Nokia 1 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 20 Jan 2020 13:19:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia TA-1207 ला मिळाले FCC सर्टिफिकेशन, Nokia 1.3 नावाने येऊ शकतो हा फोन https://www.91mobiles.com/marathi/nokia-ta-1207-gets-fcc-certification/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-ta-1207-gets-fcc-certification/#respond Mon, 20 Jan 2020 13:19:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6334 बोलले जात आहे कि फोन मध्ये 5.7 किंवा 5.8-इंचाची स्क्रीन असेल

The post Nokia TA-1207 ला मिळाले FCC सर्टिफिकेशन, Nokia 1.3 नावाने येऊ शकतो हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ब्रँडचे स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनी HMD Global ने आतापर्यंत यावर्षी कोणताही स्मार्टफोन सादर केला नाही. पण अशा व्यक्त केली जात आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात सुरु होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस इवेंट मध्ये आपला नवीन फोन सादर करू शकते. पण या इवेंटच्या आधी Nokia चा नवीन फोन मॉडेल नंबर TA-1207 सह सर्टिफाइड झाला आहे, जो Nokia 1 (2020) म्हणजे Nokia 1.3 नावाने सादर केला जाऊ शकतो.

या फोनला एफसीसी कडून सर्टिफिकेशनस मिळाले आहे. तसेच या सर्टिफिकेशन मधून जे डॉक्यूमेंट समोर आले आहेत त्यानुसार फोन 146.56 x 70.46 मिलिमिटर्स सह येईल. याधारावर बोलले जात आहे कि फोन मध्ये 5.7 किंवा 5.8-इंचाची स्क्रीन असेल. तसेच FCC द्वारे समोर आले आहे कि फोन मध्ये 2920mAh बॅटरी (3000mAh) असेल.

या डिवाइस बद्दल आशा व्यक्त करण्यात येत आहे कि कंपनी हा नवीन डिवाइस Nokia 1 चा अपग्रेडेड वर्जन म्हणून सादर करेल. Nokia 2 सीरीजच्या आत कंपनीने नवीन मॉडेल सादर केला आहे. त्यामुलें आता Nokia 1.3 कंपनी मोठी बॅटरी आणि एंडरॉयड 10 (गो एडिशन) सह सादर करू शकते.

अलीकडेच HMD Global चे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर Juho Sarvikas यांनी एक ट्वीट केले होते. या ट्वीट मध्ये त्यांनी Adidas Originals चे स्नीकर्सचा फोटो पोस्ट केला होता. सोबत त्यांनी लिहले आहे कि मला हि Adidas Originals ची लिमिटेड एडिशन जोडी मिळाली आहे. याचा अर्थ असा आहे कि आपल्याला नवीन नोकिया ऑरिजनल फोन लॉन्च केला पाहिजे.

Juho Sarvikas यांच्या या ट्वीट नंतर बोलले जात आहे कि कंपनी आपला जुना फोन पुन्हा एकदा सादर करू शकते. याआधी पण कंपनीने असे केले आहे. एकेकाळी नोकिया मोबाईल फोनच्या दुनियेत लोकप्रिय होती. पण गेल्या काही वर्ष कंपनी आपले सिंहांसन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यावर्षी मोबाईल वर्ल्ड कांग्रेस म्हणजे MWC2020 ची सुरवात 24 फेब्रुवारीला होत आहे. आतापर्यंत कंपनीने Nokia 3310, Nokia 8110 4G आणि Nokia 2720 4G री लॉन्च केले आहेत.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Nokia 1.3 ब्लूटूथ एसआईजी वेबसाइट वर दिसला होता. फोनची लिस्टिंग डेट वेबसाइट वर 20 डिसेंबर 2020 ची होती. ब्लूटूथ एसआईजी वर हा आगामी नोकिया फोन Nokia TA-1213 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता जो ब्रँडचा आगामी डिवाईस Nokia 1.3 बोलला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार Nokia 1.3 कंपनीच्या आधीच्या स्मार्टफोन Nokia 1 Plus चा अपग्रेेडेड मॉडेल असेल.

