Motorola One, Moto G7 आणि Moto G7 Power च्या किंमती पण झाल्या कमी, कंपनी करत आहे मोठा प्लान

Motorola इंडियन स्मार्टफोन बाजारासाठी नवीन स्ट्रॅटेजी प्लान करत आहे. कंपनी येत्या 20 जूनला भारतात आपला पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन Motorola One Vision लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चच्या आधी कंपनी बाजारातील ब्रँडच्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करत आहे. Motorola ने आपल्या दोन नवीन स्मार्टफोन Motorola One Power आणि Moto G6 Plus च्या किंमती कमी केल्या होत्या. आता कंपनीने आपल्या तीन इतर स्मार्टफोन Moto G7, Moto G7 Power आणि Motorola One च्या किंमती पण कमी केल्या आहेत.

Motorola One
सर्वात आधी मोटोरोला वन पाहता हा स्मार्टफोन भारतात 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. कपंनीने आता Motorola One च्या किंमतीती थेट 1,000 रुपयांची कपात केली आहे. या प्राइस कट नंतर मोटोरोलाचा एंडरॉयड वन वर्जन आधारित स्मार्टफोन 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Moto G7
मोटो जी7 सीरीज मध्ये लॉन्च झालेला हा स्मार्टफोन पण कंपनी द्वारा 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. आपल्या फॅन्ससाठी मोटोरोला ने Moto G7 ची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर Moto G7 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Moto G7 Power
मोटो जी7 सीरीज मध्ये लॉन्च झालेल्या या मोठया बॅटरी वाल्या स्मार्टफोन कंपनीने 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. या स्मार्टफोनची किंमत कंपनी याआधी 1,000 रुपयांनी कमी केली आहे ज्यानंतर मोटो जी7 पावर 15,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता. पुन्हा एकदा Moto G7 Power ची किंमत 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे आणि आता हा स्मार्टफोन 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Motorola च्या उपरोक्त सर्व स्मार्टफोन वरील प्राइस कटची माहिती द मोबाईल इंडियन ने आपल्या रिपोर्ट मध्ये दिली आहे. वेबसाइट नुसार मोटोरोलाचे हे तुम्ही फोन आफलाईन रिटेल स्टोर्स वर नवीन किंमतीत सेल साठी उपलब्ध होतील. काल झालेल्या प्राइस कट बद्दल बोलायचे तर..

Motorola One Power
कंपनीने हा 15,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता ज्यात 1,000 रुपयांची कपात केली गेली होतीआणि हा डिवाईस 14,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता. तसेच आता पुन्हा कंपनीने या फोनची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर Motorola One Power 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन ऑनलाइन प्लॅटफॉर्म शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध आहे.

मोटोरोला ने आपला जी सीरीजचा हा स्मार्टफोन मीड रेंज मध्ये उतरवला होता ज्याची लॉन्च प्राइस 22,499 रुपये होती. मोटो चा हा फोन ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध आहे. द मोबाईल इंडियन ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर Moto G6 Plus च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. रिपोर्ट नुसार Moto G6 Plus रिटेल स्टोर्स वर 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here