Motomotorola - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 29 May 2019 09:04:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एक्सक्लूसिव: जून मध्ये लॉन्च होईल पंच-होल डिस्प्ले आणि 48एमपी कॅमेरा असलेला Motorola One Vision, जाणून घ्या याची किंमत https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-vision-india-launch-likely-in-june/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-vision-india-launch-likely-in-june/#respond Wed, 29 May 2019 09:04:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4437 ब्राजील मध्ये हा डिवाइस BRL 1,999 (जवळपास 34,400 रुपये) मध्ये विकला जात आहे.

The post एक्सक्लूसिव: जून मध्ये लॉन्च होईल पंच-होल डिस्प्ले आणि 48एमपी कॅमेरा असलेला Motorola One Vision, जाणून घ्या याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lenovo चे मालकी हक्क असणारी कंपनी Motorola आपला लेटेस्ट स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनी Motorola One Vision भारतीय मार्केट मध्ये पुढल्या म्हणियात म्हणजे जून मध्ये लॉन्च करू शकते. 91mobiles ला याची माहिती मिळाली आहे कि कंपनी जून मध्ये होणाऱ्या इवेंट साठी मीडिया इनवाइट लवकरच पाठवेल.

या इवेंट मध्ये कंपनी आपला पंच-होल डिस्प्ले असलेला Motorola One Vision भारतात लॉन्च करेल. हँडसेट अलीकडेच भारताच्या बीआईएस वेबसाइट वर दिसला होता. हँडसेट मध्ये ब्रँडचा नवा नाइट विजन मोड पण देण्यात आला आहे जो लो लाइट फोटोग्राफी मध्ये मदत करतो.

Motorola One Vision ची भारतीय किंमत
Motorola One Vision भारतात 25,000 रुपयांच्या आसपास सादर केला जाऊ शकतो. याआधी हँडसेट सौदी अरेबिया आणि थायलंड मध्ये लॉन्च झाला आहे, तिथे याची किंमत जवळपास 23,300 रुपये आहे. तर ब्राजील मध्ये हा डिवाइस BRL 1,999 (जवळपास 34,400 रुपये) मध्ये विकला जात आहे.

हे देखील वाचा: पाकिस्तान पेक्षा पण कमी मोबाईल इंटरनेट स्पीड मिळत आहे भारतात, देशाचा ग्लोबल रँक घसरला

Motorola One Vision चे स्पेसिफिकेशन्स
फोन आधीच अनेक देशांत आला आहे. Motorola One Vision चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.3-इंचाचा डिस्प्ले 21:9 आस्पेक्ट रेश्यो, फुल-एचडी+ रिजोल्यूशन (1,080 x 2,520 पिक्सल) आहे. तसेच फोन मध्ये 2.2गीगार्हट्ज ऑक्टा-कोर Exynos 9609 प्रोसेसर आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. आता फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 5-मेगापिक्सलची डेप्थ सेंसिंग लेंस डुअल फ्लॅश सह देण्यात आली आहे. तसेच फ्रंटला 25-मेगापिक्सलचा कॅमेरा वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: हटके कॅमेरा डिजाइन वाले हे फोन यावर्षी आहेत चर्चेत

कनेक्टिविटी ऑप्शन साठी फोन मध्ये 4जी एलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, ए-जीपीएस सह ग्लोनास, यूएसबी टाइप-सी, 3.5एमएम ऑडियो जॅक, एनएफसी आणि डुअल सिम सपोर्ट (हाईब्रिड) आहे. सोबतच फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी आणि एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आला आहे.

The post एक्सक्लूसिव: जून मध्ये लॉन्च होईल पंच-होल डिस्प्ले आणि 48एमपी कॅमेरा असलेला Motorola One Vision, जाणून घ्या याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-vision-india-launch-likely-in-june/feed/ 0