हा आहे मोटोरोला चा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन, फोटो आले समोर, 6.2-इंचाच्या डिस्प्ले असेल 4जीबी रॅम

लेनोवो अधिकृत मोटोरोला बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी आपल्या पहिल्या नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन वर काम करत आहे आणि लवकरच हा टेक जगासमोर सादर करेल. चर्चा आहे की हा स्मार्टफोन मोटो वन पावर नावाने टेक जगात येईल. मोटोरोला ने आता पर्यंत हा फोन समोर आणला नाही पण तमाम लीक्स मधून आता या फोन चे रियल फोटो पण समोर आले आहेत. मोटो वन पावर चे फोटो लीक झाल्याने या फोन च्या लुक व डिजाईन सोबत महत्वपूर्ण स्पेसिफिकेशन्स ची पण माहिती मिळाली आहे.

मोटो वन पावर चे हे फोटो एका टेक वेबसाइट ने शेयर केले आहेत. या फोटो मध्ये फोन चे फ्रंट, बॅक आणि दोन्ही साईड पॅनल दाखवण्यात आले आहेत. या फोन ची सर्वात मोठी खासियत फोन मध्ये देण्यात आलेली ‘नॉच’ आहे. कारण मोटो वन पावर च्या माध्यामातून मोटोरोला ब्रांड नॉच डिस्प्ले वाल्या सेग्मेंट मध्ये एंट्री करत आहे. समोर आलेल्या फोटो मध्ये मोठी नॉच दाखवण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा व अन्य सेंसर आहेत.

मोटो वन पावर च्या बॅक पॅनल वर आयफोन 10 सारखाच वर्टिकल डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात जो एलईडी फ्लॅश आहे. रियर कॅमेरा सेटअप फोन बॉडी पासून थोडा वर उठलेला आहे. रियर पॅनल वर मोटोरोला चा लोगो देण्यात आला आहे जो बॉडी च्या आत आहे. हा लोगो बघून वाटते की हा लोगो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेड असेल. त्याचप्रमाणे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन फोन च्या उजव्या पॅनल वर आहेत आणि खालच्या पॅनल वर स्पीकर व यूएसबी टाईप सी देण्यात आली आहे.

लीक नुसार मोटो वन पावर मध्ये 6.2-इंचाचा मोठा डिसप्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असेल तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालेल. लीक नुसार या फोन मध्ये 4जीबी ची रॅम मेमरी देण्यात येईल तसेच फोन ची इंटरनल स्टोरेज 64जीबी ची असेल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,780एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

मोटोरोला आपला हा स्मार्टफोन केव्हा लॉन्च करेल या बद्दल कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही पण बोलले जात आहे की अंर्तराष्ट्रीय बाजारा सह भारतात पण हा फोन लवकरच येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here