फक्त 3,799 रुपयांमध्ये मिळेल नोकिया 6.1, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 8 सिरोको, जाणून घ्या कसा मिळवाल फायदा

नोकिया 8 सिरोको, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 6.1 एचएमडी ग्लोबल द्वारा भारतात लॉन्च केलेले लेटेस्ट स्मार्टफोन आहेत. हे तिन्ही फोन वेगवेगळ्या किंमतीत देशात सेल साठी उपलब्ध आहेत. नोकिया चे असे फॅन्स जे जास्त किंमती मुळे आपला आवडीचा नोकिया स्मार्टफोन विकत घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी नोकिया एक शानदार संधी घेऊन आली आहे. जास्त पैसे न देता हे स्मार्टफोन यूजर्सना उपलब्ध करण्यासाठी नोकिया ने एयरटेल सोबत हातमिळवणी केली आहे.

नोकिया ने देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल सोबत भागीदारी केली आहे, ज्या अंतर्गत एयरटेल आपल्या प्लॅटफार्म वरून नोकिया 8 सिरोको, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 6.1 विकत आहे. एयरटेल कडून हे तिन्ही हिट स्मार्टफोन ईएमआई वर उपलब्ध करावण्यात येतील. एयरटेल कडून मामूली किंमत घेऊन हे फोन यूजर्सना दिले जातील, त्यानंतर ग्राहकांना ठराविक वेळे साठी एका फिक्स रक्केमेने रिचार्ज करत रहावे लागेल. या रिचार्ज ने नोकिया फोन चा र्इएमआई पूर्ण होईल आणि सोबतच वापरण्यासाठी भरपूर डाटा आणि अमर्याद टेलीकॉम बेनिफिट पण मिळतील.

नोकिया 6.1 चा 3जीबी रॅम वेरिएंट विकत घेताना यूजर्सना 3,799 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर 12 महिन्यांपर्यंत 1,499 रुपये प्रतिमाह दराने पैसे द्यावे लागतील. त्याचप्रमाणे जर नोकिया 6.1 चा 4जीबी रॅम वेरिएंट विकत घेणार असला तर ग्राहकांना 5,799 रुपये द्यावे लागतील तसेच 12 महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला 1,499 रुपये द्यावे लागतील. या दोन्ही प्लान्स मध्ये एयरटेल यूजर्सना 12 महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला 30जीबी 4जी डाटा मिळेल आणि अनलिमिटेड वॉयस कॉल मिळतील.

नोकिया 7 प्लस जर तुम्ही घेऊ इच्छित असाल तर 5,599 रुपये देऊन हा फोन मिळवू शकतो. फोन विकत घेतल्यावर 12 महिन्यांपर्यंत यूजर्सना प्रत्येक महिन्याला 2,099 रुपये शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क दिल्यावर प्रत्येक महिन्याला 30जीबी 4जी डाटा सह मोफत वॉयस कॉल पण मिळतील.

त्याचप्रमाणे नोकिया 8 सिरोको साठी 8,599 रुपयांचे डाउन पेमेंट करून हा फोन विकत घेऊ शकता. त्यानंतर 18 महिन्यांसाठी ग्राहकांना 2,799 प्रति माह च्या हिशोबाने शुल्क द्यावे लागेल. या प्लान मध्ये यूजर्सना 18 महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला 50जीबी 4जी डाटा अनलिमिटेड कॉलिंग चा लाभ मिळेल.

नोकिया 8 सिरोको, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 6.1 एयरटेल नेटवर्क वरून विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here