मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला नोकिया 3.1 प्लस, बघ प्राइस आणि स्पेसिफिकेशन

दोन महिन्यांपूर्वी एचएमडी ग्लोबल ने नोकिया 3.1 मॉडेल भारतात आणला होता, तर आज कंपनीने याचा अपग्रेड वर्जन नोकिया 3.1 प्लस सादर केला आहे. चांगली बाब हि आहे कि फोन मध्ये अनेक अपग्रेड आहेत ज्यामुळे हा जुन्या मॉडेल पेक्षा चांगला झाला आहे. भारतात नोकिया 3.1 प्लस ची किंमत 11,499 रुपये आहे आणि हा फोन ऑफलाइन स्टोर वर 19 ऑक्टोबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

नोकिया 3.1 प्लस यामध्ये तुम्हाला बेजल लेस डिजाइन सह मोठी स्क्रीन मिळेल. तसेच फोनची बिल्ट क्वालिटी पण शानदार आहे आणि कंपनी ने ​हीटिंग पासून वाचण्यासाठी विशेष कूलिंग सिस्टम वापरली आहे. फोन मध्ये 6—इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. जरी कंपनी ने स्क्रीन कोटिंगची माहिती दिली नसली तरी असा दावा केला आहे कि तुम्हाला इम्प्रेसिव कॉन्ट्रास्ट आणि क्लियर व्यू मिळेल.

हा फोन मीडियाटेक हेलिया पी22 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये आक्टाकोर (आॅक्टाकोर 2.0गीगाहट्र्ज + आॅक्टाकोर 1.4गीगाहट्र्ज) प्रोसेसर देण्यात आला आहे. मीडियाटेक चा हा नवीन प्रोसेसर आहे जो मिड रेंज च्या फोन मध्ये चांगली परफॉर्मेंस देतो. हा फोन 2जीबी आणि 3जीबी रॅम मेमरी सह उपलब्ध आहे. यासोबत 16जीबी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 400जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करू शकता.

नोकिया 3.1 प्लस एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि हा एंडरॉयड वन इंटीग्रेशन सह तेतो. याचा फायदा असा कि फोन मध्ये तुम्हला प्योर एंडरॉयड वापरता येतो. सोबतच यात नवीन ओएस चे अपडेट पण मिळतील.

कंपनी ने यात डुअल रियर कॅमेरा दिला हे. नोकिया 3.1 प्लस मध्ये एक सेंसर 13—मेगापिक्सलचा जो एफ 2.0 अपर्चर सह येतो. कंपनी ने यात पीडीएएफ टेक्नॉलॉजी दिली आहे जी फास्ट फोकस साठी प्रसिद्ध आहे. तसेच दुसरा सेंसर 5—मेगापिक्सलचा आहे जो मोनोक्रोम फोटो घेतो. हा सेंसर एफ/2.4 अपर्चर सह येतो. सेल्फी साठी फोन मध्ये 8—मेगापिक्सलचा सेन्सर आहे जो एफ/2.2 अपर्चर सह येईल.

ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये डुअल 4जी वापरता येते. यासोबत वाईफाई ब्लूटूथ आणि जीपीएस पण मिळतील. कंपनी ने सिक्योरिटी साठी बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,500 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here