Moto Z3 Play - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 26 Jun 2018 07:25:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एक्सक्लूसिव : भारतात येत आहे मोटोरोलाचा ताकदवान स्मार्टफोन मोटो झेड3 प्ले, जुलै च्या पहिल्या आठवड्यात होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/exclusive-moto-z3-play-launch-in-india-in-july-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-moto-z3-play-launch-in-india-in-july-features-specifications-in-marathi/#respond Tue, 26 Jun 2018 07:25:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1050 91मोबाईल्स ला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार मोटोरोला जुलै च्या पहिल्याच आठवड्यात मोटो जेड3 प्ले स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करेल.

The post एक्सक्लूसिव : भारतात येत आहे मोटोरोलाचा ताकदवान स्मार्टफोन मोटो झेड3 प्ले, जुलै च्या पहिल्या आठवड्यात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो अधिकृत टेक कंपनी मोटोरोला ने काही दिवसांपूर्वीच आपल्या मोटो सीरीज चा नवीन डिवाईस मोटो झेड3 प्ले अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर केला आहे. मोटोरोला ने हा फोन ब्राजील मध्ये आॅफिशियल केला आहे तिथे हा अनेक आर्कषक मोटो मोड्स सोबत उपलब्ध आहे. मोटोरोला च्या या दमदार स्मार्टफोन बद्दल आता 91मोबाईल्स ला महत्त्वाची माहिती मिळाली आहे की कंपनी लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणणार आहे आणि हा स्मार्टफोन जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच इंडियन मार्केट मध्ये येऊ शकतो.

91मोबाईल्स ला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार मोटोरोला जुलै च्या पहिल्याच आठवड्यात मोटो जेड3 प्ले स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करेल. रिटेल मधील सुत्रांनी यावर शिक्कामोर्तब करत सांगितले की मोटोरोला कंपनी ने मोटो झेड3 प्ले भारतीय बाजारात आणण्याची तयारी सुरू केली आहे आणि पुढच्या महिन्याच्या सुरवातीला हा फोन आॅफिशियली लॉन्च होईल.

Pic Credit : theverge

मोटो झेड3 प्ले चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 509 जीपीयू पण देण्यात आला आहे.

Pic Credit : theverge

मोटोरोला ने या फोन मध्ये 4जीबी रॅम मेमरी दिली आहे. हा फोन 32जीबी तसेच 64जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे तसेच दोन्ही वेरिऐंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 2टीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा आहे. फोन च्या बॅक पॅनल वर डुअल टोन एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

मोटो झेड3 प्ले 4जी फोन आहे ज्यात एनएफसी व यूएसबी टाईप-सी सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. फिंगरप्रिंट सेंसर मोटो झेड3 प्ले च्या साईड पॅनल वर देण्यात आला आहे. हा फोन वॉटर प्रूफ आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी ने याला मोटो मोड्स सह सादर केला आहे. भारतात या फोनची किंमत काय असेल आणि हा फोन याच स्पेसिफिकेशन्स सह देशात लॉन्च होईल का? यासाठी कंपनी द्वारा आॅफिशियल लॉन्च ची वाट बघितली जात आहे.

The post एक्सक्लूसिव : भारतात येत आहे मोटोरोलाचा ताकदवान स्मार्टफोन मोटो झेड3 प्ले, जुलै च्या पहिल्या आठवड्यात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-moto-z3-play-launch-in-india-in-july-features-specifications-in-marathi/feed/ 0
6-इंचाचा डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि शानदार मोटो मोड्स सह लॉन्च झाला मोटो झेड3 प्ले https://www.91mobiles.com/marathi/moto-z3-play-launched-moto-mods-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/moto-z3-play-launched-moto-mods-features-specifications-in-marathi/#respond Thu, 07 Jun 2018 10:50:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=815 अंर्तराष्ट्रीय बाजारात या फोन ची किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 34,000 रुपये ठेवण्यात आली आहे.

The post 6-इंचाचा डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि शानदार मोटो मोड्स सह लॉन्च झाला मोटो झेड3 प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटो झेड3 प्ले मागच्या आठवड्यात चीनी बेंच​मार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला होता. मोटोरोला ने या लिस्टिंग च्या एक आठवड्यातच आपला फोन आॅफिशियली अनाउंस केला आहे. मोटो झेड प्ले सध्या अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला गेला आहे जो आधी यूएस आणि ब्राजील मध्ये सेल साठी उपलब्ध होईल तसेच आगामी काळात वेगवेगळ्या टेक बाजारात येईल. दमदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या हा स्मार्टफोन मोटो मोड्स सह येतो.

मोटो झेड3 प्ले चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 509 जीपीयू पण देण्यात आला आहे.

Pic Credit : theverge

मोटोरोला ने या फोन मध्ये 4जीबी रॅम मेमरी दिली आहे. हा फोन 32जीबी तसेच 64जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे तसेच दोन्ही वेरिऐंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 2टीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा आहे. फोन च्या बॅक पॅनल वर डुअल टोन एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

मोटो झेड3 प्ले 4जी फोन आहे ज्यात एनएफसी व यूएसबी टाईप-सी सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. फिंगरप्रिंट सेंसर मोटो झेड3 प्ले च्या साईड पॅनल वर देण्यात आला आहे. हा फोन वॉटर प्रूफ आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी ने याला मोटो मोड्स सह सादर केला आहे. अंर्तराष्ट्रीय बाजारात या फोन ची किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 34,000 रुपये ठेवण्यात आली आहे.

The post 6-इंचाचा डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि शानदार मोटो मोड्स सह लॉन्च झाला मोटो झेड3 प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-z3-play-launched-moto-mods-features-specifications-in-marathi/feed/ 0