Moto Mod - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 31 May 2019 10:44:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 या खास फीचर्स सह आला Moto Z4, हि आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/moto-z4-with-6-4-inch-oled-display-snapdragon-675-goes-official/ https://www.91mobiles.com/marathi/moto-z4-with-6-4-inch-oled-display-snapdragon-675-goes-official/#respond Fri, 31 May 2019 10:44:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4471 अनलॉक वर्जन Amazon.com, आणि B & H फोटो च्या माध्यमातून $ 499 (जवळपास 34,801 रुपये) मध्ये उपलब्ध होईल ज्याची विक्री 6 जून पासून सुरु होईल.

The post या खास फीचर्स सह आला Moto Z4, हि आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती कि ते आपल्या मोटो झेड सीरीजचे आगामी स्मार्टफोन्स Moto Z4 आणि Moto Z4 Force वर काम करत आहे. तसेच ऑफिशियल लॉन्चच्या आधी हे फोन या आठवड्यात खूप चर्चेत होते कारण एका रेडिट यूजर ने Moto Z4 चा हॅन्ड्स ऑन वीडियो शेअर करत दावा केला आहे कि त्याने हा फोन अमेझॉन वेबसाइट वरून विकत घेतला आहे. तर आता कंपनीने अमेरिकेत फोन को ऑफिशियली लॉन्च केला आहे.

Moto Z4 ची किंमत
मोटोरोलाने सध्या व्हर्जन सह भागेदारी करून यूएस मध्ये Moto Z4 लॉन्च केला आहे, पण हा लवकरच इतर कॅरिअर आणि जगातील इतर ठिकाणी उपलब्ध होईल. फोनचा फ्लॅश ग्रे वेरिएंट 13 जूनला विक्रीसाठी येईल. Verizon युजर्स Moto Z4 कॉन्ट्रॅक्ट वर $ 240 (जवळपास 16,738 रुपये) मध्ये विकत घेऊ शकतात. अनलॉक वर्जन Amazon.com, आणि B & H फोटो च्या माध्यमातून $ 499 (जवळपास 34,801 रुपये) मध्ये उपलब्ध होईल ज्याची विक्री 6 जून पासून सुरु होईल.

हे देखील वाचा: PUBG गेम खेळल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Moto Z4 चे स्पेसिफिकेशन्स
मोटोरोलाच्या Moto Z4 मध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी फुल विजन डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रेजोल्यूशन 2340×1080 पिक्सल आहे. सोबतच स्मार्टफोनची स्क्रीन 2.5D गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे.

हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 675 प्रोसेसरने पावर्ड आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच माइक्रोएसडी कार्डने फोनची स्टोरेज 2टीबी पर्यंत वाढवता येते. तसेच Moto Z4 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Xiaomi फॅन्ससाठी खुशखबर : Redmi Note 7S ची आता बघावी लागणार नाही वाट, ओपन सेल झाला सुरु

फोटोग्राफी साठी 48-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. लीक्स मध्ये असे पण समोर आले आहे की पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,600 mAh ची बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post या खास फीचर्स सह आला Moto Z4, हि आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-z4-with-6-4-inch-oled-display-snapdragon-675-goes-official/feed/ 0