PUBG गेम खेळल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ऑनलाइन मोबाईल गेम PUBG च्या लोकप्रियता वाढत आहे सोबतच तरुणांवर याचे दुष्परिणाम पण दिसून येत आहेत. ते पाहून अनेक देशांनी या मोबाईल गेम वर बंदी घातली आहे. PLAYER UNKNOWN’S BATTLEGROUNDS (PUBG) ने सध्या प्रत्येक वयोगटातील लोकांना आपले फॅन बनवले आहे. पबजी इतका जास्त प्रसिद्ध झाला आहे कि अनेकांसाठी हि फक्त आवड राहिली नसून याचे व्यसन लागले आहे. याच व्यसनामुळे अनेकांना जीव गमवावा लागले आहेत. मीडिया रिपोर्ट्स नुसार PUBG खेळताना एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची बातमी समोर आली आहे.

रिपोर्ट्स नुसार मध्यप्रदेश मधील नीमच मध्ये राहणार Furqan Qureshi (वर 16 वर्ष) चा PUBG खेळताना कार्डियक अरेस्ट ने मृत्य झाला आहे. हा तरुण 12वी चा विध्यार्थी होता. युवकाच्या वडिलांनी सांगितले कि तो मृत्यू आधी जवळपास सहा तास PUBG गेम खेळत होता आणि गेम खेळताना तो ब्लास्ट कर ब्लास्ट कर असे ओरडत होता. त्यानंतर तो बेशुद्ध झाला.

हे देखील वाचा: PUBG न खेळून दिल्याने 16 वर्षीय मुलाने लावून घेतला गळफास

मृत मुलाच्या वडिलांच्या म्हणणे आहे कि बेशुद्ध झाल्यानंतर Furkhan ला हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कार्डियाक अरेस्ट मुळे मृत्यू झालेचे सांगण्यात आले आहे. डॉक्टर म्हणतात कि जेव्हा युवकाला हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले तेव्हा त्याच्या पल्स बंद होत्या. आम्ही इलेक्ट्रिक शॉक च्या माध्यमातून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही अपयशी ठरलो.

हे देखील वाचा: आता या देशात बॅन झाला Pubg, भारतात पण होईल का बंदी लागू

कुटुंबीय म्हणतात कि Furkhan एक चांगला जलतरणपट्टू होता आणि त्याला हृद्यासंबंधित कोणताही आजार नव्हता. डॉक्टर्स नुसार दीर्घकाळ गेम खेळल्याने त्याच्या हृदयाची स्पंदनांचा वेग वाढला आणि हार्ट अटॅक आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here