MS Dhoni - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 30 May 2019 09:11:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Cricket World Cup 2019: अशाप्रकारे बघा मोबाईल वर वर्ल्ड कप मॅचेस फ्री https://www.91mobiles.com/marathi/how-to-watch-cricket-world-cup-2019-matches-live-on-smartphone-free/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-watch-cricket-world-cup-2019-matches-live-on-smartphone-free/#respond Thu, 30 May 2019 09:11:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4452 आम्ही तुमच्यासाठी काही असे ऑप्शन्स देत आहोत ज्याने तुम्ही कुठेही बसून तुमच्या फोन मधूनच क्रिकेट मॅचचा आस्वाद घेऊ शकता.

The post Cricket World Cup 2019: अशाप्रकारे बघा मोबाईल वर वर्ल्ड कप मॅचेस फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
क्रिकेट विश्व कप 2019 ची सुरवात आज म्हणजे 30 मे ला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका मध्ये होणाऱ्या मॅच पासून होईल. जगातील टॉप 10 वनडे टीम्स यावर्षी ट्रॉफी मिळवण्यासाठी एकमेकांशी लढतील. जर तुम्ही क्रिकेटचे सर्वात मोठे फॅन असाल आणि वर्ल्ड कप 2019 ची एखादी मॅच पण मिस करू इच्छित नसाल तर आम्ही तुमच्यासाठी काही असे ऑप्शन्स देत आहोत ज्याने तुम्ही कुठेही बसून तुमच्या फोन मधूनच क्रिकेट मॅचचा आस्वाद घेऊ शकता.

HotStar
स्टार स्पोर्ट चॅनेल व्यतिरिक्त हॉट स्टार वर पण लाइव मॅचेस चे प्रसारण होईल . तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा कंप्यूटर वर या मॅचेस लाइव बघू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये हॉटस्टार डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला 365 रुपयांमध्ये एका वर्षाचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. या सब्सक्रिप्शन मध्ये तुम्हाला वर्ल्ड कप मॅच व्यतिरिक्त इतर अनेक प्रकारचा कटेंट बघायला मिळेल.

हे देखील वाचा: Exclusive : 32-एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च होईल Samsung Galaxy M40, बॅटरी असेल 4,000एमएएच पेक्षा पण जास्त

Jio Tv
जर तुम्ही जियो सब्सक्राइबर्स असाल तर जियो टीवी वर पण तुम्ही मॅच बघू शकता. इथे तुम्हाला फ्री मध्ये मॅच बघायला मिळेल. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पॅक घेण्याची गरज नाही. विशेष म्हणजे जियो टीवी ऍप तुम्हाला हॉटस्टॉर ऍप वर रिडायरेक्ट करेल.

याव्यतिरिक्त ब्रिटिश क्रिकेट प्रशंसक वर्ल्ड कप 2019 च्या मॅचेस स्काई स्पोर्ट्स वर मोबाईल आणि लॅपटॉप वर बघू शकतील. या सेवे साठी सदस्यता प्रति दिन £ 8.99, प्रति सप्ताह £ 14.99, आणि प्रति माह £ 25 आहे. संयुक्त राज्य अमेरिकेत क्रिकेट प्रशंसक स्टेटस विलो टीवीच्या माध्यमातून आईसीसी विश्व कप मॅच बघू शकतात. विशेष म्हणजे हॉटस्टार आता भारत आणि ब्रिटेन मध्ये उपलब्ध आहे.

हे देखील वाचा: 4 जून पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल OnePlus 7, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Cricket World Cup 2019 मध्ये भारत, पाकिस्तान, साउथ अफ्रीका, आइसलँड , ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलंड सारख्या दिग्गज टीम्स सहभाग घेत आहेत. यावेळी Cricket World Cup 2019 इंग्लंड मध्ये खेळाला जात आहे. आज Cricket World Cup 2019 ची सुरवात इंग्लंड आणि साउथ आफ्रिका मध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या मॅचने होईल. हि मॅच लंडन मध्ये द ओवल स्टेडियम मध्ये खेळली जाईल.

The post Cricket World Cup 2019: अशाप्रकारे बघा मोबाईल वर वर्ल्ड कप मॅचेस फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-watch-cricket-world-cup-2019-matches-live-on-smartphone-free/feed/ 0