Nokia 9.2 PureView - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 27 Jan 2020 13:11:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia 9.2 मध्ये असेल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट, 48MP सेल्फी कॅमेऱ्यासह होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-2-pureview-with-qualcomm-snapdragon-865-chipset-48mp-selfie-camera-might-launch-in-h1-2020/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-2-pureview-with-qualcomm-snapdragon-865-chipset-48mp-selfie-camera-might-launch-in-h1-2020/#respond Mon, 27 Jan 2020 13:11:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6406 या फोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पण Nokia 9.1 PureView पेक्षा वेगळे असतील असा अंदाज एनपीयू ने वर्तवला आहे.

The post Nokia 9.2 मध्ये असेल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट, 48MP सेल्फी कॅमेऱ्यासह होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ब्रँडचे मालकी हक्क असणारी टेक कंपनी HMD Global चे चीफ प्रोडक्ट ऑफिसर Juho Sarvikas यांनी या महिन्याच्या सुरवातीला एक ट्वीट केले होते ज्यात सांगण्यात आले होते कि, ‘आपण नवीन नोकिया ऑरिजनल फोन लॉन्च केले पाहिजेत.’ या ट्वीट नंतर चर्चा होत आहे कि नोकियाचा नवीन स्मार्टफोन येणार आहे. कंपनीने अजूनपर्यंत तरी आगामी Nokia फोन बद्दल कोणतीही घोषणा केली नाही पण एका ताजा रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि कंपनी नवीन डिवाईस Nokia 9.2 वर काम करत आहे आणि हा फोन लवकरच टेक मंचावर येऊ शकतो.

Nokia 9.2 ची माहिती वेबसाइट नोकियापावरयूजर च्या माध्यमातून समोर आली आहे. या वेबसाइटने सांगितले आहे कि एचएमडी ग्लोबलने Nokia 9.1 PureView च्या नवीन वर्जन वर काम सुरु केले आहे आणि हा नवीन फोन Nokia 9.2 किंवा Nokia 9.2 PureView नावाने येऊ शकतो. विशेष म्हणजे Nokia 9.1 PureView गेल्या वर्षी क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर लॉन्च झाला होता त्यामुळे चर्चा अशी सुरु झाली होती कि नोकिया या फोनचा नवीन वर्जन घेऊन येईल ज्यात स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट असेल. पण आता एनपीयू ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे कि एचएमडी ग्लोबल आता थेट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट असलेला वर्जन आणेल आणि याचे नाव Nokia 9.2 असू शकते.

रिपोर्टनुसार हा आगामी फोन Nokia 9.2 किंवा Nokia 9.2 PureView नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. वेबसाइट नुसार हा स्मार्टफोन कंपनी पुढल्या महिन्यात आयोजित होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस MWC 2020 मध्ये सादर न करता मे किंवा जून मध्ये टेक मंचावर आणेल. या स्मार्टफोनची मोठी खासियत फोन मधील क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट असेल जो याला 5G कनेक्टिविटी देईल. तसेच या फोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पण Nokia 9.1 PureView पेक्षा वेगळे असतील असा अंदाज एनपीयू ने वर्तवला आहे.

हे देखील वाचा: 4 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होईल POCO X2, बदलून जाईल स्मार्टफोन्सचा फ्लॅगशिप सेग्मेंट

Nokia 9.2 / Nokia 9.2 PureView बद्दल दुसऱ्या वेबसाइट नोकियामोब डॉट नेट ने म्हटले आहे कि हा स्मार्टफोन बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी 48 मेगापिक्सल किंवा 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर मिळू शकतो. तसेच या वेबसाइटच्या मते नोकिया 9.2 मधून कंपनी 3.5एमएम ऑडियो जॅक काढून टाकू शकते तसेच हा फोन वायरलेस चार्जिंग सह टेक मंचावर येऊ शकतो. पण Nokia 9.2 च्या अधिक माहितीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

Nokia 2.3

नोकियाने अलीकडेच भारतात Nokia 2.3 स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो 8,199 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. या बजेट स्मार्टफोन मध्ये 6.2 इंचाचा एचडी+ (720×1520 पिक्सल) इन-सेल डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे. तर स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी क्वाड-कोर मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर आहे. Nokia 2.3 मध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 400 जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा: कमी झाली शाओमीच्या स्वस्त फोन Redmi Go ची किंमत,जाणून घ्या नवीन किंमत

तसेच फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, अपर्चर एफ/2.2 आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिविटी साठी 4जी एलटीई, वाई-फाई 802.11 बी/ जी/एन, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी (v2.0) आणि 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक आहेँ. तर स्मार्टफोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. नोकिया 2.3 स्मार्टफोन एंड्रॉयड 9.0 पाई वर चालतो.

The post Nokia 9.2 मध्ये असेल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट, 48MP सेल्फी कॅमेऱ्यासह होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-2-pureview-with-qualcomm-snapdragon-865-chipset-48mp-selfie-camera-might-launch-in-h1-2020/feed/ 0