6-इंचाचा डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि शानदार मोटो मोड्स सह लॉन्च झाला मोटो झेड3 प्ले

Pic Credit : theverge

मोटो झेड3 प्ले मागच्या आठवड्यात चीनी बेंच​मार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला होता. मोटोरोला ने या लिस्टिंग च्या एक आठवड्यातच आपला फोन आॅफिशियली अनाउंस केला आहे. मोटो झेड प्ले सध्या अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला गेला आहे जो आधी यूएस आणि ब्राजील मध्ये सेल साठी उपलब्ध होईल तसेच आगामी काळात वेगवेगळ्या टेक बाजारात येईल. दमदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या हा स्मार्टफोन मोटो मोड्स सह येतो.

मोटो झेड3 प्ले चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 509 जीपीयू पण देण्यात आला आहे.

Pic Credit : theverge

मोटोरोला ने या फोन मध्ये 4जीबी रॅम मेमरी दिली आहे. हा फोन 32जीबी तसेच 64जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे तसेच दोन्ही वेरिऐंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 2टीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा आहे. फोन च्या बॅक पॅनल वर डुअल टोन एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

मोटो झेड3 प्ले 4जी फोन आहे ज्यात एनएफसी व यूएसबी टाईप-सी सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. फिंगरप्रिंट सेंसर मोटो झेड3 प्ले च्या साईड पॅनल वर देण्यात आला आहे. हा फोन वॉटर प्रूफ आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी ने याला मोटो मोड्स सह सादर केला आहे. अंर्तराष्ट्रीय बाजारात या फोन ची किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 34,000 रुपये ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here