तुम्ही 5G फोन घेणं वाटतं तितकं सोपं काम नाही जरी कंपनीनं म्हटलं की फोनमध्ये 5G आहे तरी त्यात सर्व नेटवर्क चालतीलच असं नाही. असा फोन नसावा ज्यात एयरटेल 5जी चालेल आणि जियोची 5जी सर्व्हिस मिळणार नाही किंवा एयरटेलचं नेटवर्क मिळेल आणि जियोला रेंज येणार नाही. कारण अलीकडेच जियो आणि एयरटेलनं आपल्या 5जी सर्व्हिसचं ट्रायल सुरु केलं आहे आणि दोन्ही कंपन्यांनी दोन वेगवेगळ्या 5जी बँड आणि 5जी टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. एका कंपनीनं 5G SA सर्व्हिस सादर केली आहे तर दुसऱ्या कंपनीनं 5G NSA. तसेच बँड देखील वेगळे आहेत. त्यामुळे सर्वच 5G फोन या दोन्ही टेक्नॉलजीला किंवा 5G बँड्सना सपोर्ट करत नाहीत त्यामुळे कोणत्या हँडसेटची निवड करावी हे जाणून घेण्यासाठी आधी 5जी नेटवर्क समजून घेतलं पाहिजे.
5G फोनच्या खरेदीच्या आधी काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. कारण भारतात आतापर्यंत जे 5G फोन उपलब्ध झाले आहेत ते सर्व नेटवर्कच्या बाबतीत एक सारखे नाहीत आणि काहींमध्ये फक्त Airtel आणि VI साठी नेटवर्क सपोर्ट आहे तर काहींमध्ये फक्त Jio 5G नेटवर्कचा सपोर्ट आहे. परंतु काही फोन आहेत ज्यात दोन्ही नेटवर्कचा सपोर्ट आहे त्यामुळे खरेदीच्या आधी तुम्हाला 5जी बँडची माहिती घेणं आवश्यक आहे. म्हणूनच आज या लेखातून आपण 5G बँडची माहिती घेणार आहोत त्यामुळे तुम्ही 5G फोन खरेदी करताना कोणतीही चूक करणार नाही.
5G बँड म्हणजे काय
5G बँड समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. तुम्ही 5G बँडसह NR ही अक्षरे पहिली असतील, जसे की 5G NR बँड-1 बँड-2 इत्यादी. इथे NR चा अर्थ न्यू रेडियो. एकाच स्पेक्ट्रम बँडवर अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस दिल्या जाऊ शकतात परंतु एनआर असेल तर त्याचा अर्थ असा की याचा 5जी फ्रीक्वेंसी बँडसाठी उपयोग होत आहे.
5G NR दोन फ्रीक्वेंसी बँडची डेवलपमेंट करण्यात आली आहे ज्यात पहिली फ्रीक्वेंसी रेंज 1 जिला एफआर 1 देखील म्हणतात. या फ्रीक्वेंसी रेंजमध्ये आधी फक्त sub-6 GHz फ्रीक्वेंसी बँडचा वापर केला होता परंतु आता 410 MHz ते 7125 MHz बँडचा देखील वापर केला जात आहे.
दुसरी फ्रीक्वेंसी रेंज 2 आणि हिला एफआर 2 देखील म्हणतात. यात 5जी सर्व्हिससाठी 24.25 GHz to 71.0 GHz पर्यंतच्या बँडचा वापर केला जातो. ही न्यू फ्रीक्वेंसी रेंज आहे जी 5G सर्व्हिस अंतगर्त 1GBPs किंवा त्यावरील स्पीडसाठी वापरली जाते.
वर सांगितल्याप्रमाणे एकाच स्पेक्ट्रम बँडवर अनेक सेवा दिल्या जाऊ शकतात. जर एखाद्याकडे 1800MHz बँड असेल तर त्यावर 2G, 3G, 4G आणि आता 5G सर्व्हिस देखील देता येईल. 3G आणि 2G सर्व्हिससाठी कंपन्या साधारण स्पेक्ट्रमची माहिती देतात जसे की 1800, 1900MHz आदि. परंतु 4G आणि 5G सर्व्हिससाठी स्पेक्ट्रम बँड 1 आणि 2 सारख्या नावांचा वापर केला जातो. जसे की एखाद्या फोनमध्ये 1800 मेगाहर्ट्ज बँडवर 4जी सपोर्ट असेल तर बँड 3 किंवा बी3 नं ओळखला जाईल. परंतु जर या बँडवर फोनमध्ये 5जी सर्व्हिसचा सपोर्ट मिळाला तर त्याला N3 बँड म्हणतात. 5जी बँडसाठी एन अक्षराचा वापर केला जातो.
