कमी झाली शाओमीच्या स्वस्त फोन Redmi Go ची किंमत,जाणून घ्या नवीन किंमत

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने अलीकडेच रेडमी के20 सीरीज सोबत मी ए3 स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली होती. या दोन फोन्स व्यतिरिक्त कंपनीने Redmi Go च्या किंमतीत पण कपात केली आहे. Android Go वर आधारित हा फोन कंपनीने भारतात गेल्या वर्षी 4,499 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला होता.

सुरवातीला हा स्मार्टफोन 8 जीबी स्टोरेज वेरिएंट सह लॉन्च केला गेला होता, नंतर डिवाइस 16 जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला होता. याचा 16 जीबी स्टोरेज वेरिएंट 4,799 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. रेडमी इंडियाने या बातमीची माहिती आपल्या सोशल मीडिया चॅनेलच्या माध्यमातून दिली आहे.

Redmi Go ची नवीन किंमत

ट्विटर वर घोषणा करत कंपनीने माहिती दिली आहे कि रेडमी गो फोन आता भारतात 300 रुपयांपर्यंत कमी किंमतीत विकत घेता येईल. याच्या 8 जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीत 200 रुपयांच्या कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे हा 4,299 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. तसेच 16 जीबी स्टोरेज वेरिएंट 300 रुपयांनी स्वस्त केला गेला आहे, ज्यमुळे हा 4,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. नवीन किंमतीसह हा स्मार्टफोन सध्या अमेझॉन, Mi.com आणि रीटेल आउटलेट मध्ये उपलब्ध आहे.

Redmi Go स्पेसिफिकेशन्स

एंडरॉयड गो असल्यामुळे शाओमीच्या या फोनला येणाऱ्या एंडरॉयडचे नवीन अपडेट पण या फोनला इतरांच्या आधी मिळतील. स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमी रेडमी गो को 16:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे. फोन मध्ये 5.0-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड ओरियोच्या के गो एडिशन वर सादर केला गेला आहे जो लवकरच एंडरॉयड 9 पाई वर अपडेट होईल. रेडमी गो कंपनी द्वारा 1जीबी रॅम सोबत 8जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. रेडमी गो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे.

रेडमी गो भारतात 1जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे. फोन 8जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते. रेडमी गो चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रेडमी गो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. इंडियन स्माटफोन यूजर साठी खास बाब अशी कि रेडमी गो 20 पेक्षा जास्त भारतीय क्षेत्रिय भाषा समजू शकेल आणि त्याच भाषेत चालेल पण. ब्लूटूथ, वाईफाई, आईआर ब्लास्ट सारख्या बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी रेडमी गो मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी रेडमी गो वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here