The post Nokia TA-1207 ला मिळाले FCC सर्टिफिकेशन, Nokia 1.3 नावाने येऊ शकतो हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-ta-1207-gets-fcc-certification/feed/ 0
जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू लॉन्च, हा करेल सर्वांची सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-launch-with-penta-rear-camera-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-launch-with-penta-rear-camera-feature-specifications-price-in-marathi/#respond Mon, 25 Feb 2019 13:38:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3706 5 फोटो एकत्र करून एक फोटोचा आउटपुट देतील. हे फोटो हाईरेज्ल्यूशन वाले असतील, जे फोन मधेच एडिट पण करता येतील.

The post जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू लॉन्च, हा करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल वर्ल्ड कांग्रेस असा मंच आहे जिथे संपूर्ण जगातील टेक कंपन्या आणि स्मार्टफोन ब्रँड आपली टेक्नॉलॉजी सादर करतात. या महा आयोजनच्या 2019 च्या आवृत्तीत पण सॅमसंग, शाओमी आणि हुआवई सारख्या दिग्गज कंपन्यांनी आपले अनोखे डिवाईस सादर केले आहेत आणि आता वेळ आहे अनेक दशके मोबाईल बाजारावर राज्य केलेल्या नोकियाची. यूजर्सचा विश्वास आणि आपले नाव कायम ठेवत नोकिया ने आज पुन्हा इतिहास रचला आहे. नोकिया ने आज जगातील पहिला पाच रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन ‘नोकिया 9 प्योरव्यू’ लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन फक्त दमदार फीचर्स सह येत नाही तर सोबत नोकिया 9 प्योरव्यू चे फीचर्स पण इतके शानदार आहेत जे क्वचितच याआधी एखाद्या स्मार्टफोन मध्ये दिसले असतील.

5 रियर कॅमेरा
नोकिया 9 प्योरव्यू ची सर्वात मोठी ताकद फोनचा कॅमेरा सेटअपच आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे. या फोनच्या बॅक पॅनल वर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 5 कॅमेरा सेंसर आहेत. नोकिया 9 प्योरव्यू चे हे पाचही कॅमेरा कार्ल जेसिस चे आहेत ज्यामुळे फोटोग्राफ्स शानदार येतात. या फोनची खास बाब अशी कि हे पाचही कॅमेरा सेंसर कोणताही फोटो क्लिक करण्यासाठी एक साथ काम करतात तसेच प्रत्येक फोटो एचडीआर मोड वर कॅप्चर होतो.

नोकिया 9 प्योरव्यू च्या कॅमेरा अनोख्या पद्धतीने चालतो. फोन मधील पाचही रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचे आहेत. यात दोन कॅमेरा सेंसर आरजीबी आहे तर इतर तीन मोनोक्रोम सेंसर आहेत. या पाचही कॅमेरा सेंसर्सचा अपर्चर एफ/1.8 आहे. कोणताही फोटो घेताना हे पाचही कॅमेरा एक साथ चालतील. पाचही सेंसर 5 वेगवेगळे फोटो कॅप्चर करतील आणि प्रोसेसिंग करून त्याचक्षणी 5 फोटो एकत्र करून एक फोटोचा आउटपुट देतील. हे फोटो हाईरेज्ल्यूशन वाले असतील, जे फोन मधेच एडिट पण करता येतील.

नोकिया 9 प्योरव्यू मध्ये सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा डुअल टोन एलईडी फ्लॅश आहे तसेच चांगल्या फोटोग्राफ साठी यात शानदार ब्यूटी मोड तसेच फिल्टर्स देण्यात आले आहेत.

नोकिया 9 स्पेसिफिकेशन्स
फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता नोकिया 9 प्योरव्यू 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 5.99-इंचाच्या क्यूएचडी+ 2के पीओएलईडी डिस्प्लेला करतो. कंपनी ने नोकिया 9 प्योरव्यू ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज करण्यात आला आहे जो फोन अनलॉकिंग साठी उपयोगी पडतो. कंपनी ने हा आईपी67 रेटिड बनवला आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो.

नोकिया 9 प्योरव्यू कंपनीने 6जीबी रॅम सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो क्वालकॉमच्या फास्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,320एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस चार्जिंग सह पण वापरता येते. नोकिया 9 प्योरव्यू एचएमडी ग्लोबल ने 699 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 49,600 रुपयांच्या आसपास आहे.

The post जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू लॉन्च, हा करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-launch-with-penta-rear-camera-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0