भारतात 5G फ्रीक्वेंसी बँड
भारतात 5जी सर्व्हिससाठी 12 फ्रीक्वेंसी बँडचा लिलाव करण्यात आला होता ज्यात रिलायन्स जियो, एयरटेल, विआय आणि अदानी सारख्या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. ज्यात 5जी सर्व्हिससाठी n71 (600MHz), n28 (700MHz), n20 (800MHz), n5 (850MHz), n8 (900MHz), n3 (1800MHz), n1 (2100MHz), n40 (2300MHz), n41 (2500MHz), n78 (3300 – 3800MHz), n77 (3300 – 4200MHz), n79 (4400 – 5000MHz) आणि n258 (26GHz (24.25 – 27.5 GHz)) बँड्सची वाटणी करण्यात आली आहे.
Airtel 5जी बँड
भारतात सध्या एयरटेल आणि जियोनं टेस्टिंग स्वरूपात आपली 5जी सर्व्हिस सुरु केली आहे. एयरटेलकडे यासाठी एफआर 1 बँडमध्ये n8 (900MHz), n3 (1800MHz), n1 (2100MHz) आणि n78 (3300 MHz) स्पेक्ट्रम आहे तर एफआर 2 बँडमध्ये कंपनीकडे n258 (26 GHz) स्पेक्ट्रम उपलब्ध आहे. कंपनीनं 5जीसाठी सध्या एनएसए म्हणजे नॉन स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर 5जी सर्व्हिस सुरु केली आहे.
रिलायन्स Jio 5G बँड
रिलायन्स कंपनीकडे 5जीसाठी एफआर 1 मध्ये n28 (700 MHz) आणि n78 (3300 MHz) स्पेक्ट्रम बँड आहे. एफआर 2 मध्ये n258 (26 GHz) स्पेक्ट्रम बँड आहे. जियोनं 5जीसाठी एन78 बँडवर आपली एसए म्हणजे स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर 5जी सेवा सुरु केली आहे. म्हणजे सध्या एयरटेलपेक्षा जियोची 5जी टेक्नॉलॉजी वेगळी आहे.
Jio च्या 5G SA आणि Airtel च्या NSA 5G मधील फरक
5जी एनएसए: एयरटेलनं 5जी एनएसए सर्व्हिसमधील एनएसए म्हणजे नॉन स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर. या 5जी टेक्नॉलॉजीला तुम्ही 4जीचं अॅडव्हान्स व्हर्जन देखील म्हणू शकता. यात 5जी रेडियो सिग्नल 4जी कोरवर ट्रांसफर केलं जातं. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर या टेक्नॉलॉजीमध्ये नेटवर्क ऑपरेटर 5जीसाठी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत नाहीत परंतु 4जी नेटवर्कमध्ये थोडा बदल करून 5जी सर्व्हिस देण्यालायक बदल करण्यात येतात.
5जी एसए: भारतात 5जी एसए नेटवर्कची सुरुवात जियोनं केली आहे. 5जी मध्ये एसएचा अर्थ स्टॅन्ड-अलोन आर्किटेक्चर. म्हणजे एक असं आर्किटेक्चर जे खास 5जी नेटवर्कसाठी तयार करण्यात आलं आहे. यात 4जी कोरचा कुठेधी वापर केला जात नाही. त्यामुळेच जियो 5जी सर्व्हिसला ट्रू 5जी असं नाव देण्यात आलं आहे.
5G फ्रीक्वेंसी बँड
रेंज आणि स्पीडनुसार 5जी स्पेक्ट्रम बँडचे 3 भाग करण्यात आले आहेत.
