Moto One Power - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 17 Jul 2023 13:31:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive: 6.3-इंचाचा डिस्प्ले आणि 4जीबी रॅम सह येईल Motorola One Action, बघा सर्व स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-action-will-feature-a-6-3-inch-fhd-display-an-exynos-9609-soc/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-action-will-feature-a-6-3-inch-fhd-display-an-exynos-9609-soc/#respond Thu, 13 Jun 2019 13:15:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4570 फोन मध्ये सॅमसंग एक्सनोस 9609 प्रोसेसर आणि मालि जी72 जीपीयू असेल.

The post Exclusive: 6.3-इंचाचा डिस्प्ले आणि 4जीबी रॅम सह येईल Motorola One Action, बघा सर्व स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो अधिकृत कंपनी मोटोरोला भारतात आपला नवीन स्मार्टफोन म्हणजे Moto One Vision लॉन्च करण्यासाठी तयार आहे. हा हँडसेट 20 जूनला लॉन्च होईल जो फ्लिपकार्ट वरून विकला जाईल. अनेक दिवसांपासुन कंपनीचा Motorola One Action लीक व बातम्यांमधून समोर आला आहे. जरी याच्या लॉन्चची अधिकृत माहिती मिळाली नसली तरी 91मोबाईल्सला या फोनच्या लॉन्चच्या आधी स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइनची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे.

Motorola One Action ची स्पेसिफिकेशन शीट आम्हाला आमच्या टिप्सटर कडून मिळाली आहे. फोन One Vision किफायतीशीर किंमतीत सादर केला जाईल. One Action चा रियर पॅनल प्लास्टिक आणि तीन शूटर सह येईल. तसेच One Action पंच-होल डिस्प्ले आणि रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर सह येईल.

स्पेसिफिकेशन्स पाहता Motorola One Action मध्ये 6.3-इंचाचा एलसीडी डिस्प्ले असेल, ज्याचे स्क्रीन रेजोल्यूशन 1,080 x 2,520 पिक्सल असेल. तसेच फोन मध्ये सॅमसंग एक्सनोस 9609 प्रोसेसर आणि मालि जी72 जीपीयू असेल.

पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी असेल. One Action मध्ये दोन कॅमेरा असतील. यात 12.6-मेगापिक्सल सेंसरचा मेन कॅमेरा असेल. पण दुसऱ्या कॅमेरा सेंसरची माहिती मिळाली नाही. सोबतच सेल्फी साठी फोन मध्ये 12.6-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Motorola One Action मध्ये 3जीबी आणि 4जीबी रॅम वेरिएंट सह 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी स्टोरेज (यूएफएस 2.1) मॉडेल असतील. स्मार्टफोन मध्ये कनेक्टिविटी साठी एनएफसी सपोर्ट असेल. सोबतच फोन ब्लू आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये येईल.

सध्या मोटोरोला कडून One Action च्या लॉन्च डेटची कोणतीही माहिती समोर आली नाही. पण आम्हाला माहिती मिळतच तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करू.

The post Exclusive: 6.3-इंचाचा डिस्प्ले आणि 4जीबी रॅम सह येईल Motorola One Action, बघा सर्व स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-action-will-feature-a-6-3-inch-fhd-display-an-exynos-9609-soc/feed/ 0
2 ऑगस्टला आहे मोटोरोला चा मोठा ईवेंट, लॉन्च होऊ शकतात मोटो वन, मोटो वन पावर आणि मोटो झेड3 https://www.91mobiles.com/marathi/motorola-event-on-2-august-in-chicago-might-launch-moto-one-moto-one-power-moto-z3-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-event-on-2-august-in-chicago-might-launch-moto-one-moto-one-power-moto-z3-in-marathi/#respond Fri, 29 Jun 2018 07:13:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1102 विशेष म्हणजे मोटो झेड3 कंपनी च्या फ्लॅगशिप सेग्मेंट वाला स्मार्टफोन असेल तर मोटो वन सीरीज अंतर्गत लॉन्च होणारे स्मार्टफोंस स्टॉक एंडरॉयड आधारित असतील.

The post 2 ऑगस्टला आहे मोटोरोला चा मोठा ईवेंट, लॉन्च होऊ शकतात मोटो वन, मोटो वन पावर आणि मोटो झेड3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला बद्दल काही दिवसांपूर्वी अनेक लीक्स आले आहेत. या लीक्स मध्ये एकीकडे मोटो झेड3 स्मार्टफोन च्या बातम्या आल्या आहेत तर दुसरीकडे अशी माहिती मिळाली आहे की मोटोरोला पण आता नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन सेग्मेंट मध्ये एंट्री करणार आहे आणि याची सुरवात मोटो वन पावर स्मार्टफोन पासून होईल. आता असे वाटत आहे की मोटोरोला लवकरच या लीक्स आणि बातम्यांना पूर्ण विराम देणार आहे. मोटोरोला ने घोषणा केली आहे की कंपनी येत्या 2 ऑगस्टला शिकागो मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट मधून मोटोरोला चे नवीन स्मार्टफोंस जगासमोर येतील.

