गेल्या काही दिवसांत भारत जागतिक पातळीवर मोबाईलचा मोठा बाजार म्हणून उदयास आला आहे. फक्त स्मार्टफोनच नाही तर इंटरनेट डेटा आणि 4जी सर्विसचा वापर पण भारतात जास्त वाढला आहे. आज भारत जगातील त्या मोठ्या देशांच्या टॉप लिस्ट मध्ये आहे जिथे इंटरनेट डेटाचा वापर खूप जास्त होतो. रिलायंस जियोच्या एंट्री नंतरच भारतीय टेलीकॉम बाजारात इंटरनेट डेटा यूजर्स वाढले आहेत. पण हैराणीची बाब भारत एकीकडे इंटरनेट वापरणारा सर्वात मोठा बाजार बनत आहे तर दुसरीकडे मोबाईल स्पीडच्या बाबतीत भारताची रँक घसरून 121व्या क्रमांकावर आला आहे.
हे खरे कि भारतात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची संख्या वेगाने वाढली आहे आणि इंटरनेट सेवा तसेच 4जी सर्विस आधीपेक्षा खूप जास्त स्वस्त झाली आहे. पण जगात इतर देशांच्या तुलनेत भारताची रँकिंग कमी झाली आहे. अमेरिकी डेटा स्पीड टेस्टर फर्म Ookla ने आपल्या नव्या रिपोर्ट मध्ये भारतात उपलब्ध इंटरनेट स्पीड संबंधित हि माहिती दिली आहे. ओकला ने सांगितले कि गेल्यावर्षी भारताची ग्लोबल रँकिग 109 होती ती यावर्षी घसरून 121 झाली आहे. ओकला चा हा रिपोर्ट वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील आकड्यांवर आधारित आहे.
सरासरी स्पीड मध्ये वाढ
ग्लोबल रँकिंग कमी झाल्याने तुम्हाला थोडे वाईट वाटले असेल पण प्रकरण इतके वाईट पण नाही. ओकला ने आपल्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट सांगितले आहे कि जरी ग्लोबल रँकिंग मध्ये भारताची रँकिंग कमी झाली असली तरी गेल्यावर्षी पेक्षा देशात सरासरी मोबाईल डेटा स्पीड मध्ये सुधार आला आहे. गेल्यावर्षी जानेवारी-मार्च तिमाही मध्ये देशात सरासरी मोबाईल डेटा स्पीड 9.01 होता तो यावर्षी वाढून 10.71 झाला आहे.
तुम्हाला सांगू इच्छितो कि भारतात मोबाईल डेटा स्पीड वाढत आहे. ग्लोबल रँकिंग मध्ये मागे जाण्याचे कारण आपल्या देशात इंटरनेटची वाईट अवस्था आहे असे नाही तर याचे खरे कारण इतर देशांमध्ये डेटा स्पीड भारतापेक्षा जास्त वेगाने सुधारला आहे. गेल्यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत भारतात सर्व टेलीकॉम कंपन्यांचा सरासरी 4जी एलटीई डाउनलोड स्पीड 9.84Mbps होता जो यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत 10.58Mbps झाला आहे.
ब्रॉडबॅंड क्षेत्रात पण झाला सुधार
दुसरीकडे ब्रॉडबॅंड स्पीड बद्दल बोलायचे झाले तर भारतात गेल्यावर्षी सरासरी डाउनलोड स्पीड 20.72Mbps होता जो यावर्षी वाढून 29.25Mbps झाला आहे. इथे पण सरासरी स्पीड वाढूनही भारत ग्लोबल इंडेक्स मध्ये 67व्या स्थानावरून 68व्या स्थानावर आला आहे. विशेष म्हणजे साल 2019 च्या पहिल्या तिमाहीत नॉर्वे ने सर्वात जास्त 65.41Mbps चा सरासरी डाउनलोड स्पीड देऊन पहिले स्थान मिळवले आहे. तसेच ब्रॉडबॅंड सेग्मेंट मध्ये 197.50Mbps सरासरी डाउनलोड स्पीड देऊन सिंगापुर पहिल्या क्रमांकावर आहे.
शेजारी देश पाकिस्तान सरासरी मोबाईल डेटा स्पीड मध्ये भारतापेक्षा पुढे गेला आहे. जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान भारतात 10.71Mbps चा सरासरी मोबाईल स्पीड होता तर याच काळात पाकिस्तान मध्ये 13.39Mbps चा सरासरी मोबाईल स्पीड होता. भारताची भौगोलिक स्थिति आणि लोकसंख्या इंटरनेट स्पीड साठी मोठे आव्हान आहे. इथे एकाच वेळी एकाच नेटवर्क वर अनेक लोक इंटरनेटचा वापर करत आहेत आणि याच कारणामुळे इंटरनेटचा स्पीड कमी होतो.
















