Nokia 2780 Flip - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 11:17:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी Nokia 2780 Flip 4G फोन लाँच; मिळतात दोन डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/4g-mobile-phone-nokia-2780-flip-launched-know-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/4g-mobile-phone-nokia-2780-flip-launched-know-price-specifications-details/#respond Fri, 04 Nov 2022 05:13:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14588 Nokia ब्रँड आता फिनलँडची टेक कंपनी HMD Global कडे आहे. ही कंपनी नोकिया मोबाइल फोन बनवते आणि विकते. एकेकाळी मोबाइल मार्केटवर राज्य करणारी नोकिया आता Android Smartphone च्या बाजारात थोडी पिछाडीवर दिसत आहे. नोकिया फॅन्सना पुन्हा उत्साहित करण्यासाठी एचएमडी ग्लोबलनं पुन्हा एकदा नोकियाचा जुना आयकॉनिक मोबाइल फोन नव्या ढंगात सादर केला आहे. Nokia 2780 Flip […]

The post जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी Nokia 2780 Flip 4G फोन लाँच; मिळतात दोन डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ब्रँड आता फिनलँडची टेक कंपनी HMD Global कडे आहे. ही कंपनी नोकिया मोबाइल फोन बनवते आणि विकते. एकेकाळी मोबाइल मार्केटवर राज्य करणारी नोकिया आता Android Smartphone च्या बाजारात थोडी पिछाडीवर दिसत आहे. नोकिया फॅन्सना पुन्हा उत्साहित करण्यासाठी एचएमडी ग्लोबलनं पुन्हा एकदा नोकियाचा जुना आयकॉनिक मोबाइल फोन नव्या ढंगात सादर केला आहे. Nokia 2780 Flip लाँच झाला आहे जो 4G कनेक्टिव्हिटीसह मार्केटमध्ये आला आहे.

Nokia 2780 Flip

नोकिया 2780 फ्लिप स्मार्टफोन दोन डिस्प्लेला सपोर्ट करतो. एक स्क्रीन फोन ओपन केल्यावर दिसते तर दुसरी फोन बंद केल्यावर बाहेरच्या कव्हरवर आहे. फोनचा प्रायमरी डिस्प्ले 2.7 इंचाचा आहे जो 320 x 240 क्यूवीजीए रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. तसेच Nokia 2780 Flip मध्ये 160 x 128 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 1.77 इंचाचा क्यूक्यूवीजीए डिस्प्ले देण्यात आला आहे. हे देखील वाचा: वनप्लसला बाजारातून हद्दपार करण्याची तयारी; 200W Fast Charging सह येईल iQOO 11 Pro 5G फोन

4g mobile phone Nokia 2780 Flip launched know price specifications details

Nokia 2780 Flip 4G Feature phone आहे जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 215 चिपसेटवर चालतो. हा प्रोसेसर कायओएस 3.1 वर चालतो. या नोकिया मोबाइल फोनमध्ये 4 जीबी रॅम देण्यात आली आहे जो एखाद्या लो बजेट स्मार्टफोन इतका आहे. हा मोबाइल फोन 512एमबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो परंतु यात 32 जीबी मायक्रोएसडी कार्डचा देखील वापर करता येतो.

नोकिया 2780 फ्लिप मध्ये 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅशसह येतो. फोन अनफोल्ड केल्यावर हा रियर कॅमेरा वापरता येतो तसेच फोल्ड केल्यावर हा सेल्फी कॅमेरा म्हणून वापरता येतो. हा नोकिया फोन 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो तसेच या मोबाइलमध्ये सर्व गुगल सर्व्हिसेजचा वापर करता येईल. हे देखील वाचा: सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक

4g mobile phone Nokia 2780 Flip launched know price specifications details

Nokia 2780 Flip मध्ये 3.5एमएम जॅक सोबतच अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 1,450एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी फुल चार्जमध्ये 18 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते, असा दावा कंपनीनं केला आहे. नोकिया 2780 रेड आणि ब्लू कलरमध्ये लाँच केला करण्यात आला तसेच याची किंमत $89.99 म्हणजे भारतीय करंसीनुसार 7,000 रुपयांच्या आसपास आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी Nokia 2780 Flip 4G फोन लाँच; मिळतात दोन डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4g-mobile-phone-nokia-2780-flip-launched-know-price-specifications-details/feed/ 0