मोटोरोला ने 2 ऑगस्टला होणार्‍या ईवेंट ची माहिती दिली आहे. मोटोरोलाचा हा ईवेंट शिकागो मधील मोटोरोला हेडक्वॉर्टर मध्ये आयोजित केला जाईल जो दुपारी 2 वाजता सुरू होईल. पण मोटोरोला ने हे सांगितले नाही की हा ईवेंट का केला जात आहे आणि ईवेंट मधून कोणते स्मार्टफोन समोर येतील. पण बोलले जात आहे की या प्रोग्राम मध्ये कंपनी एक पेक्षा जास्त अनाउंसमेंट करणार आहे आणि या ईवेंट मधून मोटो वन पावर, मोटो वन आणि मोटो झेड3 टेक बाजारात येतील.

विशेष म्हणजे मोटो झेड3 कंपनी च्या फ्लॅगशिप सेग्मेंट वाला स्मार्टफोन असेल तर मोटो वन सीरीज अंतर्गत लॉन्च होणारे स्मार्टफोंस स्टॉक एंडरॉयड आधारित असतील. तसेच मोटो वन पावर स्मार्टफोन कंपनी चा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन म्हणून समोर येईल. त्याचबरोबर ताज्या लीक मध्ये मोटो वन बद्दल माहिती मिळाली आहे की हा फोन पण नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाऊ शकतो.

लीक नुसार मोटो वन पावर मध्ये 6.2-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असेल तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालेल. लीक नुसार या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला जाईल त्याचबरोबर फोन ची इंटरनल स्टोरेज 64जीबी असेल आणि यात 3,780एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. तसेच मोटो झेड3 बद्दल बोलले जात आहे की मोटोराला हा फोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आणेल जो पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येईल.

The post 2 ऑगस्टला आहे मोटोरोला चा मोठा ईवेंट, लॉन्च होऊ शकतात मोटो वन, मोटो वन पावर आणि मोटो झेड3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-event-on-2-august-in-chicago-might-launch-moto-one-moto-one-power-moto-z3-in-marathi/feed/ 0
हा आहे मोटोरोला चा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन, फोटो आले समोर, 6.2-इंचाच्या डिस्प्ले असेल 4जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-one-power-photo-leak-notch-bezel-less-display-and-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-one-power-photo-leak-notch-bezel-less-display-and-specifications-in-marathi/#respond Thu, 21 Jun 2018 08:55:16 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1001 लीक नुसार मोटो वन पावर मध्ये 6.2-इंचाचा मोठा डिसप्ले देण्यात आला आहे.

The post हा आहे मोटोरोला चा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन, फोटो आले समोर, 6.2-इंचाच्या डिस्प्ले असेल 4जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो अधिकृत मोटोरोला बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी आपल्या पहिल्या नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन वर काम करत आहे आणि लवकरच हा टेक जगासमोर सादर करेल. चर्चा आहे की हा स्मार्टफोन मोटो वन पावर नावाने टेक जगात येईल. मोटोरोला ने आता पर्यंत हा फोन समोर आणला नाही पण तमाम लीक्स मधून आता या फोन चे रियल फोटो पण समोर आले आहेत. मोटो वन पावर चे फोटो लीक झाल्याने या फोन च्या लुक व डिजाईन सोबत महत्वपूर्ण स्पेसिफिकेशन्स ची पण माहिती मिळाली आहे.

मोटो वन पावर चे हे फोटो एका टेक वेबसाइट ने शेयर केले आहेत. या फोटो मध्ये फोन चे फ्रंट, बॅक आणि दोन्ही साईड पॅनल दाखवण्यात आले आहेत. या फोन ची सर्वात मोठी खासियत फोन मध्ये देण्यात आलेली ‘नॉच’ आहे. कारण मोटो वन पावर च्या माध्यामातून मोटोरोला ब्रांड नॉच डिस्प्ले वाल्या सेग्मेंट मध्ये एंट्री करत आहे. समोर आलेल्या फोटो मध्ये मोठी नॉच दाखवण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा व अन्य सेंसर आहेत.

मोटो वन पावर च्या बॅक पॅनल वर आयफोन 10 सारखाच वर्टिकल डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात जो एलईडी फ्लॅश आहे. रियर कॅमेरा सेटअप फोन बॉडी पासून थोडा वर उठलेला आहे. रियर पॅनल वर मोटोरोला चा लोगो देण्यात आला आहे जो बॉडी च्या आत आहे. हा लोगो बघून वाटते की हा लोगो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेड असेल. त्याचप्रमाणे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन फोन च्या उजव्या पॅनल वर आहेत आणि खालच्या पॅनल वर स्पीकर व यूएसबी टाईप सी देण्यात आली आहे.

लीक नुसार मोटो वन पावर मध्ये 6.2-इंचाचा मोठा डिसप्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असेल तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालेल. लीक नुसार या फोन मध्ये 4जीबी ची रॅम मेमरी देण्यात येईल तसेच फोन ची इंटरनल स्टोरेज 64जीबी ची असेल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,780एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

मोटोरोला आपला हा स्मार्टफोन केव्हा लॉन्च करेल या बद्दल कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही पण बोलले जात आहे की अंर्तराष्ट्रीय बाजारा सह भारतात पण हा फोन लवकरच येईल.

The post हा आहे मोटोरोला चा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन, फोटो आले समोर, 6.2-इंचाच्या डिस्प्ले असेल 4जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-one-power-photo-leak-notch-bezel-less-display-and-specifications-in-marathi/feed/ 0