- लो फ्रीक्वेंसी बँड
- मिड फ्रीक्वेंसी बँड
- हाय फ्रीक्वेंसी बँड
लो बँड फ्रीक्वेंसी: सब 1 गीगा हर्ट्ज फ्रीक्वेंसी बँड लो बँड फ्रीक्वेंसी रेंज म्हटलं जातं. यांची फ्रीक्वेंसी कमी असते परंतु वेवलेंथ लांब असते. त्यामुळे हे नेटवर्क उभारण्यासाठी कमी खर्च येतो. तसेच इंडोर कव्हरेज आणि एन्ड टू एन्ड कव्हरेजमध्ये लो बँड फ्रीक्वेंसी रेंज खूप फायदेशीर ठरते. परंतु यातील एक दोष म्हणजे यात तुम्ही हाय-स्पीड इंटरनेट देऊ शकत नाही. 5जी सर्व्हिसमध्ये देखील याची क्षमता कमी असते, तरीही 4जी पेक्षा खूप फास्ट असते. भारतात n5 (850MHz), n8 (900MHz), n20 (800MHz) आणि n28 (700MHz) स्पेक्ट्रम बँड लो फ्रीक्वेंसी बँडमध्ये येतात. जियो कडे n28 (700MHz) स्पेक्ट्रम बँड उपलब्ध आहे. या बँडचा वापर कमी लोकवस्ती असलेल्या ठिकाणांसाठी केला जातो.
मिड फ्रीक्वेंसी बँड: 1 पासून 6 गीगाहर्ट्जचे फ्रीक्वेंसी बँडना मिड बँड म्हटलं जातं. या फ्रीक्वेंसी बँड मध्ये कव्हरेज एरिया खूप मोठा असतो. परंतु यात वेवलेंथ थोडी छोटी असते परंतु तुलनेनं स्पीड चांगला मिळतो. यात तुम्हाला 4जी सर्व्हिस पेक्षा 10 पट जास्त स्पीड मिळतो. शहरी भागांमध्ये लोकवस्ती जास्त असते आणि इंटरनेटचा वापर जास्त असेलेल्या ठिकाणी या सर्व्हिसचा वापर केला जातो. भारतात n1 (2100MHz), n3 (1800MHz), n40 (2300MHz), n41 (2500MHz), n77 (3300 – 4200MHz) आणि n78 (3300 – 3800MHz) 5जी बँड यासाठी वापरले जातात. जियो आणि एयरटेल दोन्ही कडे n78 (3300 – 3800MHz) 5जी बँड उपलब्ध आहे. तसेच एयरटेल कडे एन3 बँड देखील आहे.
हाय फ्रीक्वेंसी बँड: हाय फ्रीक्वेंसी बँडला मिलीमीटर वेव देखील म्हटलं जातं. या बँडमध्ये तुम्हाला 5जी मध्ये अल्ट्रा स्पीड मिळतो. परंतु याची वेवलेंथ खूप छोटी असते त्यामुळे हे नेटवर्क उभारण्यासाठी खर्च जास्त येतो. 4जीच्या तुलनेत या या बँडमध्ये 5जी वर 50 ते 100 पट जास्त स्पीड मिळवता येईल. या अंतर्गत 24 ते 52 गीगाहर्ट्जचे स्पेक्ट्रम बँड येतात. भारतात n258 (26GHz (24.25 – 27.5 GHz) बँड्सचं वाटप करण्यात आलं आहे. हा बँड सध्या जियो आणि अदानी ग्रुपकडे आहे. परंतु कंपन्या या बँडचा वापर सामान्य लोकांसाठी न करता व्यावसायिक कामांसाठी करतील.
भारतात 5G सपोर्टेड फोन
आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की भारतात 5जी नेटवर्क बँडची परिस्थिती कशी आहे. कोणती कंपनी कशी सेवा देत आहे आणि कोणाकडे कोणता 5जी बँड उपलब्ध आहे. परंतु आता 5जी स्मार्टफोनची बारी आहे. भारतात 5जी स्मार्टफोनच्या नावावर अनेक फोन लाँच करण्यात आले आहेत. परंतु शेवटी प्रश्न पडतात की त्या स्मार्टफोनवर 5G चालेल का आणि जर चालली कोणत्या बँड्सवर चालेल तसेच कोणत्या ऑपरेटरचं वापरता येईल?
या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जर तुम्ही 5जी स्मार्टफोन विकत घेणार असाल तर सर्वप्रथम त्या फोनमध्ये असलेले बँड चेक करा. कोणत्या फोनमध्ये किती बँड्सचा सपोर्ट आहे ते जाणून घ्या. फोनमध्ये n71, n28, n20, n5, n8, n3, n1, n40, n41, n78, n77 आणि n79 5जी बँडचा सपोर्ट असणं आवश्यक आहे.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.