Nokia C2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 16 Mar 2020 12:25:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia चा मास्टर स्ट्रोक, लॉन्च केला स्वस्त Nokia C2 Android Go स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/nokia-c2-launched-5mp-rear-camera-budget-phone-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-c2-launched-5mp-rear-camera-budget-phone-price-specification/#respond Mon, 16 Mar 2020 12:25:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6795 बजेट कॅटगरी मध्ये सादर करण्यात आलेला Nokia C2 भारतात कधी लॉन्च केला जाईल याची माहिती समोर आलेली नाही. पण आशा आहे कि कंपनी लवकरच हा इंडियन मार्केट मध्ये पण सादर करेल.

The post Nokia चा मास्टर स्ट्रोक, लॉन्च केला स्वस्त Nokia C2 Android Go स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ब्रँडचे स्मार्टफोन बनवणाऱ्या HMD Global ने चुपचाप चीन मध्ये आपला नवीन स्मार्टफोन नोकिया सी2 लॉन्च केला आहे. हा डिवाइस गेल्यावर्षी एंट्री-लेवल हार्डवेयर सह लॉन्च केलाय गेलेल्या C1 चा अपग्रेडेड वर्जन आहे. यावेळी कंपनीने Nokia C2 एंडरॉयड गो सह सादर केला आहे.

बजेट कॅटगरी मध्ये सादर करण्यात आलेला Nokia C2 भारतात कधी लॉन्च केला जाईल याची माहिती समोर आलेली नाही. पण आशा आहे कि कंपनी लवकरच हा इंडियन मार्केट मध्ये पण सादर करेल. Nokia C2 दोन कलर ऑप्शन Black आणि Cyan मध्ये सादर केला गेला आहे. कंपनीने सध्या या डिवाइसची किंमत आणि विक्रीची माहिती गुलदस्त्यात ठेवली आहे. पण आशा आहे कि लवकरच याची माहिती समोर येईल.

स्पेसिफिकेशन्स

Nokia C2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 5.7-इंचाचा IPS एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो HD+ रिजोल्यूशन सह येतो. तसेच फोन जुन्या जाड बेजल डिजाइन सह सादर केला गेला आहे. डिवाइसच्या टॉप आणि बॉटमला जाड बेजल आहेत. तसेच फोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले जो सध्याच्या अनेक एंट्री लेवल आणि बजेट स्मार्टफोन मध्ये दिसतो. सोबतच फोन मध्ये क्वाड-कोर Unisoc चिपसेट देण्यात आला आहे, जिचा स्पीड 1.4Ghz क्लॉक आहे.

Nokia C2 मध्ये 1GB रॅम आणि 16GB स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने डिवाइसची स्टोरेज 64जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट आणि रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोन एंडरॉयड पाई ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. त्याचबरोबर पावर बॅकअपसाठी 2,800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटी ऑप्शन बद्दल बोलायचे तर यात हेडफोन जॅक, माइक्रो यूएसबी पोर्ट चार्जिंग प्वाइंट, 4G, सिंगल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ 4.2 आणि जीपीएस आहे.

The post Nokia चा मास्टर स्ट्रोक, लॉन्च केला स्वस्त Nokia C2 Android Go स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-c2-launched-5mp-rear-camera-budget-phone-price-specification/feed/ 0
Nokia 5.2 वेबसाइट वर झाला लिस्ट, एंडरॉयड 10 सह असेल 3 जीबी रॅम, 19 मार्चला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-2-listed-on-geekbench-android-10-3gb-ram-codename-captain-america/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-2-listed-on-geekbench-android-10-3gb-ram-codename-captain-america/#respond Thu, 05 Mar 2020 13:10:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6737 Nokia 5.2 डुअल रियर कॅमेऱ्यासह येणार असल्याचे बोलले जात आहे.

The post Nokia 5.2 वेबसाइट वर झाला लिस्ट, एंडरॉयड 10 सह असेल 3 जीबी रॅम, 19 मार्चला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 19 मार्चला लंडन मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून ब्रँडचे नवीन स्मार्टफोन टेक मंचावर येतील. HMD Global चे चीफ प्रोडक्ट ऑफिसर जुहो सरविकास यांनी आपल्या ट्वीट हँडेल वरून याची घोषणा केली होती. कंपनीने अजूनतरी सांगतिले नाही कि 19 मार्चला ब्रँडचे कोणकोणते फोन लॉन्च केले जातील पण अशी चर्चा आहे कि यादिवशी Nokia 8.2 5G, Nokia 5.2, Nokia 1.3 आणि Nokia C2 बाजारात येतील. आता लॉन्चच्या आधी यातील नोकिया 5.2 स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट वर समोर आला आहे.

Nokia 5.2 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे. हि लिस्टिंग कालची म्हणजे 4 मार्चची आहे आणि हैराणीची बाब म्हणजे गीकबेंच वर नोकिया 5.2 Captain America कोडनेम सह लिस्ट केला गेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या कोडनेम मागील कारण फोनच्या बॅक पॅनल वरील कॅमेरा सेटअप आहे जो एक शिल्डच्या आकारात बनलेला आहे. गीकबेंच लिस्टिंग मध्ये फोन संबंधित महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

Nokia 5.2

सर्वात आधी लिस्टिंग मध्ये समोर आलेले स्पेसिफिकेशन्स पाहता गीकबेंचनुसार हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर आधारित असेल जो 1.80गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालेल. गीकबेंच वर हा फोन 3 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. तसेच बेंचमार्क स्कोर बद्दल बोलायचे तर गीकबेंच वर नोकिया 5.2 ला सिंगल-कोर मध्ये 313 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 1419 स्कोर मिळाला आहे.

नोकिया 5.2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. फोनच्या एका वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम मेमरी सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तर वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम मेमरी सह 64 जीबी मेमरी मिळू शकते. लीकनुसार नोकिया 5.2 6.2 इंचाच्या एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो.

Nokia 5.2 डुअल रियर कॅमेऱ्यासह येणार असल्याचे बोलले जात आहे. लीक्सनुसार फोनच्या बॅक पॅनल वर 16 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. Nokia 5.2 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट सह येईल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

नोकिया 5.2 साठी अजूनतरी 19 मार्चची वाट बघितली जात आहे. आशा आहे कि या दिवशी चार नोकिया फोन लॉन्च केले जातील. आधी माहिती समोर आली होती कि कंपनी Nokia चा आगामी स्मार्टफोन Nokia 8.2 स्मार्टफोन फक्त 5G कनेक्टिविटी केला जाईल तसेच Nokia 8.2 मध्ये 4G सपोर्ट दिला जाणार नाही. नोकिया 8.2 व्यतिरिक्त 19 मार्चला लो बजेट डिवाईस Nokia 1.3 आणि Nokia C2 पण टेक मार्केट मध्ये येऊ शकतात.

The post Nokia 5.2 वेबसाइट वर झाला लिस्ट, एंडरॉयड 10 सह असेल 3 जीबी रॅम, 19 मार्चला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-2-listed-on-geekbench-android-10-3gb-ram-codename-captain-america/feed/ 0