Nokia 7 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 25 May 2018 16:46:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 3,799 रुपयांमध्ये मिळेल नोकिया 6.1, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 8 सिरोको, जाणून घ्या कसा मिळवाल फायदा https://www.91mobiles.com/marathi/nokia-8-nokia-7-plus-nokia-6-1-available-on-down-payment-rs-3799-with-airtel-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-8-nokia-7-plus-nokia-6-1-available-on-down-payment-rs-3799-with-airtel-in-marathi/#respond Fri, 25 May 2018 16:46:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=644 नोकिया ने देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल सोबत भागीदारी केली आहे

The post फक्त 3,799 रुपयांमध्ये मिळेल नोकिया 6.1, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 8 सिरोको, जाणून घ्या कसा मिळवाल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया 8 सिरोको, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 6.1 एचएमडी ग्लोबल द्वारा भारतात लॉन्च केलेले लेटेस्ट स्मार्टफोन आहेत. हे तिन्ही फोन वेगवेगळ्या किंमतीत देशात सेल साठी उपलब्ध आहेत. नोकिया चे असे फॅन्स जे जास्त किंमती मुळे आपला आवडीचा नोकिया स्मार्टफोन विकत घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी नोकिया एक शानदार संधी घेऊन आली आहे. जास्त पैसे न देता हे स्मार्टफोन यूजर्सना उपलब्ध करण्यासाठी नोकिया ने एयरटेल सोबत हातमिळवणी केली आहे.

नोकिया ने देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल सोबत भागीदारी केली आहे, ज्या अंतर्गत एयरटेल आपल्या प्लॅटफार्म वरून नोकिया 8 सिरोको, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 6.1 विकत आहे. एयरटेल कडून हे तिन्ही हिट स्मार्टफोन ईएमआई वर उपलब्ध करावण्यात येतील. एयरटेल कडून मामूली किंमत घेऊन हे फोन यूजर्सना दिले जातील, त्यानंतर ग्राहकांना ठराविक वेळे साठी एका फिक्स रक्केमेने रिचार्ज करत रहावे लागेल. या रिचार्ज ने नोकिया फोन चा र्इएमआई पूर्ण होईल आणि सोबतच वापरण्यासाठी भरपूर डाटा आणि अमर्याद टेलीकॉम बेनिफिट पण मिळतील.

नोकिया 6.1 चा 3जीबी रॅम वेरिएंट विकत घेताना यूजर्सना 3,799 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर 12 महिन्यांपर्यंत 1,499 रुपये प्रतिमाह दराने पैसे द्यावे लागतील. त्याचप्रमाणे जर नोकिया 6.1 चा 4जीबी रॅम वेरिएंट विकत घेणार असला तर ग्राहकांना 5,799 रुपये द्यावे लागतील तसेच 12 महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला 1,499 रुपये द्यावे लागतील. या दोन्ही प्लान्स मध्ये एयरटेल यूजर्सना 12 महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला 30जीबी 4जी डाटा मिळेल आणि अनलिमिटेड वॉयस कॉल मिळतील.

नोकिया 7 प्लस जर तुम्ही घेऊ इच्छित असाल तर 5,599 रुपये देऊन हा फोन मिळवू शकतो. फोन विकत घेतल्यावर 12 महिन्यांपर्यंत यूजर्सना प्रत्येक महिन्याला 2,099 रुपये शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क दिल्यावर प्रत्येक महिन्याला 30जीबी 4जी डाटा सह मोफत वॉयस कॉल पण मिळतील.

त्याचप्रमाणे नोकिया 8 सिरोको साठी 8,599 रुपयांचे डाउन पेमेंट करून हा फोन विकत घेऊ शकता. त्यानंतर 18 महिन्यांसाठी ग्राहकांना 2,799 प्रति माह च्या हिशोबाने शुल्क द्यावे लागेल. या प्लान मध्ये यूजर्सना 18 महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला 50जीबी 4जी डाटा अनलिमिटेड कॉलिंग चा लाभ मिळेल.

