जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू लॉन्च, हा करेल सर्वांची सुट्टी

nokia 9 pureview

मोबाईल वर्ल्ड कांग्रेस असा मंच आहे जिथे संपूर्ण जगातील टेक कंपन्या आणि स्मार्टफोन ब्रँड आपली टेक्नॉलॉजी सादर करतात. या महा आयोजनच्या 2019 च्या आवृत्तीत पण सॅमसंग, शाओमी आणि हुआवई सारख्या दिग्गज कंपन्यांनी आपले अनोखे डिवाईस सादर केले आहेत आणि आता वेळ आहे अनेक दशके मोबाईल बाजारावर राज्य केलेल्या नोकियाची. यूजर्सचा विश्वास आणि आपले नाव कायम ठेवत नोकिया ने आज पुन्हा इतिहास रचला आहे. नोकिया ने आज जगातील पहिला पाच रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन ‘नोकिया 9 प्योरव्यू’ लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन फक्त दमदार फीचर्स सह येत नाही तर सोबत नोकिया 9 प्योरव्यू चे फीचर्स पण इतके शानदार आहेत जे क्वचितच याआधी एखाद्या स्मार्टफोन मध्ये दिसले असतील.

5 रियर कॅमेरा
नोकिया 9 प्योरव्यू ची सर्वात मोठी ताकद फोनचा कॅमेरा सेटअपच आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे. या फोनच्या बॅक पॅनल वर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 5 कॅमेरा सेंसर आहेत. नोकिया 9 प्योरव्यू चे हे पाचही कॅमेरा कार्ल जेसिस चे आहेत ज्यामुळे फोटोग्राफ्स शानदार येतात. या फोनची खास बाब अशी कि हे पाचही कॅमेरा सेंसर कोणताही फोटो क्लिक करण्यासाठी एक साथ काम करतात तसेच प्रत्येक फोटो एचडीआर मोड वर कॅप्चर होतो.

नोकिया 9 प्योरव्यू च्या कॅमेरा अनोख्या पद्धतीने चालतो. फोन मधील पाचही रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचे आहेत. यात दोन कॅमेरा सेंसर आरजीबी आहे तर इतर तीन मोनोक्रोम सेंसर आहेत. या पाचही कॅमेरा सेंसर्सचा अपर्चर एफ/1.8 आहे. कोणताही फोटो घेताना हे पाचही कॅमेरा एक साथ चालतील. पाचही सेंसर 5 वेगवेगळे फोटो कॅप्चर करतील आणि प्रोसेसिंग करून त्याचक्षणी 5 फोटो एकत्र करून एक फोटोचा आउटपुट देतील. हे फोटो हाईरेज्ल्यूशन वाले असतील, जे फोन मधेच एडिट पण करता येतील.

नोकिया 9 प्योरव्यू मध्ये सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा डुअल टोन एलईडी फ्लॅश आहे तसेच चांगल्या फोटोग्राफ साठी यात शानदार ब्यूटी मोड तसेच फिल्टर्स देण्यात आले आहेत.

नोकिया 9 स्पेसिफिकेशन्स
फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता नोकिया 9 प्योरव्यू 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 5.99-इंचाच्या क्यूएचडी+ 2के पीओएलईडी डिस्प्लेला करतो. कंपनी ने नोकिया 9 प्योरव्यू ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज करण्यात आला आहे जो फोन अनलॉकिंग साठी उपयोगी पडतो. कंपनी ने हा आईपी67 रेटिड बनवला आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो.

नोकिया 9 प्योरव्यू कंपनीने 6जीबी रॅम सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो क्वालकॉमच्या फास्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,320एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस चार्जिंग सह पण वापरता येते. नोकिया 9 प्योरव्यू एचएमडी ग्लोबल ने 699 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 49,600 रुपयांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here