी7 1.8गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी साठी मोटो जी7 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन आईपी154 रेटिड आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत मोटो जी7 मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

मोटो जी7 प्ले

मोटो जी7 सीरीज मध्ये हा सर्वात स्वस्त फोन आहे. कंपनीने हा 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.7-इंचाच्या डिस्प्ले वर सादर केला आहे. मोटो जी7 प्ले मध्ये 2जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली जी माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येते. एंडरॉयड 9 पाई सह हा फोन 1.8गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी साठी मोटो जी7 प्ले 13-मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्यासह 8-मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत मोटो जी7 प्ले मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

मोटो जी7 पावर

मोटो जी7 मध्ये हा फोन सर्वात मोठ्या बॅटरी साठी ओळखला जातो. नावाप्रमाणे मोटो जी7 पावर मध्ये 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची बॅटरी 15वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन की स्पेसिफिकेशन्सचे पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई सह मोटो जी7 पावर क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 3जीबी रॅम तसेच 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड द्वारे 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटो जी7 पावर च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी मोटो जी7 पावर 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

मोटो जी7 प्लस

मोटो जी7 प्लस मोटोरोला च्या नव्या स्मार्टफोन सीरीजचा सर्वात पावरफुल आणि महाग स्मार्टफोन आहे. 19:9 आस्पेक्ट रेशियो सह हा स्मार्टफोन 2,270 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.24-इंचाच्या टीयरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. मोटो जी7 प्लस 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज वर सादर केला गेला आहे जी कार्ड द्वारे 512जीबी पर्यंत एक्सपांड होऊ शकते. हा फोन पण एंडरॉयड 9 पाई सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी साठी मोटो जी7 प्लस डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत मोटो जी7 प्लस मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

मोटो जी7 प्ले = R$999 (अंदाजे 19,000 रुपये)
मोटो जी7 पावर = R$1,399 (अंदाजे 26,900 रुपये)
मोटो जी7 = R$1,599 (अंदाजे 30,700 रुपये)
मोटो जी7 प्लस = R$1,899 (अंदाजे 36,500 रुपये)

The post मोटो जी7 सीरीज झाली लॉन्च, मोटो जी7 सह मोटो जी7 प्ले, मोटो जी7 पावर आणि मोटो जी7 प्लस झाले सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g7-moto-g7-play-moto-g7-power-moto-g7-plus-launched-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी असलेला मोटो जी7 पावर बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, जानेवारी मध्ये होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/moto-g7-power-geekbench-with-specifications-5000mah-battery-snapdragon-625-chipset-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g7-power-geekbench-with-specifications-5000mah-battery-snapdragon-625-chipset-in-marathi/#respond Mon, 24 Dec 2018 13:50:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3212 गीकबेंच वर मोटो जी7 पावर ला सिंगल-कोर मध्ये 1286 स्कोर मिळाला आहे तसेच मल्टी-कोर मध्ये या फोनला 5443 स्कोर देण्यात आला आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी असलेला मोटो जी7 पावर बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, जानेवारी मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला आपल्या मोटो जी7 सीरीजच्या निर्मितीत व्यस्त आहे. कपंनी या सीरीज अंतर्गत 4 नवीन फोन आणण्याची तयारी करत आहे ज्यात मोटो जी7 सोबतच मोटो जी7 प्ले, मोटो जी7 पावर आणि मोटो जी7 प्लस असतील. काही दिवसांपूर्वीच या चारही फोन्सच्या रेंडर ईमेज इंटरनेट वर लीक झाल्या होत्या ज्यामुळे सर्व स्मार्टफोंसच्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली होती. तर आज मोटो जी7 पावर चीनी बेंचमार्किंग साइट वर पण लिस्ट केला गेला आहे.

मोटो जी7 पावर बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचच्या या लिस्टिंग वरून समजले आहे की मोटो जी7 पावर कंपनी लेटेस्ट एंडरॉयड वर्जन 9.0 पाई वर सादर होईल सोबत हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 625 चिपसेट वर चालेल. गीकबेंचच्या लिस्टिंग मध्ये हा फोन 4जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे.

गीकबेंच वर मोटो जी7 पावर ला सिंगल-कोर मध्ये 1286 स्कोर मिळाला आहे तसेच मल्टी-कोर मध्ये या फोनला 5443 स्कोर देण्यात आला आहे. मोटो जी7 पावर चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 32जीबी तसेच 64जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच फोटोग्राफी साठी मोटो जी7 पावर मध्ये 12-मेगापिक्सलचा रियर तर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल.

मोटो जी7 पावर संबंधित या लीक मध्ये सांगण्यात आले आहे की मोटोरोला आपल्या या फोन मध्ये नावानुरूपच 5,000एमएएच ची मोठी व दमदार बॅटरी देईल. तसेच या फोन मध्ये 6.22-इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वी मोटो जी7 पावर अमेरिकी वेबसाइट एफसीसी वर एक्सटी1955-4 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला होता.

The post 5,000एमएएच बॅटरी असलेला मोटो जी7 पावर बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, जानेवारी मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g7-power-geekbench-with-specifications-5000mah-battery-snapdragon-625-chipset-in-marathi/feed/ 0