नोकिया 8 सिरोको, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 6.1 एयरटेल नेटवर्क वरून विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post फक्त 3,799 रुपयांमध्ये मिळेल नोकिया 6.1, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 8 सिरोको, जाणून घ्या कसा मिळवाल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-8-nokia-7-plus-nokia-6-1-available-on-down-payment-rs-3799-with-airtel-in-marathi/feed/ 0
आज आहे नोकिया 8 सिरोको आणि नोकिया 7 प्लस चा पहिला सेल, जाणून घ्या सर्व आॅफर्स, किंमत आणि सर्व काही https://www.91mobiles.com/marathi/nokia-8-sirocco-nokia-7-plus-available-for-sale-in-india-price-offer-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-8-sirocco-nokia-7-plus-available-for-sale-in-india-price-offer-specifications-in-marathi/#respond Mon, 30 Apr 2018 11:22:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=165 नोकिया 7 प्लस शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध असेल. तर नोकिया 8 सिरोको शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post आज आहे नोकिया 8 सिरोको आणि नोकिया 7 प्लस चा पहिला सेल, जाणून घ्या सर्व आॅफर्स, किंमत आणि सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या महिन्याच्या सुरुवातीला टेक कंपनी एचएमडी ग्लोबल ने ​नोकिया ब्रांड अंतर्गत आपल्या नवीन स्मार्टफोंस ची मोठी रेंज भारतीय बाजारात आणली आहे. नोकिया ने नोकिया 8 सिरोको, नोकिया 7 प्लस, न्यू नोकिया 6 आणि नोकिया 1 भारतात लॉन्च केले होते. या सर्व स्मार्टफोंन मध्ये कंपनी चे हाईएंड डिवाईस नोकिया 8 सिरोको आणि नोकिया 7 प्लस जहां गत 20 एप्रिल पासून प्री-आॅर्डर साठी लिस्ट झाले होते. पण आता नोकिया फॅन्स ची प्रतीक्षा संपली आहे कंपनी ने आपले दोन्ही डिवाईस सेल साठी उपलब्ध केले आहेत.

एचएमडी ग्लोबल ने आॅनलाईन प्लेटफार्म सोबतच आॅफलाईन स्टोर्स वर पण नोकिया 8 सिरोको आणि नोकिया 7 प्लस चा सेल सुरू केला आहे. नोकिया 7 प्लस फक्त आॅनलाईन सेल साठी उपलब्ध झाला आहे तर नोकिया 8 सिरोको आॅफलाईन बाजारात संगीता मोबाईल्स, बिग-सी, क्रोमा, पूर्विका आणि रिलायंस डिजिटल सारख्या मोठ्या रिटेल चेन स्टोर्स मधुन विकत घेता येईल.

नोकिया 7 प्लस शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध असेल. तर नोकिया 8 सिरोको शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल. तसेच नोकिया च्या आॅफिशियल वेबसाइट वर हे दोन्ही मॉडेल सेल साठी उपलब्ध आहेत. किंमत पाहता कंपनी ने नोकिया 7 प्लस की किंमत 25,999 रुपये ठेवली आहे तसेच नोकिया 8 सिरोको 49,999 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल.

कंपनी कडून मिळणार्‍या लॉन्च ऑफर बद्दल बोलायचे झाले तर एयरटेल नंबर सह नोकिया 7 प्लस वापरल्यास 2,000 रुपये कॅशबॅक दिला जात आहे तसेच 2018 च्या शेवटपर्यंत एयरटेल टीवी चा फ्री पॅक मिळत आहे. अमेजॉन वर हा फोन 12 महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआई वर उपलब्ध आहे. तसेच मेकमाईट्रीप चे 25 टक्क्यांचा डिस्काउंट कूपन मिळत आहे.

नोकिया 8 सिरोको वर मिळणार्‍या आॅफर्स बद्दल बोलायचे तर या फोन च्या खरेदी वर एयरटेल ने 120जीबी अतिरिक्त 4जी इंटरनेट डाटा तसेच पूर्ण वर्षासाठी एयरटेल टीवी चा फ्री ऐक्सेस दिला जात आहे. तसेच फ्लिपकार्ट वर हा फोन 19,000+3,000 रुपयांच्या एक्सचेंज आॅफर सह 5,000 रुपयांच्या अतिरिक्त डिसकाउंट वर सेल साठी उपलब्ध आहे.

The post आज आहे नोकिया 8 सिरोको आणि नोकिया 7 प्लस चा पहिला सेल, जाणून घ्या सर्व आॅफर्स, किंमत आणि सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-8-sirocco-nokia-7-plus-available-for-sale-in-india-price-offer-specifications-in-marathi/feed/ 0