Nokia 3.1 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 12 Oct 2018 11:55:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 नोकिया एक्स7 बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, लॉन्चच्या आधीच स्पेसिफिकेशन्सची मिळाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-listed-on-geekbench-to-launch-on-16-october-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-listed-on-geekbench-to-launch-on-16-october-feature-specifications-in-marathi/#respond Fri, 12 Oct 2018 11:55:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2480 गीकबेंच च्या लिस्टिंग नंतर चीन नंतर कंपनी नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस लवकरच भारतात आणेल याची शक्यता वाढली आहे.

The post नोकिया एक्स7 बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, लॉन्चच्या आधीच स्पेसिफिकेशन्सची मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने कालच इंडियन मार्केट मध्ये आपले दोन शानदार स्मार्टफोन नोकिया 3.1 प्लस आणि नोकिया 8110 4जी बनाना फोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही नोकिया फॅनसाठी मोठे सरप्राईजआहेत कारण चर्चा तर नोकिया 7.1 प्लस ची होती परंतु कंपनी ने आपले इतर दोन फोन बाजारात आणले. जरी नोकिया ने अजून नोकिया 7.1 प्लस च्या लॉन्च बद्दल काही सांगितले नसले तरी आता एक नवीन लीक आला आहे नोकिया 7.1 प्लस चीनी बेंचमार्किंग साइट वर दिसला आहे,ज्यामुळे फोन लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वाढली आहे.

नोकिया 7.1 प्लस चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंच वर फोन नोकिया एक्स7 नावाने लिस्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आधीपण नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस चीन मध्ये नोकिया एक्स6 तसेच नोकिया एक्स5 नावाने लॉन्च केले गेले होते. गीकबेंच च्या या लिस्टिंग वरून समजले आहे कि नोकिया एक्स7 एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केला जाईल तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर वर चालेल.

नोकिया एक्स7 बद्दल ​गीकबेंच लिस्टिंग मध्ये संग्म्यात आले आहे कि एचएमडी ग्लोबल हा फोन 6जीबी रॅम मेमरी सह बाजारात आणेल. गीकबेंच वर नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस ला सिंगल-कोर मध्ये 1827 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 5937 स्कोर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे एचएमडी ग्लोबल येत्या 16 ऑक्टोबरला मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि त्याच दिवशी नोकिया एक्स7 तिथे लॉन्च होईल.

गीकबेंच च्या लिस्टिंग नंतर चीन नंतर कंपनी नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस लवकरच भारतात आणेल याची शक्यता वाढली आहे. लीक्स नुसार नोकिया एक्स7 मध्ये 6.2-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन 6जीबी रॅम सह 4जीबी रॅम सह पण लॉन्च केला जाऊ शकतो तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3400एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

काल भारतात लॉन्च झालेल्या नोकिया 3.1 प्लस चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
नोकिया 8110 4जी बनाना फोन चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post नोकिया एक्स7 बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, लॉन्चच्या आधीच स्पेसिफिकेशन्सची मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-listed-on-geekbench-to-launch-on-16-october-feature-specifications-in-marathi/feed/ 0
मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला नोकिया 3.1 प्लस, बघ प्राइस आणि स्पेसिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-1-plus-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-1-plus-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/#respond Thu, 11 Oct 2018 11:54:25 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2452 हा फोन 2जीबी आणि 3जीबी रॅम मेमरी सह उपलब्ध आहे. यासोबत 16जीबी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 400जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करू शकता.

The post मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला नोकिया 3.1 प्लस, बघ प्राइस आणि स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दोन महिन्यांपूर्वी एचएमडी ग्लोबल ने नोकिया 3.1 मॉडेल भारतात आणला होता, तर आज कंपनीने याचा अपग्रेड वर्जन नोकिया 3.1 प्लस सादर केला आहे. चांगली बाब हि आहे कि फोन मध्ये अनेक अपग्रेड आहेत ज्यामुळे हा जुन्या मॉडेल पेक्षा चांगला झाला आहे. भारतात नोकिया 3.1 प्लस ची किंमत 11,499 रुपये आहे आणि हा फोन ऑफलाइन स्टोर वर 19 ऑक्टोबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

नोकिया 3.1 प्लस यामध्ये तुम्हाला बेजल लेस डिजाइन सह मोठी स्क्रीन मिळेल. तसेच फोनची बिल्ट क्वालिटी पण शानदार आहे आणि कंपनी ने ​हीटिंग पासून वाचण्यासाठी विशेष कूलिंग सिस्टम वापरली आहे. फोन मध्ये 6—इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. जरी कंपनी ने स्क्रीन कोटिंगची माहिती दिली नसली तरी असा दावा केला आहे कि तुम्हाला इम्प्रेसिव कॉन्ट्रास्ट आणि क्लियर व्यू मिळेल.

हा फोन मीडियाटेक हेलिया पी22 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये आक्टाकोर (आॅक्टाकोर 2.0गीगाहट्र्ज + आॅक्टाकोर 1.4गीगाहट्र्ज) प्रोसेसर देण्यात आला आहे. मीडियाटेक चा हा नवीन प्रोसेसर आहे जो मिड रेंज च्या फोन मध्ये चांगली परफॉर्मेंस देतो. हा फोन 2जीबी आणि 3जीबी रॅम मेमरी सह उपलब्ध आहे. यासोबत 16जीबी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 400जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करू शकता.

नोकिया 3.1 प्लस एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि हा एंडरॉयड वन इंटीग्रेशन सह तेतो. याचा फायदा असा कि फोन मध्ये तुम्हला प्योर एंडरॉयड वापरता येतो. सोबतच यात नवीन ओएस चे अपडेट पण मिळतील.

कंपनी ने यात डुअल रियर कॅमेरा दिला हे. नोकिया 3.1 प्लस मध्ये एक सेंसर 13—मेगापिक्सलचा जो एफ 2.0 अपर्चर सह येतो. कंपनी ने यात पीडीएएफ टेक्नॉलॉजी दिली आहे जी फास्ट फोकस साठी प्रसिद्ध आहे. तसेच दुसरा सेंसर 5—मेगापिक्सलचा आहे जो मोनोक्रोम फोटो घेतो. हा सेंसर एफ/2.4 अपर्चर सह येतो. सेल्फी साठी फोन मध्ये 8—मेगापिक्सलचा सेन्सर आहे जो एफ/2.2 अपर्चर सह येईल.

ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये डुअल 4जी वापरता येते. यासोबत वाईफाई ब्लूटूथ आणि जीपीएस पण मिळतील. कंपनी ने सिक्योरिटी साठी बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,500 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

The post मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला नोकिया 3.1 प्लस, बघ प्राइस आणि स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-1-plus-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0